LIVE | पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणूकच लढणार

LIVE | पृथ्वीराज चव्हाण विधानसभा निवडणूकच लढणार
Picture

वडाळा जागेवरुन शिवसेनेत तणाव

वडाळा जागेवरुन शिवसेनेत तणाव, माजी महापौर आणि ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर, वडाळातून उमेदवारीचे श्रद्धा जाधव यांना होते आश्वासन,कालिदास कोळंबकर यांच्यासाठी भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे मागून घेतल्याची माहिती

30/09/2019,2:50PM
Picture

5 ऑक्टोबरला राज ठाकरे प्रचाराचा नारळ फोडणार

राज ठाकरे विधानसभेच्या मैदानात, येत्या 5 ऑक्टोबरला प्रचाराचा नारळ फोडणार

30/09/2019,2:23PM
Picture

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार 4 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार 4 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज दाखल करणार, बारामतीतील प्रशासकीय भवनात दाखल करणार उमेदवारी अर्ज, भव्य मिरवणूक काढून होणार अजित पवार यांचा अर्ज दाखल करणार

30/09/2019,2:21PM
Picture

कोथरुडच्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी नाराज

कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाल्याने मेधा कुलकर्णी नाराज, आमदार मेधा कुलकर्णींच्या निवास्थानी कार्यकर्त्यांची गर्दी, मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देण्याची मागणी, मेधा कुलकर्णीसह कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता

30/09/2019,2:19PM
Picture

नागपुरातील शिवसेनेचे माजी आमदार माजी आमदार आशिष जैसवाल अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत

नागपुरातील शिवसेनेचे माजी आमदार बंडखोरीच्या तयारीत, रामटेकमधून सेनेचे माजी आमदार आशिष जैसवाल अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत, भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता, युतीत रामटेकची जागा शिवसेनेला न सोडल्यानं निर्णय, दोन तारखेला भूमिका जाहीर करणार, नागपूर जिल्ह्यात शिवसेनेच्या वाट्याला एकही जागा नाही

30/09/2019,2:17PM
Picture

मातोश्रीवर AB फॉर्मसाठी उमेदवारांची गर्दी

मातोश्रीवर AB फॉर्मसाठी उमेदवारांची गर्दी, AB फॉर्म घेण्यासाठी भगव्या रंगाचा सदरा घालून अब्दुल सत्तार मातोश्रीवर, विद्यमान आमदार अशोक पाटीलही मातोश्रीवर, कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभव नाईकही मातोश्रीवर, जयदत्त क्षीरसागर मातोश्रीवर पोचले.

30/09/2019,2:14PM
Picture

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 3 ऑक्टोबरला विधानसभा अर्ज दाखल करणार

30/09/2019,2:07PM
Picture

शिवसेनेकडून अर्जून खोतकरांना सातव्यांदा एबी फॉर्म

राज्यमंत्री आणि शिवसेना नेते अर्जून खोतकर यांना सातव्यांदा एबी फॉर्म मिळाला. त्यामुळे जालन्यात खोतकर यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. सातव्यांदा एबी फॉर्म भेटणं ही माझ्यासाठी आणि पक्षासाठी अभिमानाची बाब आहे, असं खोतकर म्हणाले.

30/09/2019,12:57PM
Picture

सांगलीत काँग्रेसच्या माजी आमदाराचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

सांगलीतील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आपला उमेदवार उभा करणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे.

30/09/2019,12:51PM
Picture

मनसेची अंतर्गत बैठक सुरु, राज ठाकरे उमेदवार जाहीर करणार

मनसेची आज (30 सप्टेंबर) अंतर्गत बैठक सुरु आहे. राज ठाकरे आज उमेदवारांची यादी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये जिल्हाध्यक्ष आणि इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाईल, असं सांगण्यता येत आहे. अंतिम यादी शिक्कामोर्तब करण्यासाठी एम आय जी क्लबमध्ये बैठक सुरु आहे.

30/09/2019,12:13PM
Picture

जमीन घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा

बीड येथील जगमित्र साखर कारखान्याच्या जमीन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला आहे. पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे, अशी सुनावणी आज (30 सप्टेंबर) सुप्रीम कोर्टात झाली. धनंजय मुडेंवर कारवाईची टांगती तलवार कायम, याचिकाकर्ते राजेभाऊ फड यांनी ही याचिका दाखल केली आहे.

30/09/2019,12:08PM
Picture

वरळीत शिवसेनेचा संकल्प मेळावा

वरळी विधानसभा मतदारसंघात आज (30 सप्टेंबर) शिवसेनेचा संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार असल्याचे बोललं जात आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील आदित्य यांची उमेदवारी आज घोषित केली जाईल, असंही म्हटलं जात आहे.

30/09/2019,12:01PM
Picture

नांदेडमधून अशोक चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल

नांदेडमध्ये शक्ती प्रदर्शन करत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.

30/09/2019,11:58AM
Picture

पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात चंद्रकांत मोकाटे रणशिंग फुंकणार?

पुण्यात कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात चंद्रकांत मोकाटे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. चंद्रकांत मोकाटे शिवसेनेचे माजी आमदार आहेत. कोथरुड मतदारसंघाचे मोकाटे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. मोकाटे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांना खिंडीत गाठण्याची विरोधकांची व्यूहरचचना

30/09/2019,11:55AM
Picture

नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून कांद्याचा लिलाव बंद

नाशिकमध्ये लासलगाव बाजार समिती शेतकऱ्यांकडून कांद्याचा लिलाव बंद पाडला. 600 रुपयांनी बाजार भावात घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. रस्त्यावरुन जाणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांनी पिटळून लावले.

30/09/2019,11:49AM
Picture

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा उमेदवारी अर्ज दाखल

30/09/2019,11:46AM
Picture

कराडमध्ये भीषण अपघात, दोघांचा मृत्यू

कराडमध्ये बोलेरो पिकअप जीपचा भीषण अपघात, अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, सात जण जखमी, बोलेरोचा टायर फुटल्याने हा अपघात झाला, मृतांची ओळख अजून पटलेली नाही. आशियाई महामार्ग बेलवडे हवेली येथे हा अपघात झाला.

30/09/2019,11:31AM
Picture

भाजप नाशिक शहरातील तिन्ही जागा लढणार : सूत्र

नाशिक पूर्व, पश्चिम आणि मध्य या तिन्ही जागा भाजप लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील एकही जागा शिवसेनेला नसल्याची माहिती मिळत आहे. नाशिक पश्चिमच्या जागेसाठी शिवसेना सुरुवातीपासून आग्रही होती. विशेष म्हणजे शहरातील भाजपच्या तीन पैकी दोन आमदारांचं तिकीट कट होण्याची शक्यता आहे.

30/09/2019,11:20AM
Picture

प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात

माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात झाला आहे. काल (29 सप्टेंबर) रात्री पटेल गोंदियावरुन नागपूरला येत असताना महालगाव कापसी येथे राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला. या अपघातात तीन पोलीस किरकोळ जखमी झाले असून एक पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी आहे.

30/09/2019,11:15AM
Picture

मंत्री तानाजी सावंतांच्या गाडीने एकाला उडवलं

#सोलापूर : जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एकाला उडवले, अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू, संतप्त जमावाने तानाजी सावंतांची गाडी फोडली

30/09/2019,10:53AM
Picture

बाळासाहेब थोरात आज उमेदवारी अर्ज भरणार

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उमेदवारी अर्ज भरणार, संगमनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे , आ.सुधीर तांबे , युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची उपस्थिती, शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार. थोरात सलग सहावेळा संगमनेर विधानसभेतून आमदार. दुसरीकडे नेवासे विधानसभा मतदारसंघातून गडाखांचा उमेदवारी अर्ज. शंकरराव गडाख अपक्ष निवडणूक लढवणार. शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून अपक्ष निवडणूक. आज उमेदवारी अर्ज करणार दाखल..

30/09/2019,10:38AM
Picture

राष्ट्रवादीची 50 उमेदवारांची यादी तयार

राष्ट्रवादीतील साधारण ५० उमेदवारांची यादी तयार, आज किंवा उद्या राष्ट्रवादीची पहिली यादी येणार, काँग्रेसने आधीच ५१ उमेदवारांची यादी जाहीर केल्यांतर आता एनसीपीही जाहीर करणार

30/09/2019,10:38AM
Picture

आजी-माजी आमदारांची हमरी तुमरी

पुणे : शिरुरचे आजी माजी आमदारांची माईकवरुन हमरीतुरी, आमदार बाबुराव पाचर्णे सभासदांना माकड म्हटल्यान वाद, माजी आमदार अशोक पवार यांचा पाचर्णे यांचेकडून माईक हिसकावण्याच प्रयत्न, माईक हिस्कवण्यासाठी दोघांत रस्सीखेच,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभेत गोंधळ, आमदार बाबुराव पाचर्णे बोलत असताना सभासद उभा राहिल्याने आमदारांनी सभासदांना माकड म्हटलं, सभासदांचा माकड असा उल्लेख केल्याने वादाला तोंड फुटून शाब्दिक चकमक, आमदारांच्या वक्तव्याला माजी आमदार आणि चेअरमन अशोक पवार यांनी दर्शवला विरोध, बघा आजी-माजी आमदारांमध्ये शाब्दिक युद्ध आणि माईकसाठी हमरीतुमरी, निवडणुकीच्या अगोदर आजी-माजी आमदारांमध्ये जुगलबंदी

30/09/2019,10:35AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *