नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री

पूर परिस्थिती रोखण्यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. हे निर्णय घेताना त्याला विरोध करू नका, असं सांगतानाच यापुढे नदीपात्रातील ब्लू लाईन, रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही. (maharashtra government to not allowed construction in blue and red line area in river)

नदीपात्रातील ब्लू, रेड लाईनमध्ये बांधकामास परवानगी नाही, पूर परिस्थिती रोखण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागणार: मुख्यमंत्री
cm uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 2:10 PM

कोल्हापूर: पूर परिस्थिती रोखण्यासाठी आता काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. हे निर्णय घेताना त्याला विरोध करू नका, असं सांगतानाच यापुढे नदीपात्रातील ब्लू लाईन, रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात येणार नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्पष्ट केलं आहे. (maharashtra government to not allowed construction in blue and red line area in river)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापुरातील पूरस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. आपल्याला गावांचं पुनर्वसन करावं लागेल. काही ठिकाणी कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. कठोर निर्णय घेतले नाही तर पाठी लागलेलं संकट आपल्याला सोडणार नाही. जेव्हा हे निर्णय घेऊ त्यावेळी त्याला साथ द्या. नदी पात्रात ब्लू आणि रेड लाईन आहे. त्यात झालेली अतिक्रमण आहेत. त्यामुळे पूर येत असतो. आता या पुढे ब्लू लाईन आणि रेड लाईनमध्ये बांधकामांना परवानगी देणार नाही. परवानगी देणार असाल तर या लाईन मारू नका. मग या लाईनला अर्थ काय? असं सांगतानाच लोकांचे जीव गमावणं परवडणार नाही. या गोष्टी संकटाच्या निमित्ताने कराव्या लागणार आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.

पाणी नियोजनाचा आराखडा तयार करणार

कोल्हापुरात मी दोन तीन ठिकाणी फिरलो. यावेळी नागरिकांनी आपल्या तक्रारी माझ्यासमोर मांडल्या. दरवर्षी या ठिकाणी पूर येतो. आम्ही कष्टाने कमावतो. त्यामुळे संसार उद्धवस्त होतात. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढा, असं लोक म्हणत आहेत. नद्यांच्या अतिरिक्त पाण्याचं नियोजन करायचं आहे. नुसता अभ्यास नाही तर आराखडा तयार करावा लागणार आहे. खचणारे रस्ते, कोसळणाऱ्या दरडी यामुळे भूगर्भाचाही अभ्यास करायचा आहे, असं त्यांनी सांगितलं.

भिंत बांधावी ही कल्पना, आग्रह नाही

मी भिंत बांधायची कल्पना मांडली होती. पण त्यावर मतमतांतरे असेल तर आपण पुढे सरकता येणार नाही. केवळ भिंत हा पर्याय असू शकतो का असं मी म्हटलं होतं. असेल तर पुढे जाऊ, नसेल तर सोडून देऊ. भिंत बांधावीच हा माझा आग्रह नाही, असंही त्यांनी सांगितलं. (maharashtra government to not allowed construction in blue and red line area in river)

संबंधित बातम्या:

VIDEO | कोल्हापुरात उद्धव-फडणवीस पहाणी करता करता एकमेकांना समोरा समोर भेटले

VIDEO: मुख्यमंत्र्यांचा निरोप, फडणवीसही थांबले, शाहुपुरीत एकत्र पहाणी, दोघांच्या भेटीची इनसाईड स्टोरी

पाचच मिनिटं एकत्र भेटले; देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं?

(maharashtra government to not allowed construction in blue and red line area in river)

Non Stop LIVE Update
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.