फडणवीस सरकारला आणखी एक धक्का, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे.

Maharashtra International Education board, फडणवीस सरकारला आणखी एक धक्का, महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ रद्द

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे (Maharashtra International Education board). शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज (26 फेब्रुवारी) विधानपरिषदमध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ हे रद्द करणार असल्याच्या निर्णयाची घोषणा केली. विधानपरिषदमध्ये महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमाबद्दलचा मुद्दा लक्षवेधी प्रश्नाद्वारे उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना गायकवाड यांनी ही घोषणा केली.

महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचा प्रश्न लक्षवेधी प्रश्नाद्वारे उपस्थित झाल्यानंतर या मंडळाचा अभ्यासक्रम कोण तयार करतं, याचे तज्ज्ञ कोण आहेत, या मंडळाशी संबंधित शाळांची प्रवेशप्रक्रिया योग्य आहे का? असे अनेक मुद्दे सभागृहात उपस्थित करण्यात आले. यावेळी शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी या मंडळाकडून विशिष्ट विचारसरणीशी संबंधित अभ्यासक्रम तयार केला जात असल्याचा आरोप करत मंडळ बंद करण्याची मागणी केली. शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी देखील मंडळ बंद करण्याची मागणी केली. यावर निरंजन डावखरे यांनी याबद्दल आधी आढावा घेऊनच निर्णय घ्यावा अशी मागणी केली.


मंडळ रद्द करण्याच्या मागणीनंतर विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत काही काळ गोंधळही झाला. यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या मंडळाबद्दल आलेल्या तक्रारी लक्षात सांगितलं. तसेच सभागृहाची भावना लक्षात घेता महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचं जाहीर केलं.

Maharashtra International Education board

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *