Maharashtra Rain Landslides LIVE |सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर सांगली साताऱ्यासह उर्वरित महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलंय...

Maharashtra Rain Landslides LIVE |सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू
पूरस्थितीचा प्रातिनिधीक फोटो

मुंबई : महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. मराठवाड्यात परभणी वगैरे भागातही तुफान पावसामुळे प्रलय आल्यासारखी स्थिती आहे. पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत आहे. एकंदरीत महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईलगतच्या कल्याण, बदलापूर, कर्जत भागांतही पाऊस कोसळत आहे. महाडजवळून वाहणाऱ्या सावित्री आणि काळ नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले. महाबळेश्वर येथे धो धो पाऊस पडत असल्याने त्या पाण्याचे लोट सावित्री नदीतून घाटमाथ्यावरून खाली कोकणात उतरले आहेत. कोल्हापूरची स्थितीही गंभीर आहे. अशा तऱ्हेने मुसळधार पावसाने राज्यापुढे नवे संकट उभे केले आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 25 Jul 2021 22:37 PM (IST)

  सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

  सातारा : सातारा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू

  भूस्खलनामुळे 29 लोकांचा मृत्यू

  छत पडून 1 वृद्धाचा मृत्यू,

  दरड कोसळून 2 जणांचा मृत्यू

  8 जणांचा पुराच्या पाण्यामुळे मृत्यू

  अजूनही मिरगाव 3 आणि आंबेघर 1 असे एकूण 4 मिसिंग आहेत

 • 25 Jul 2021 22:09 PM (IST)

  2 लाख 30 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले, एकूण 149 जणांचा मृत्यू

  पूरग्रस्त भागातील बचाव कार्याचा अहवाल

  मदत व पुनर्वसन विभागाने आज दि 25  जुलै रात्री 9 वाजता दिलेल्या माहितीनुसार पूरग्रस्त भागातून सुमारे 2 लाख 30 हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले आहे.

  एकूण 149 मृत्यू झाले असून 3248 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

  एकंदर 50 लोक जखमी असून 100 लोक बेपत्ता आहेत

  875 गावे बाधित झाली आहेत.

 • 25 Jul 2021 20:24 PM (IST)

  तळीये दुर्घटनेतील उर्वरीत  मृतदेह न पाहण्यासारखे, शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेऊ : आमदार भरत गोगावले

  रायगड : तळीये दुर्घटनेतील उर्वरीत  मृतदेह विटंबना झालेली न पाहण्यासारखे असल्याने ग्रामस्थांच्या बैठकीत शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय घेऊ

  49  मृतदेह आत्तापर्यंत सापडले तर 33 मृतदेह हे खूप चिखलात असून त्यांची विटंबना झालेली असून अनेक मृतदेहांचे अवशेष सापडत आहेत.

  त्यामुळेच जागेवरच अत्यंविधी करुन शोधमोहीम थाबंविण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये घेऊ

  आमदार भरत गोगावले यांची माहिती

 • 25 Jul 2021 20:19 PM (IST)

  साताऱ्यात आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू, जाणून घ्या मृतांची नावे

  वाई, पाटण, महाबळेश्वर, सातारा, जावली तालुक्यातील गावांमध्ये अतिवृष्टीमध्ये झालेल्या भूस्खलन, छत पडून, दरड कोसळून व पुराच्या पाण्यामुळे आतापर्यत 40 जणांचा मृत्यु झाला आहे.

  मृत व्यक्तींची नावे व वय पुढीलप्रमाणे-

  भूस्खलन

  वाई तालुका

  कोंढावळे
  1) राहीबाई मारुती कोंढाळकर 75 वर्षे
  2) भिमाबाई सखाराम वशिवले 52 वर्षे
  पाटण तालुका
  आंबेघर तर्फ मरळी
  1) मंदा रामचंद्र कोळेकर 50
  2) अनुसया लक्ष्मण कोळेकर 45
  3) सीमा धोंडीराम कोळेकर 23
  4) लक्ष्मी वसंत कोळेकर 54 वर्षे
  5) सुनिता विनायक कोळेकर 24
  6) वेदीका विनायक कोळेकर 3
  7) रामचंद्र विठ्ठल कोळेकर 55
  8) विनायक वसंत कोळेकर 28
  9) विघ्नेश विनायक कोळेकर 6
  10) मारुती वसंत कोळेकर वय 21
  11) लक्ष्मण विठ्ठल कोळेकर 50
  (12,13,14) नावे समजू शकली नाहीत

  काहीर
  1) उमा धोंडीबा शिंदे 14

  रिसवड (ढोकावळे)
  1) सुरेश भांबू कांबळे 53
  2) हरिबा रामचंद्र कांबळे 75
  3) पुर्वा गौतम कांबळे 3
  4) राहीबाई धोंडीबा कांबळे 50

  मिरगाव
  1) आनंदा रामचंद्र बाकाडे 50
  2) भूषण आनंदा बाकाडे 17
  3) यशोदा केशव बाकाडे 68
  4) वेदांत जयवंत बाकाडे 8
  5) मंगल आनंदा बाकाडे 45
  6) शितल आनंदा बाकाडे 14
  7) मुक्ता महेश बाकाडे 10
  8) विजया रामचंद्र देसाई 69
  —————-
  छत पडल्याने
  वाई तालुका
  कोंढावळे
  1) वामन आबाजी जाधव 65

  —————-

  पुराच्या पाण्यामुळे
  जावली तालुका
  रेंगडी
  1) तानाबाई किसन कासुर्डे 50
  2) भागाबाई सहदेच कासुर्डे 50
  वाटंबे
  1) जयवंत केशव कांबळे 45
  मेढा
  1) कोंडीराम बाबूराव मुकणे 45
  पाटण तालुका
  बोंद्री
  1) वैभव तायाप्पा भोळे 22
  जळव
  1) तात्याबा रामचंद्र कदम 47
  सातारा तालुका
  कुस बु
  1) सुमन विठ्ठल लोटेकर 65
  कोंडवे
  1) अमन इलाही नालबंद 21

  —————

  दरड कोसळल्यामुळे
  महाबळेश्वर तालुका
  घावरी
  1) विजय (अंकुश) मारुती सपकाळ 29
  पाटण तालुका
  मंद्रुकोळे
  1) सचिन बापूराव पाटील 42

 • 25 Jul 2021 19:24 PM (IST)

  आंबेघर दुर्घटनेतील 14 मृतदेह सापडले, एनडीआरएफची शोधमोहीम संपली

  कराड : पाटण आंबेघर दुर्घटना अपडेट

  आतापर्यंत 14 मृतदेह सापडले

  सात महिन्यांच्या बाळाचा मृतदेह अजूनही सापडला नाही

  एकूण 15 जण मातीखाली दबले होते

  14 जणांचे मृतदेह मिळाले

  एनडीआरएफची शोधमोहीम संपली

 • 25 Jul 2021 19:22 PM (IST)

  राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

  कोल्हापूर : राधानगरी धरणाचे आणखी दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

  चार आणि पाच नंबरचा दरवाजा उघडला

  काही वेळा पूर्वी उघडले होते दोन दरवाजे

  चार दरवाजांमधून सध्या 6 हजार 912 क्यूसेक्सने विसर्ग सुरू

 • 25 Jul 2021 18:06 PM (IST)

  कृष्णा नदीची पाणीपातळी 1 इंचने उतरली

  सांगली – कृष्णा नदीची पाणीपातळी 1 इंचने उतरली

  आज दुपारी कृष्णा नदीची पाणीपातळी होती 54.6 इंचवर

  मात्र आज सायंकाळी 5 वाजता ती 54.5 इंच इतकी झाली आहे

  सांगलीकरांना थोडासा दिलासा आहे

  शहरात मात्र पाणी जैसे थे परिस्थिती आहे

  सध्या पाणीपातळी स्थिर आहे

 • 25 Jul 2021 17:36 PM (IST)

  पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट, कोल्हापुरातील 87 बंधारे अजूनही पाण्याखाली

  कोल्हापूर : पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट कायम

  पंचगंगा नदीची पाणीपातळी आली 51 फुटांवर

  सकाळपासून पाणीपातळीत दीड फुटांची घट

  जिल्ह्यातील 87 बंधारे अजूनही पाण्याखाली

 • 25 Jul 2021 17:27 PM (IST)

  तळीये गावातील दुर्घटना अत्यंत दुर्देवी, मनाला चटका लावणारी : रामदास आठवले

  रागयड : तळीये गावाची दुर्घटना अत्यंत दुर्देवी, मनाला चटका लावणारी. आत्तापर्यंत 49 लोकांचे म्रुतदेह सापडले, आणखी 30-35 लोकांचे म्रुतदेह आतमध्ये असण्याची शक्यता आहे : रामदास आठवले

  गावातील एकच घर शिल्लक बाकीचे उध्वस्त झाली आहेत. या ठिकाणी कलेक्टर व स्थानिक आमदार आहेत.

  आम्ही फक्त ईथे बघण्यासाठी नाही तर अशा पद्धतीच्या घटना भविष्यात होऊ नयेत, याकरीता महाराष्ट्र शासनाकडे मागणी करत आहोत.

  आभ्यास समिती नेमून डोगंराच्या जवळ असलेल्या गावांच पुर्नवसन करावे

  राज्यसरकारच्या वतीने 5 लाखाची मदत केद्रं सरकारच्या वतीने 2 लाखाची मदत तसेच म्हाडाकडून घरे बांधून देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

  मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून डोंगर किनारी असणाऱ्या गावांचं पुनर्वसन करण्याकरीता पत्र लिहणार आहे.

  तसेच केद्रं पातळीवर देशभर अशीच योजना राबवावी असे पत्र लिहणार आहे.

  केंद्रीय मंत्री रामदास आठवले आंची माहिती

 • 25 Jul 2021 16:33 PM (IST)

  पावसामुळे राधानगरी धरण भरलं, दोन स्वयंचलित दरवाजे उघडले 

  कोल्हापूर :गेल्या चार दिवस कोसळलेल्या पावसामुळे भरलं राधानगरी धरण

  राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले

  तीन आणि सहा क्रमांकाचे स्वयंचलित दरवाजे उघडले

  धरणातून 4236 क्यूसेक पाण्याचा विसर्ग

 • 25 Jul 2021 16:00 PM (IST)

  इंद्रावती नदीचा पूर ओसरला, जगदलपूर-निजामबाद राष्ट्रीय महामार्ग सुरु

  गडचिरोली : महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात इंद्रावती नदीला पूर आल्याने जगदलपूर ते निजामबाद राष्ट्रीय महामार्ग पुरामुळे बंद होता

  सध्या गडचिरोली जिल्ह्यात पाऊस नसल्याने पूर ओसरला आहे

  हा राष्ट्रीय महामार्ग छत्तीसगड येथील पटनमपासून सुरू झालेला आहे

  या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक सुरू करण्यात आली

 • 25 Jul 2021 15:58 PM (IST)

  पुण्यातील भोर तालुक्यात कोंढरी गावाजवळ दरड कोसळली, गावातील 300 जणांचे स्थलांतर

  पुण्यातील भोर तालुक्यात कोंढरी गावाजवळ पडली दरड

  संपुर्ण गावच प्रशासनानं केलं स्थलांतरित

  कोंढरी गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत

  भोर महाड रस्ता दरड कोसळल्यानं बंद

  गावात मोबाईल नेटवर्क नाही नागरिकांचा कोणाशीही संपर्क नाही

  गावातील 300 जणांना सुरक्षित ठिकाणी केलं स्थलांतरित ..

 • 25 Jul 2021 13:13 PM (IST)

  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतीला तडाखा, पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान

  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाचा शेतीला तडाखा,

  कोल्हेवाडीत भातशेतीचं मोठं नुकसान,

  खाचरातलं पाणी हटेना,

  कोल्हेवाडीत 5 घरांच झालं नुकसान,

  घरातील लोकांना दूसरीकडे हलवलं,

  स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू,

  रस्ता गेला वाहून …।

 • 25 Jul 2021 12:52 PM (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून चिपळूणमधील पूरस्थितीची पाहणी, बाजारपेठ परिसरातील व्यावसायिकांशी चर्चा

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिपळूणमध्ये दाखल
  चिपळूण बाजारपेठ आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा
  बाजारपेठ परिसरात पुराच्या पाण्यामुळे मोठे नुकसान झाले होते

  चिपळूण येथील हॉटेल अभिषेक मध्ये आढावा बैठक घेणार
  जिल्हाधिकारी यांच्या सह प्रमुख अधिकारी उपस्थित आहेत

 • 25 Jul 2021 12:49 PM (IST)

  सांगलीत पाऊस थांबल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात, शिरगावला अद्यापही पाण्याचा वेढा

  सांगली –

  – पाऊस थांबल्यामुळे पाणी ओसरायला सुरुवात,

  – वाळवा शहरातील साडेचार फूट पाण्याची पातळी ओसरली,

  – मात्र शिरगावला अद्यापही पाण्याचा वेढा,

  – वाळव्यात एनडीआरएफची एक टीम दोन दिवसांपासून रेस्क्यू करत आहे

 • 25 Jul 2021 12:00 PM (IST)

  राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळांची बैठक, पूरग्रस्त भागासाठी मदत जाहीर होण्याची शक्यता

  राज्यातील पूरस्थितीनंतर आढावा घेतल्यानंतर मंगळवारी मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक,

  दोन दिवसात सगळे पंचनामे केले जातील,

  मंगळवारच्या बैठकीत कोकण आणि पुरग्रस्त भागासाठी मदत जाहीर होण्याची शक्यता,

  मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक बोलावल्याची राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

 • 25 Jul 2021 11:29 AM (IST)

  सिंधुदुर्गात डोंगर खचण्याच्या घटनांचा सिलसिला सुरु, डोंगराचा मोठा भाग कोसळला

  सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात डोंगर खचण्याच्या घटनांचा सिलसिला सुरूच.

  वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा येथील पहिलीवाडी येथे डोंगराचा मोठा भाग कोसळला.

  अनेक झाडे उन्मळून आली खाली.

  वस्तीपासून डोंगर काहीसा दूर असल्याने मोठी दुर्घटना टळली.

  याआधी ही कणकवली दिगवळे, सावंतवाडी तालुक्यातील बांदा- गाळेल येथे डोंगर खचून दुर्घटना घडल्या होत्या.

 • 25 Jul 2021 11:26 AM (IST)

  सांगली पावसाचा कहर, कारागृहात पाणी घुसले

  सांगली  –

  सांगली कारागृहात पाणी घुसले

  कारागृहात सध्या 5 ते 6 फूट पाणी

  300 कैदी सध्या कारागृहात , 100 कैदीना बाहेर काढून त्यांना पटवर्धन हायस्कूल मध्ये सोडले

 • 25 Jul 2021 10:45 AM (IST)

  पुण्यात राष्ट्रवादीच्या वतीने 16 डॉक्टरांचे पथक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रवाना होणार

  पुण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं 16 डॉक्टरांच पथक पूरग्रस्तांसाठी मदतीला थोड्या वेळात निघणार,

  तीन अँम्बुलन्स कोकणात मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पाठवणार,

  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हिरवा झेंडा दाखवून अँम्बुलन्स पाठवणार…

 • 25 Jul 2021 10:44 AM (IST)

  सांगलीत बचावकार्य सुरु असताना पात तुटल्याने बोट पाण्यात अडकली

  सांगली –

  बचावकार्य करत असताना महापालिकेची बोटीला लाकडी ओंडक्यामुळे बोटीचे पात तूटल्याने पाण्यातच बोट अडकली.

  एक महिला, नगरसेवक मंगेश चव्हाण, महापालिका कर्मचारी दोन, एक पुरुष असे सहा लोक पडले पुराच्या पाण्यात..

  सांगली कोल्हापूर रोडवरील हॉटेल उदय शेजारी घटना घडली… डांबाला बोट बांधून ठेवली आहे बोटीतच अडकून पडले आहेत

  दुर्देवाने कोणतेही जीवितहानी नाही.

 • 25 Jul 2021 10:37 AM (IST)

  तळीये दुर्घटना प्रकरण, चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात, 43 मृतदेह हाती

  महाड तळये दुर्घटना प्रकरण –

  – सलग चौथ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
  – SDRF टीम घटना स्थळी दाखल
  – जेसीबीच्या साहाय्याने मातीचे ढिगारे बाजूला करण्याचं काम सुरू
  – पोलिसांचा फौजफाटा ही घटनास्थळी दाखल
  – आतापर्यंत 43 मृतदेह शोधण्यात बचाव पथकाना यश
  – अजुन 42 जण मिसिंग असल्याची माहिती

 • 25 Jul 2021 10:09 AM (IST)

  साताऱ्यात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये 186.7 मिमी पावसाची नोंद

  सातारा

  सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात आज सकाळपासून पावसाचा जोर वाढला….

  काल दिवसभर मिळालेल्या पावसाच्या उघडीपी नंतर पुन्हा पावसाला सुरुवात

  मागील 24 तासात महाबळेश्वर मध्ये 186.7 mm पावसाची नोंद…

  पाटण,महाबळेश्वर,वाई जावली,सातारा,कराड तालुक्यात पावसाचा जोर

 • 25 Jul 2021 10:08 AM (IST)

  उपमुख्यमंत्री अजित पवार करणार पूरग्रस्त भागाची पाहणी, कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीचीही पाहणी

  बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार करणार पूरग्रस्त भागाची पाहणी..
  – आज सातारा जिल्ह्यात करणार पाहणी..
  – उद्या कोल्हापूर, सांगलीतील पूरस्थितीचीही करणार पाहणी..
  – कोरोना आढावा बैठकीनंतर अजित पवार होणार रवाना

 • 25 Jul 2021 10:05 AM (IST)

  पुण्यातील पश्चिम घाटातील सात तालुक्यांना प्रशासनाचा हायअलर्ट

  पुण्यातील पश्चिम घाटातील सात तालुक्यांना प्रशासनाचा हाय अलर्ट,

  सात तालूक्यात दिला हाय अलर्ट दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात त्यामुळे प्रशासनं अलर्टवर,

  जेसीबी, महावितरण, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस, जलसंपदा विभागातील कर्मचारी यांना हेडक्वार्टर न सोडण्याच्या सूचना,

  रस्त्यावर दरड पडल्यास लगेचच हटवण्याच्या सूचना मदत पोहोचवण्यासाठी अडचणी येणार नाहीत,

  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या प्रशासनाला सूचना …।

 • 25 Jul 2021 09:39 AM (IST)

  नाशिकमध्ये महिनाभर पाणी कपात, पावसाची उघडीप सुरुच

  नाशिक – सद्या तरी नाशिककरांना दिलासा नाही..

  महिनाभर पाणी कपात कायम राहणार..

  पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने आयुक्तांचा खुलसा..

  सध्या शहरात दर गुरुवारी पाणी कपात सुरू

  गंगापूर धरणात आतापर्यंत फक्त 58 टक्केच पाणीसाठा

 • 25 Jul 2021 08:51 AM (IST)

  सांगलीत पुराचा धोका कायम, कृष्णा नदीची पाणी पातळी 54 फूट

  सांगली  –

  पुराचा धोका कायम आहे ,

  कृष्णा नदी पाणी पातळी 54 फूट झाली

  शहरात बस स्थानक मध्ये पाणी शिरले ,

  प्रशासनानं काढून मदत मिळत नसलेने नागरिकांतून तीव्र नाराजी

 • 25 Jul 2021 08:49 AM (IST)

  साताऱ्यात पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला

  साताऱ्यात पुरात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह 24 तासानंतर सापडला

  अमन इकबाल नालबंद असे युवकाचे नाव…

  शाहूपुरी-कोंडवे रोडवरील भगदाड पडलेल्या पुलावरून पुराच्या पाण्यातून जात असताना घडली होती दुर्घटना….

 • 25 Jul 2021 08:47 AM (IST)

  कोयना धरणात पाण्याची आवक घटली, धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांवर

  कोयना धरण अपडेट

  कोयना धरणाचा विसर्ग केला कमी
  पाऊसाने उघडिप दिल्याने धरणात येणाऱ्या पाणी आवक घटली
  धरणाचे सहा दरवाजे पाच फुटांवर

  31332 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु

  धरण पाणीसाठा 88.43 tmc

 • 25 Jul 2021 08:02 AM (IST)

  कृष्णा आणि पंचगंगा नदीला महापूर, श्रीक्षेत्र नरसिंह वाडीला पूर्ण पाण्याचा वेडा

  इचलकरंजी

  शिरोळ तालुका कृष्णा व पंचगंगा नद्यांना महापूर

  श्रीक्षेत्र नरसिंह वाडीला पूर्ण पाण्याचा वेडा

  तालुक्यातील 39 गावांचा संपर्क तुटला कृष्णा व पंचगंगा संगमावर झालेले पाण्याचे बेटाचे स्वरूप

  प्रशासनाने आतापर्यंत 2हजार नागरिकांना केले स्थलांतर

  तालुक्यामध्ये एक एनडीआरएफ टीम व मिलिटरीच्या जवानांकडून नागरिकांना सुरक्षित स्थळी रेस्की केले जात आहे

  अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे शिरोळ तालुक्याला मोठा दिलासा

 • 25 Jul 2021 07:59 AM (IST)

  लष्करी मदतकार्यासाठी पुण्यात दक्षिण मुख्यालयात फ्लड रिलीफ वॉर रुमची स्थापना

  पुणे

  लष्करी मदतकार्यासाठी पुण्यात दक्षिण मुख्यालयात फ्लड रिलीफ वॉर रुमची स्थापना,

  राज्यात पुरवल्या जाणाऱ्या लष्करी मदतीवर पुण्यातून ठेवली जाणाळ देखरेख,

  शुक्रवारी पुण्यातून लष्कराच्या 15 तुकड्या रत्नागिरी, कोल्हापूर आणि सांगलीत तैनात करण्यात आल्यात,

  अतिरिक्त 10 तुकड्या प्रशासनानं ठेवल्या सज्ज,

  मदतकार्यासाठी पुण्यातील लष्कराचं दक्षिण मुख्यालय अलर्ट

 • 25 Jul 2021 07:58 AM (IST)

  पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली, खडकवासलासह इतर धरणातील पाणीसाठ्यात वाढ

  पुणेकरांसाठी आनंदाची बातमी,

  पडलेल्या पावसानं पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली,

  तीन दिवसात खडकवासला धरणसाखळीतील चार धरणात साडे अकरा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ,

  खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणात 20.21 टीएमसी एवढा पाणीसाठा उपलब्ध,

  11टीएमसी पाण्यातचं पुणेकरांची चिंता मिटते,

  तर खडकवासला धरणातून दोन दिवसात दोन टीएमसी पाण्याचा विसर्ग ..।

  खडकवासला धरण 82 टक्क्यांवर…

  सध्या 7 हजार क्युसेक्स वेगानं मुळा मुठा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू .

 • 25 Jul 2021 07:57 AM (IST)

  पुणे ते मुंबई रेल्वे प्रवासातील अडथळा दूर, आजपासून रेल्वे वाहतूक पुन्हा रुळावर

  पुणे

  पुणे ते मुंबई रेल्वे प्रवासातील अडथळा झाला दूर,

  आजपासून पुणे मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस तर मुंबई कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस धावणार,

  रेल्वे टँकवर दरडी कोसळल्यानं रेल्वे वाहतूक करण्यात आली होती बंद

  मात्र आजपासून डेक्कन क्वीन एक्स्प्रेस धावणार ….

 • 25 Jul 2021 07:54 AM (IST)

  कोल्हापूरच्या शाहुवाडीत दरड कोसळल्याने पेट्रोल पंप गायब

  कोल्हापूर

  शाहूवाडी तालुक्यातील करंजफेन येथे दरड कोसळल्याने पेट्रोल पंपच झाला गायब

  काही दिवसापूर्वी झालं होतं पेट्रोल पंपाचे उद्घाटन

 • 25 Jul 2021 07:52 AM (IST)

  राज्यात पुढील तीन दिवस पावसाची विश्रांती, नंतर पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता

  राज्यातील काही भागात 28 तारखेपर्यंत पाऊस घेणार विश्रांती, पुरग्रस्त भागाला मिळणार काहीसा दिलासा,

  मात्र कोकण, पालघर, ठाणे या जिल्ह्यात मात्र पावसाची शक्यता,

  28 तारखेनंतर पाऊस पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता, कारण 28 जुलैला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता,

  सध्या महाराष्ट्रातील कमी दाबाचा पट्टा हा कर्नाटककडे सरकला,

  त्यामुळे पावसाचा जोर कमी, मात्र ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे,सिंधुदुर्ग , धुळे नंदूरबार नाशिक या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय..।

  भारतीय हवामानशास्त्र विभागानं हा अंदाज वर्तवलाय,

 • 25 Jul 2021 07:50 AM (IST)

  साताऱ्यात दरड कोसळण्याचे सत्र सुरुच, महाबळेश्वर-तापोळा रस्ता वाहतुकीसाठी बंद

  सातारा

  सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर असल्यामुळे दरड कोसळण्याचे सत्र सुरूच

  महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मागील 2 दिवसात,चिखली, म्हारोळी,कापशी या 3 वेगवेगळ्या ठिकाणी दरड कोसळली….

  महाबळेश्वर-तापोळा रस्ता वाहतुकीसाठी बंद…

  प्रशासनाकडून जेसीबीच्या मदतीने दरड हटवण्याचे काम सुरु….

 • 25 Jul 2021 07:24 AM (IST)

  नागपुरात जोरदार पाऊस झाल्यास 70 ठिकाणी साचते पाणी, अद्याप उपाययोजना नाही

  नागपूर  –

  तासभर जोरदार पाऊस झाल्यास नागपूर शहरातील 70 ठिकाणी साचते पाणी

  हे स्पॉट धोकादायक असून जीवघेणे ठरण्याची शक्यता

  तर मोठी अतिवृष्टी झाल्यास 22 झोपडपट्या ना धोका होण्याची शक्यता

  महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यात या ठिकाणांचा समावेश

  मात्र त्यावर अजूनही उपाय योजना नाही

  राज्यात अतिवृष्टी मुळे मोठं नुकसान झालं हे डोळ्या पुढे ठेवत उपाय योजनांची गरज

  2018 मध्ये झालेल्या अतिवृष्टीत आला होता याचा अनुभव

 • 25 Jul 2021 07:02 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची उघडीप, पंचगंगेच्या पाणीपातळीत घट

  कोल्हापूर :

  कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची उघडीप

  पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होतेय घट

  पंचगंगा नदीचू पाणी पातळी 52 फूट 5 इंचावर

  काल सकाळ पासून पाणी पातळीत 4 फुटांची घट

  जिल्ह्याला काहीसा दिलासा

 • 25 Jul 2021 06:57 AM (IST)

  अकोला जिल्ह्यातील पावसाची नोंद जगाच्या आठव्या क्रमांकावर

  अकोला जिल्हात 22 जुलैला पडलेल्या पावसाची नोंद जगाच्या आठव्या क्रमांकावर

  24 तासात 184.8 मिमी पाऊस…!

 • 25 Jul 2021 06:50 AM (IST)

  भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे दरवाजे तिसऱ्या दिवशीही पूर्णत: उघडले

  जळगाव

  भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे दरवाजे तिसऱ्या दिवशीही पूर्णत: उघडले

  हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले

  धरणातून 91395 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

  हातनुर धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI