Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 17, 2022 | 7:21 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Big breakingImage Credit source: tv9

मुंबई : आज बुधवार, 16 नोव्हेंबर, 2022. 72 तासांत 2 खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलाय. आधी विवियाना मारहाण प्रकरणी आणि त्यानंतर विनयभंगाचा गुन्हा आव्हाडांवर दाखल करण्यात आलेला होता. त्या पार्श्वभूमीवर आजही महत्त्वपूर्ण घडामोडी घडण्याची शक्यताय. दरम्यान, जितेंद्र आव्हाड आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मुंबईत आज शिंदे गटाचा मेळावा पार पडणार आहे. या दोन्ही महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडींसोबत राज्यासह देशात श्रद्धा हत्याकांड (Shraddha Aftab News) प्रकरण गाजतंय. या हत्याकांडातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर रोज नवनवे खुलासे होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज काय खुलासे होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या महत्त्वपूर्ण घडामोडींसह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासह महत्वाच्या शहरांमधील ताज्या घडामोडी आणि ब्रेकिंग न्यूजचा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 16 Nov 2022 09:54 PM (IST)

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता

    पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबरला पुण्याचा दौरा करण्याची शक्यता

    एन डी एच्या पासिंग परेडला उपस्थित राहण्याची शक्यता आहे

    मात्र 23 तारखेला पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत दौरा कन्फर्म होणार

    30 नोव्हेंबरला पंतप्रधान पुण्यात येण्याची शक्यता आहे

    सूत्रांची टीव्ही 9 मराठीला माहिती

  • 16 Nov 2022 09:17 PM (IST)

    कापसाचे उत्पादन वाढले, पण तरीही कापसावर येणार संक्रात

    Marathi News LIVE Update

    कापसाचे उत्पादन वाढले, पण तरीही कापसावर येणार संक्रात

    निर्यातीवर परिणाम, कापसाचे भाव कोसळण्याची भीती

    बांगलादेशासह इतर खरेदीदारांनी फिरवली पाठ

    इतर देशांच्या कापसाचे दर भारतीय कापसापेक्षा कमी

    भारतीय कापसाचे भाव 10 टक्क्यांनी जास्त

  • 16 Nov 2022 08:00 PM (IST)

    संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस

    Marathi News LIVE Update

    संजय राऊत यांना ईडीकडून चौकशीसाठी नोटीस

    पत्राचाळ घोटाळाप्रकरणी राऊतांवर आरोप

    राऊत सध्या जामीनावर बाहेर

    ईडीने घेतली आहे हायकोर्टात धाव

    राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने दाखल केली याचिका

  • 16 Nov 2022 07:49 PM (IST)

    राहुल गांधींना सावरकरांविषयी काहीच माहिती नाही

    Marathi News LIVE Update

    राहुल गांधींना सावरकरांविषयी काहीच माहिती नाही

    गांधींना सावरकरांविरोधात लिहून दिल्या जाते

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका

    काँग्रेस सावरकरांबाबत रोज खोटं बोलते

    हिंदुत्व ही एक व्यापक संकल्पना आहे

    सावरकर ते बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत हा हिंदुत्वाचा धागा आहे

  • 16 Nov 2022 07:45 PM (IST)

    Hardik Pandya: केन विलयम्सनवर गुजरात टायटन्स बोली लावणार? हार्दिकच कडक उत्तर

    Hardik Pandya: हार्दिक पंड्याने प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती बंद करणारं उत्तर दिलं. वाचा सविस्तर....

  • 16 Nov 2022 07:28 PM (IST)

    आता या बँकांमधून तुम्हाला आयकर भरता येणार नाही

    Marathi News LIVE Update

    आता या बँकांमधून तुम्हाला आयकर भरता येणार नाही

    आयकर विभागाने या बँकांची यादीच केली जाहीर

    सरकारी आणि खासगी 11 बँकांचा यादीत समावेश

    करदात्यांना कर भरण्यासाठी इतर पेमेंट पर्याय

  • 16 Nov 2022 07:11 PM (IST)

    भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवली पाहिजे

    Marathi News LIVE Update

    भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवली पाहिजे

    राहुल शेवाळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    राहुल गांधींची एक क्लिपही शेवाळे यांनी दाखविली

    महाराष्ट्रात कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्यावं

    शेवाळेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

  • 16 Nov 2022 06:49 PM (IST)

    पंतप्रधान मोदींकडून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 'मातानी पचेडी' भेट

    पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना 'मातानी पचेडी' भेट 'मातानी पचेडी' म्हणजे हाताने बनवलेले कापड अशी ओळख मंदिरात देवीला हे अर्पण केलं जातं गुजरातमध्ये पचेडीला मोठं महत्व अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना मोदींनी वेगवेगळे गिफ्ट दिलेत

  • 16 Nov 2022 06:31 PM (IST)

    शोएब अख्तरच्या आयुष्यावर येणार चित्रपट, जाणून घ्या वेगवान गोलंदाजाची भूमिका कोण बजावणार?

    Shoaib Akhtar: चित्रपटाच शूटिंग कुठे होणार? आणि कधी रिलीज होणार चित्रपट? वाचा सविस्तर.....

  • 16 Nov 2022 06:22 PM (IST)

    देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात मास्क सक्ती नाही

    Marathi News LIVE Update देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात मास्क सक्ती नाही

    केंद्र सरकारने हटवली विमानातील मास्कसक्ती

    कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असल्याने घेतला निर्णय

    बुधवारी केंद्र सरकारने याविषयीची नियमावली केली जाहीर

  • 16 Nov 2022 05:50 PM (IST)

    Umran Malik नंतर बॅट-बॉलने कमाल करणारा काश्मीरचा एक क्रिकेटपटू सोशल मीडियावर हिट

    योग्य संधी आणि तयार केल्यास लवकरच टीम इंडियामध्येही दिसू शकतो. वाचा सविस्तर....

  • 16 Nov 2022 05:42 PM (IST)

    एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून आनंद वार्ता

    Marathi News LIVE Update एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून आनंद वार्ता

    एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता मंजूर

    एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

    सरकारने या संदर्भातील पत्र एसटी महामंडळाला पाठवलं

    एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला मोठं यश

  • 16 Nov 2022 05:21 PM (IST)

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

    स्मारकाचं 50 टक्के काम पूर्ण झालं

    बाबासाहेबांचा 450 फुटांचा पुतळा उभारण्यात येणार

    मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • 16 Nov 2022 05:18 PM (IST)

    Blue Tick साठी पुन्हा मोजा पैसे

    Marathi News LIVE Update

    Blue Tick साठी पुन्हा मोजा पैसे

    29 नोव्हेंबरपासून ब्लू टिक सेवा सशुल्क

    गडबडींमुळे सेवा झाली होती खंडीत

    आता महिन्यांच्या अखेरीस ब्लू टिक साठी मोजावी लागेल रक्कम

    एलॉन मस्क यांनी ट्विट करत दिली माहिती

  • 16 Nov 2022 05:17 PM (IST)

    संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पुन्हा हायकोर्टात

    Marathi News LIVE Update

    संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडी पुन्हा हायकोर्टात

    ईडीच्या वतीने सुधारीत याचिका दाखल

    राऊतांचा जामीन रद्द करण्याची केली मागणी

    सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात ईडीची पुन्हा धाव

  • 16 Nov 2022 04:32 PM (IST)

    IPL 2023: पैशापेक्षा पण मुंबई इंडियन्ससाठी 'हा' ऑलराऊंडर महत्त्वाचा, पोलार्डच्या जागी एकदम परफेक्ट

    IPL 2023: टीम इंडियाला त्रास देणाऱ्या ऑलराऊंडरला विकत घेण्यासाठी पैशांचा पाऊस पडणार एवढ निश्चित. वाचा सविस्तर...

  • 16 Nov 2022 04:14 PM (IST)

    भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदूच

    Marathi News LIVE Update

    भारतातील प्रत्येक व्यक्ती हिंदूच

    प्रत्येकाचा डीएनए एकच आहे

    मोहन भागवत यांचे वक्तव्य

    हजारो वर्षांपासून आपले पूर्वज एकच असल्याचा केला दावा

  • 16 Nov 2022 04:04 PM (IST)

    लग्न सराईच्या हंगामात सोन्याचे दर वाढले

    Marathi News LIVE Update

    लग्न सराईच्या हंगामात सोन्याचे दर वाढले

    सोन्याने भाव पुन्हा वधरले, चांदी फिक्की

    सोन्याची वाटचाल 55 हजारांकडे, आज सोन्याचे भाव 52 हजारांच्या पुढे

    चांदीचे भाव किलोमागे 486 रुपयांनी घसरले

  • 16 Nov 2022 02:05 PM (IST)

    शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची डी लिट पदवी जाहीर

    19 नोव्हेंबर रोजी नितीन गडकरी आणि शरद पवार यांना डी लिट पदवीने केलं जाणार सन्मानित

    19 नोव्हेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ होणार

    1 लाख 2 हजार 809 विद्यार्थ्यांना दिली जाणार पदवी

  • 16 Nov 2022 01:19 PM (IST)

    IND vs NZ T20 Series: वर्ल्ड कपमधली एक मोठी चूक सुधारण्यासाठी हार्दिक पंड्याकडे आता काय पर्याय आहेत?

    IND vs NZ T20 Series: न्यूझीलंड विरुद्धच्या सीरीजमध्ये टीम इंडियाला या प्रश्नाच उत्तर मिळू शकतं. वाचा सविस्तर....

  • 16 Nov 2022 01:00 PM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला बसणार मोठा धक्का

    राष्ट्रवादीचे माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर पक्ष सोडण्याच्या तयारीत

    आज दुपारी 4 वाजता पक्ष सोडण्याबाबत जाहीर करणार भूमिका

    वैजापूर मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते भाऊसाहेब चिकटगावकर

    2019 च्या विधानसभा निवडणुकीपासून पक्ष सोडणार असल्याच्या होत्या चर्चा

    भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील शेवटचे आमदार

    भाऊसाहेब चिकटगावकर यांच्या पक्ष सोडण्याच्या शक्यतेने निर्माण झाली खळबळ

  • 16 Nov 2022 12:38 PM (IST)

    Rohit sharma कडून चुका झाल्या असं हार्दिक पंड्याला वाटतं का? कॅप्टन बनताच म्हणाला.....

    Hardik pandya कॅप्टन बनताच बोलून गेला एक मोठी गोष्ट, वाचा सविस्तर....

  • 16 Nov 2022 12:35 PM (IST)

    औरंगाबाद : मुलीची छेड काढल्याप्रकरणी महिला आयोगाकडून गंभीर दखल

    औरंगाबादमध्ये रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याची घटना, राज्य महिला आयोगाकडून घटनेची गंभीर दखल, पोलिसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश, वाचा सविस्तर 

  • 16 Nov 2022 12:02 PM (IST)

    आमदार, पालकमंत्र्यांना वेगळा न्याय, पोलीस भरतीचे विद्यार्थी आक्रमक, सरकारचा निषेध

    उस्मानाबाद येथे हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले

    एक घटक, एक अर्ज ही अट रद्द करावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक

    विद्यार्थीनींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून सरकारचा निषेध

    ज्या प्रमाणे आमदार अनेक मतदारसंघात निवडणुका लढवू शकतात, एकच मंत्री अनेक जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकतो त्याप्रमाणे पोलीस भरतीला अनेक जिल्ह्यात अर्ज भरण्यास परवानगी द्यावी

  • 16 Nov 2022 11:23 AM (IST)

    श्रद्धा वालकर खून प्रकरणी आरोपी आफताबची नार्को टेस्ट केली जाणार

    दिल्ली पोलिसांचा साकेत कोर्टात अर्ज

    आफताबची नार्को टेस्ट करण्यासाठी दिल्ली पोलिसांचा साकेत कोर्टात अर्ज

    कोर्टाच्या आदेशानंतर आरोपी अफताबची नार्को टेस्ट केली जाणार

  • 16 Nov 2022 10:29 AM (IST)

    तंबाखू खाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून

    तंबाखू खाण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा खून, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना, 23 वर्षीय आरोपी अमोल बारकु खिल्लारी याला हत्येच्या आरोपाखाली अटक, अधिक तपास सुरु

  • 16 Nov 2022 09:30 AM (IST)

    रशिया आणि युक्रेनच्या युद्धात पोलंडचे नुकसान

    रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात पोलंडमधील दोन नागरिक ठार

    क्षेपणास्त्र पोलंडच्या हद्दीत डागल्याचा पोलंडचा दावा

    नाटोन बोलावली आपत्कालीन महत्त्वपूर्ण बैठक

    आज दुपारी 3 वाजता बैठक होण्याची शक्यता

    रशिया दूतावासातील अधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलावलं

    नाटोचा सदस्य असलेल्या पोलंडच्या तक्रारीवरून ही महत्वपूर्ण बैठक बोलावली

  • 16 Nov 2022 09:28 AM (IST)

    टिटवाळा स्टेशन परिसरात प्रवासी व चाकरमान्यांचा रेल्वे रोको

    मुंबईकडून येणाऱ्या व मुंबईला जाणाऱ्या लोकल ट्रेन उशिरा येत असल्याने प्रवाशांचा झाला उद्रेक

    संतप्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे पटरीवर उतरून सकाळी 8.19 ची लोकल थांबवली

    रेल्वे पोलीस व रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी पोहचून प्रवाशांना हटवले

  • 16 Nov 2022 08:50 AM (IST)

    CNG Rates : पुण्यात सीएनजीच्या दरात वाढ

    पुण्यात सीएनजी दरात वाढ, आजपासून एक रुपयांनी वाढला सीएनजी, आता सीएनजी मिळणार ९२ रुपये किलोने, दीड महिन्यानंतर सीएनजीच्या दरात वाढ

  • 16 Nov 2022 08:23 AM (IST)

    शिंदे गटाला केंद्रात 2 मंत्रिपदं?

    शिंदे गटाकडून केंद्रात 2 मंत्रिपद, 2 राज्यपालपदाची मागणी, विश्वसनीय सूत्रांची tv9 मराठीला माहिती

    अमित शाहांकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मागणी- सूत्र

    शिंदे गटाच्या मागणीवर अमित शाहा आज निर्णय घेण्याची शक्यता

    गजानन कीर्तिकरांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता

  • 16 Nov 2022 08:22 AM (IST)

    CCTV : धावत्या रिक्षेतून मुलीची उडी

    ठाण्यानंतर आता औरंगबाद जिल्ह्यातही रिक्षा चालकानं संतापजनक कृत्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी, घटनेत अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी, पाहा व्हिडीओ 

  • 16 Nov 2022 08:15 AM (IST)

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली उमेदवारी

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केली उमेदवारी

    2024 च्या निवडणुकीत राष्ट्राध्यक्षपदासाठी जाहीर केली उमेदवारी

    अमेरिकेला पुन्हा महान आणि गौरवशाली बनवण्यासाठी मी माझी उमेदवारी जाहीर करतोय- ट्रम्प

  • 16 Nov 2022 07:45 AM (IST)

    महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या

    पिंपरी-चिंचवड : विवाहबाह्य संबंठ ठेवणाऱ्या महिलेच्या जाचाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या, गळफास घेऊन आयुष्य संपवलं, आत्महत्या केलेल्या विकास माळवे यांच्या सुसाईड नोटमधून महिलेवर सनसनाटी आरोप

  • 16 Nov 2022 07:39 AM (IST)

    कोयत्यासोबत रील्स बनवणं पडल महागात

    कोयत्यासोबत रील्स बनवणं पडल महागात, पिंपरी-चिंचवड येथे शस्त्रविरोधी पथकाची कारवाई, तरुणांवर गुन्हा

  • 16 Nov 2022 07:38 AM (IST)

    आव्हाड आज फडणवीसांची भेट घेणार?

    जितेंद्र आव्हाड आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची शक्यता, 72 तासांत दोन खोटे गुन्हे दाखल झाल्यानं जितेंद्र आव्हाड नाराज, आव्हाड-फडणवीस भेटीकडे सगळ्यांचं लक्ष

Published On - Nov 16,2022 7:36 AM

Follow us
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.