Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी LIVE
Big breaking
Image Credit source: tv9

| Edited By: कल्याण माणिकराव देशमुख

Sep 27, 2022 | 10:29 PM

मुंबई : आज नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस. आजचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या अनुषंगाने महत्त्वाचा दिवस असणार आहे. आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुनावणी पार पडेल. सुप्रीम कोर्टात पार पडणाऱ्या या सुनावणीसोबत राज्यातील अन्य महत्त्वपूर्ण घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, यांचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये घेणार आहोत. वाचा महाराष्ट्राच्या महत्त्वाच्या शहरांसोबत ग्रामीण भागातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 27 Sep 2022 09:52 PM (IST)

  NIA, ATS च्या मुस्लीम तरुणांवरील कारवाईवरुन वाद पेटला

  Live News & Updates

  एजन्सींजच्या कारवाईनंतर तरुण मुलं 10 ते 15 वर्षात तुरुंगात अडकतात

  निर्दोष असल्यास त्याचा जबाबदारी कोण घेणार

  औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

  पुरावे असल्यास हस्तक्षेप करणार नाही-जलील

 • 27 Sep 2022 09:33 PM (IST)

  सर्वोच्च निर्णयानंतर आनंदावर विरजण

  Live News & Updates

  शिंदे-फडणवीस सरकाराला सुप्रीम दणका

  राज्यपालनियुक्त आमदारांची नियुक्ती लांबणीवर

  12 आमदारांच्या नियुक्तीबाबत लागलीच प्रक्रिया नको

  आताची मोठी अपडेट

 • 27 Sep 2022 09:22 PM (IST)

  वक्तव्याचा विपर्यास नको

  Live News & Updates

  पंकजा मुंडेंच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात येत आहे

  मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचं स्पष्टीकरण

  एकाच घरात दोन नेतृत्व असतील तर संपवायचा प्रश्नच नाही

  मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला हरवू शकत नाही

  बीडमध्ये पंकजा मुंडे यांनी केले होते वक्तव्य

 • 27 Sep 2022 09:17 PM (IST)

  मुंबईकरांचा खिशा पुन्हा कापल्या जाणार

  Live News & Updates

  मुंबईकरांच्या खिश्याला 1 ऑक्टोबरपासून कात्री लागणार

  रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे

  सीएनजीच्या किंमती वाढल्याने भाडेवाढीचा निर्णय

  रात्री 12 वाजेनंतर अधिकची भाडेवाढ

 • 27 Sep 2022 09:16 PM (IST)

  शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे धाव

  Live News & Updates

  शिवसेने पुन्हा निवडणूक आयोगाकडे दाद मागणार

  सूत्रांनी दिली माहिती

  शिवसेना आयोगाला लेखी पत्र देण्याची शक्यता

  शिंदे गटाची कागदपत्रं तपासण्याची आयोगाला करणारा विनंती

 • 27 Sep 2022 08:55 PM (IST)

  सत्तासंघर्ष प्रकरण : पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊ

  Live News & Updates

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा चेंडू निवडणूक आोगाच्या कोर्टात

  पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊ

  निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

  आज सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या अधिकारावर शिक्कामोर्तब केले

 • 27 Sep 2022 07:31 PM (IST)

  पंकजा ताईंचा निशाणा नेमका कुणावर?

  Live News & Updates

  मी जनतेच्या मनात असेल तर मोदीही मला हरवू शकत नाही

  बीडमध्ये पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

  राजकारणात सर्वांना संधी मिळायला हवी

  मी पण वंशवादाचं प्रतिक आहे

 • 27 Sep 2022 07:11 PM (IST)

  सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य - अरविंद सावंत

  सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला मान्य आहे. निवडणूक आयोगासमोर कागदपत्र सादर करु. सर्व युक्तीवाद देशाने पाहिला हे चांगल झालं. देशामधील न्यायव्यवस्थेचा आदर करतो, असं शिवसेना खासदार अरविंद सावंत म्हणाले.

 • 27 Sep 2022 06:56 PM (IST)

  पुण्यातील चांदणी चौकातील पूल होणार इतिहासजमा

  Live News & Updates

  चांदणी चौकातील पूल 2 ऑक्टोबर रोजी पाडणार

  मध्यरात्री दोन वाजता पाडणार पूल

  600 किलो स्फोटकं वापरून पूल पाडणार

  1300 छिद्रे पाडून ठासणार दारुगोळा

  1 ऑक्टोबर रोजी रात्री वाहतूक होणार बंद

 • 27 Sep 2022 06:51 PM (IST)

  अरे वाजवा..

  Live News & Updates

  रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरु राहणार

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय

  नवरात्रीत राज्य सरकारचा मोठा निर्णय

  भाविक भक्तांसाठी रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर सुरु राहतील

 • 27 Sep 2022 06:22 PM (IST)

  सुप्रीम कोर्टाने कोणाच्या बाजूने निकाल दिला हे वेगळं सांगायला नको

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरे यांना नाकारलं आहे,

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य

  कायद्याबाहेर जाऊन कुठलेही कृत्य केलेले नाही,

  लोकशाहीत कायद्याला धरून निर्णय होतात

  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो

 • 27 Sep 2022 06:11 PM (IST)

  न्यायदेवतेवर विश्वास ठेऊन जोरकसपणे बाजू मांडू

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  आम्ही सत्याच्या बाजूने आहोत

  सत्येसाठी आम्ही लढत राहणार असल्याची आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

  विजया दशमीला आमचा विजय निश्चित होईल

  हा निकाल शिवसेनेसाठी नाहीच लोकशाहीसाठी महत्वाचा राहिल

  गद्दारांना दिलासा मिळाला नाही

  हा धक्का नाही, दिलासाही नाही- आदित्य ठाकरे

 • 27 Sep 2022 05:50 PM (IST)

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सर्वोच्च निकालावर पहिली प्रतिक्रिया

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  लोकशाहीत बहुमताला महत्वं आहे

  आमच्याकडे विधानसभा आणि लोकसभेत बहुमत आहे

  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

  प्रकरण कोर्टात असल्याने यावर जास्त बोलणार नाही-शिंदे

 • 27 Sep 2022 05:29 PM (IST)

  देशात काय चाललं आहे, त्याच्यावर कमी बोलेलं जास्त चांगलं

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  हा शिवसेनेला फार मोठा धक्का आहे, असे वाटत नाही

  राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

  पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा वेगळाही विचार असू शकतो

  देशात काय चाललं आहे, त्याच्यावर कमी बोलेलं जास्त चांगलं

 • 27 Sep 2022 05:25 PM (IST)

  सुप्रीम निकालानंतर शिंदे गटाचा जल्लोष

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्र्यांवर शुभेच्छांचा वर्षाव

  शिंदे गटातील मंत्री, आमदारांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत

  शिंदे गटाला सुप्रीम दिलासा

  शिवसेनेची स्थगिती याचिका फेटाळली

 • 27 Sep 2022 05:22 PM (IST)

  शिवसेना आमचीच, पुन्हा केला दावा

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  आम्ही बहुमतातील शिवसेना

  मंत्री शंभुराजे देसाई यांचा दावा

  सर्वोच्च न्यायालयाने स्थगितीचा विषय निकाली काढला

  सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचा अधिकार बहाल केला

  निवडणूक आयोगापुढे ही जोरकस बाजू मांडू

 • 27 Sep 2022 05:18 PM (IST)

  आता दुप्पटीने होईल जल्लोष

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  शिंदे गटाचा विजय झालेला आहे

  निवडणूक आयोगाच्या अधिकारावर शिक्कामोर्तब

  खरी शिवसेना आमच्याकडे आहे

  शिंदे गटात आनंदाचे वातावरण, जल्लोष दुप्पटीने होईल

  अर्जून खोतकर यांची प्रतिक्रिया

 • 27 Sep 2022 05:15 PM (IST)

  काँग्रेसची सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर काय आली पहिली प्रतिक्रिया..

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  निवडणूक आयोग मेरीटवर निर्णय घेईल

  दोन्ही गट पुन्हा सर्वोच्च न्यायालयात येऊ शकते

  16 आमदारांच्या पात्रतेसंबंधी निर्णय झालेला नाही

  काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची पहिली प्रतिक्रिया

 • 27 Sep 2022 05:12 PM (IST)

  हा तर सत्याचा विजय..

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे सत्याचा निर्णय

  खासदार श्रीकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

  बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणार

  आज आम्हाला मोठं यश मिळालं आहे

  बहुमताचे आकडे आमच्या बाजूने असल्याचा केला दावा

 • 27 Sep 2022 05:08 PM (IST)

  अमृता फडणवीस यांची सत्तासंघर्षावरील सुनावणीवर पहिली प्रतिक्रिया

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  न्यायदेवतेवर माझा विश्वास

  पुढे काय होते ते पाहू

  अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

  शिंदे गटाला सुप्रीम दिलासा

 • 27 Sep 2022 05:04 PM (IST)

  निवडणूक आयोगासमोर सर्व पुरावे सादर करु

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  निवडणूक आयोग काय निर्णय घेते ते पाहू

  शिंदे यांच्या प्राथमिक सदस्याबाबतची बाजूही आयोगापुढे मांडू

  शिवसेनेचे अनिल देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

  खरी शिवसेना कोणाची?, निवडणूक आयोग घेणार निर्णय

 • 27 Sep 2022 05:00 PM (IST)

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो

  सुप्रीम कोर्टाच्या निकालावर शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

  शिवसेनेला या निर्णयाचा धक्का नाही

  आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्यापही बाकी

  खासदार अरविंद सावंत यांनी मांडली बाजू

 • 27 Sep 2022 04:51 PM (IST)

  शिंदे गटाला सुप्रीम कोर्टात मोठा दिलासा

  Supreme Court hearing Shiv Sena Eknath shinde live

  चिन्हाबाबतचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

  शिवसेनेची स्थगिती याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

  खरी शिवसेना कोणती याचा निर्णय आता आयोगाकडे

  निवडणुूक आयोगाचा मार्ग मोकळा

 • 27 Sep 2022 04:49 PM (IST)

  निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती नाही

  निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती नाही

  शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

  आताची मोठी अपडेट

  महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

 • 27 Sep 2022 04:43 PM (IST)

  घटनापीठातील न्यायमुर्तींचा एकमेकांशी संवाद सुरु

  घटनापीठातील न्यायमुर्तींचा एकमेकांशी संवाद सुरु

  निकाल काय लागेल याची उत्सुकता शिगेला

  दोन्ही पक्षांकडून जोरदार युक्तीवाद

  लंच ब्रेकनंतर पुन्हा घटनापीठापुढे बाजू मांडली

 • 27 Sep 2022 04:41 PM (IST)

  संरक्षण न मिळाल्यास आमची गैरसोय

  संरक्षण न मिळाल्यास आमची गैरसोय

  सुनावणी पुढे ढकलल्यास शिंदे गटाचं काहीच नुकसान नाही

  सिंघवी यांचा घटनापीठासमोर युक्तीवाद

  शिवसेना नेमकी कोणाची ? यावर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 04:36 PM (IST)

  पक्षाच्या सदस्यत्वाबाबत निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही

  पक्षाच्या सदस्यत्वाबाबत निर्णयाचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही

  अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तीवाद

  महाराष्ट्राच्या सत्तांतरावर महा युक्तीवाद

  खरी शिवसेना कोणाची? यावर खल

 • 27 Sep 2022 04:29 PM (IST)

  सर्व अधिकार आयोगाला दिले तर मग शिल्लक काय राहिलं

  सर्व अधिकार आयोगाला दिले तर मग शिल्लक काय राहिलं

  पक्षविरोधी कारवाई केल्यानंतर 95 टक्के पक्ष सोडल्याचं गृहित धरलं जातं

  शिंदे अपात्र तरी त्यांना सदस्य मानण्यात येत आहे

  शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा घटनापीठासमोर युक्तीवाद

 • 27 Sep 2022 04:20 PM (IST)

  निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर उपस्थित केले प्रश्नचिन्हं

  शिंदेंनी स्वतः स्वेच्छेने पक्षाचं सदस्यत्व सोडलं

  शिंदे अपात्र तरी त्यांना पक्षाचं सदस्य मानले जातं आहे

  निवडणूक आयोग असं कसं करु शकतो

  कपिल सिब्बल यांचे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हं

 • 27 Sep 2022 04:17 PM (IST)

  निवडणूक आयोग म्हणतो, शिवसेनेत दोन गट

  निवडणूक आयोग म्हणतो, शिवसेनेत दोन गट

  आयोगाने हे कशाच्या आधारावर ठरवलं

  शिंदे हे शिवसेनेचा भाग आहेत की नाही,

  हा खरा प्रश्न आहे

  कपिल सिब्बल यांनी मांडला मुद्दा

 • 27 Sep 2022 04:14 PM (IST)

  निवडणूक आयोगाची नोटीस काय आहे ते ही पहावे

  निवडणूक आयोगाची नोटीस काय आहे ते ही पहावे

  व्हीप न पाळल्यास घटनेनुसार सदस्य अपात्र ठरतो

  शिवसेनेत 2 गट असल्याचा उल्लेख

  आयोगाच्या नोटीसमध्ये दोन गटांचा उल्लेख

  सिब्बल यांनी खोडला शिंदे गटाचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 04:11 PM (IST)

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महा सुनावणी

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर महा सुनावणी

  पक्षाविरोधी कारवाई केल्याने त्यांची हकालपट्टी

  ते मूळ पक्षावर, शिवसेनेवर दावा करु शकत नाही

  त्यांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी केली

  त्यांनी नवीन पक्षा काढावा अथवा दुसऱ्या पक्षात विलीन व्हावे

  कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 04:08 PM (IST)

  एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्राथमिक सदस्य नाहीत

  एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्राथमिक सदस्य नाहीत

  त्यांना थेट नेमण्यात आले आहे, ते निवडून आलेले नाहीत

  निवडणूक आयोगाकडे विषय प्रलंबित आहे

  शिवेसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 04:03 PM (IST)

  निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार उद्धव ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष

  निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डनुसार उद्धव ठाकरे हेच पक्षाचे अध्यक्ष

  उद्धव ठाकरे हेच 2018 ते 2023 पर्यंत पक्षाचे अध्यक्ष

  एकनाथ शिंदे यांना पक्षातून काढण्यात आले आहे

  आयोगाला लिहिलेले पत्र पहावं

  कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 03:49 PM (IST)

  शिवसेना कोणाची? यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

  शिवसेना कोणाची? यावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

  सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ वकील आमची बाजू मांडत आहे

  त्यावर इतक्यात बोलणे योग्य होणार नाही

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणणे मांडले.

 • 27 Sep 2022 03:24 PM (IST)

  निवडणूक आयोगाचे वकील तुषार मेहता यांचा युक्तीवाद

  निवडणूक आयोगाचे वकील तुषार मेहता यांचा युक्तीवाद

  पक्षात बोलण्याचा अधिकार आहे ते अध्यक्ष निवड करतील

  पण दूर गेलेले सदस्य पक्षाचे सदस्य कायम राहतील

  कारण पक्षातून अजून त्यांची अयोग्यता झालेली नाहीय

  यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेऊ द्या

 • 27 Sep 2022 03:21 PM (IST)

  अपात्रतेबाबत राज्यपालांचाही सल्ला घेतला जावा

  अपात्रतेबाबत राज्यपालांचाही सल्ला घेतला जावा

  तुषार मेहता यांचा युक्तीवाद

  घटनापीठासमोर सुप्रीम फैसला आज?

  खरी शिवसेना कोणाची? याचा होणार फैसला

 • 27 Sep 2022 03:18 PM (IST)

  कोणत्याही राजकीय पेचावरती निर्णयाचा अधिकार निवडणूक आयोगाचा

  कोणत्याही राजकीय पेचावरती निर्णयाचा अधिकार निवडणूक आयोगाचा

  राजकीय मुद्यांवरती निर्णयाचा निवडणूक आयोगाला अधिकार

  निवडणूक आयोगाचा निर्णय घेण्याचा अधिकार संवैधानिक

  तुषार मेहता यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 03:16 PM (IST)

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी

  खरी शिवसेना कोणाची ?हे निवडणूक आयोगच ठरवणार

  कोणत्याही राजकीय पेचावरती निर्णयाचा अधिकार निवडणूक आयोगाचा

  केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील दातार यांचा जोरदार युक्तीवाद

 • 27 Sep 2022 03:12 PM (IST)

  शिवसेना कोणाची? जोरदार युक्तीवाद

  शिवसेना कोणाची? जोरदार युक्तीवाद

  अध्यक्षांचे, आयोगाचे आणि राज्यपालांचे अधिकार स्पष्ट व्हावे

  राज्यपालांचे अधिकारा काय हे स्पष्ट व्हावे

  केंद्रीय निवडणूक आयोगाचे वकील दातार यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 03:07 PM (IST)

  सत्तासंघर्ष पेटला, सुप्रीम कोर्टात युक्तीवाद रंगला

  सत्तासंघर्ष पेटला, सुप्रीम कोर्टात युक्तीवाद रंगला

  10 व्या परिशिष्टानुसार अपात्रता हा प्रश्न एक अनिवार्य प्रक्रिया

  कधीही न झालेल्या अपात्रतेवर आपली केस सुरु आहे

  अपात्रता ही प्रत्यक्षात असावी लागते

  महेश जठेमलानी यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 03:04 PM (IST)

  शिंदे गटच खरी शिवसेना

  शिंदे गटच खरी शिवसेना

  पक्षांतर्गत वाद आणि विलिनीकरण वेगळे मुद्दे

  बहुमत नसल्यानेच ठाकरे यांचा राजीनामा

  शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा घटनापीठासमोर युक्तीवाद

 • 27 Sep 2022 03:02 PM (IST)

  शिवसेना कोणाची? हा निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला

  शिवसेना कोणाची ? हा निकाल देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला

  उपाध्यक्षांनी नोटीस दिली, पण केवळ 7 दिवसांचा कालावधी दिला

  गटनेता अध्यक्षांशी संवाद साधतो, पक्ष प्रमुख नाही

  शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 02:59 PM (IST)

  आज धनुष्यबाणाचा फैसला होणार

  आज धनुष्यबाणाचा फैसला होणार

  चिन्हाच अधिकार निवडणूक आयोगाकडे

  बहुमत चाचणीपूर्वीच उद्धव ठाकरे यांचा राजीनामा

  शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 02:42 PM (IST)

  शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता

  शिंदे गटाला विधानसभा अध्यक्षांची मान्यता

  परिशिष्ट 32 नुसार निवडणूक आयोगाच्या अधिकारात हस्तक्षेप

  आयोगाकडे दाद मागण्याचा शिंदे गटाला अधिकार

  उद्धव ठाकरेंकडे बहुमत नव्हते

  ज्येष्ठ विधिज्ञ नीरज किशन कौल यांचा युक्तीवाद

 • 27 Sep 2022 02:40 PM (IST)

  चिन्हांसंदर्भात निर्णयाचा निवडणूक आयोगाला अधिकार

  चिन्हांसंदर्भात निर्णयाचा निवडणूक आयोगाला अधिकार

  परिशिष्ट 25 आणि 26 नुसार निवडणूक आयोगाला अधिकार

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांचा युक्तीवाद

  कौल यांच्या युक्तीवादानंतर निवडणूक आयोगाचे वकील मांडणार बाजू

 • 27 Sep 2022 02:35 PM (IST)

  ठाकरे गटाकडे बहुमत नव्हतं

  ठाकरे गटाकडे बहुमत नव्हतं

  विधानसभा अध्यक्षांची शिंदे गटाला मान्यता

  सादिक अली प्रकरणाचा पुन्हा दाखला

  सपा-बसपा खटल्यातील निकालाचा दाखला-कौल

 • 27 Sep 2022 02:33 PM (IST)

  विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता दिली

  विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता दिली

  त्यामुळे शिंदेची निवडणूक आयोगाकडे धाव

  सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात फैसला

  घटनापीठासमोर सुनावणी सुरु

 • 27 Sep 2022 02:30 PM (IST)

  निवडणूक चिन्ह आमदारांची मालमत्ता नाही

  निवडणूक चिन्ह आमदारांची मालमत्ता नाही

  निवडणूक आयोगाकडून चिन्हांचं वाटपं होतं

  आमदारांना अपात्र ठरवणं पक्षाच्या अधिकारात येत नाही

  अपात्रतेचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा -कौल

 • 27 Sep 2022 02:22 PM (IST)

  सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु

  सुप्रीम कोर्टात पुन्हा सुनावणी सुरु

  धनुष्यबाण चिन्हावर आजच निर्णयाची शक्यता

  लंच बेक्रनंतर पुन्हा सुनावणी सुरुवात

  घटनापीठासमोर पुन्हा सुनावणी

 • 27 Sep 2022 02:05 PM (IST)

  उद्धव ठाकरेंनी भाजवर टीका

  'कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही'

  उद्धव ठाकरेंची अमित शाहांसह भाजपवर टीका

  उस्मानाबादमधील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

  विजय आपलाच होणार, मला आई भवनीवर विश्वास आहे

 • 27 Sep 2022 01:05 PM (IST)

  'विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची चौकशी करु शकत नाही'

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: विधानसभा अध्यक्ष राजकीय पैलूंची चौकशी करु शकत नाही, असं कोर्टानं म्हटलेलं असल्याचा दाखला नीरज कौल यांनी युक्तिवादादरम्यान दिला.

 • 27 Sep 2022 01:02 PM (IST)

  लंचब्रेक नंतर धनुष्यबाणावर पुढील सुनावणी

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: मोठी अपडेट! लंचब्रेक नंतर घटनापीठासमोर होणार पुढील सुनावणी, धनुष्यबाणावर काय सुनावणी होणार, याकडे देशाचं लक्ष

 • 27 Sep 2022 01:01 PM (IST)

  समाववादी पक्षाचा दाखला देत काय म्हणाले कौल?

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: समाजवादी पक्षातील वादानंतर अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच झाला होता, त्यावेळी 13 आमदार अपात्र ठरवले होते, जुन्या निकालाचा दाखल देत नीरज कौल यांच्याकडून युक्तिवाद

 • 27 Sep 2022 12:58 PM (IST)

  शिंदे गटाच्या वकिलांकडून समाजवादी पक्षाचा दाखला

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: शिंदे गटाच्या वकिलांकडून समाजवादी पक्षाचा दाखला, चिन्हाचा अधिकार निवडणूक आयोगच ठरवू शकतो, कौल यांचा घटनापीठासमोर युक्तिवाद

 • 27 Sep 2022 12:55 PM (IST)

  अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांकडे व्हावा- कौल

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: सध्या विधानसभा अध्यक्ष नियुक्त आहेत, त्यांच्याकडेच अपात्रतेचा निर्णय व्हावा- नीरज कौल, विधीमंडळातही आमच्याकडे संख्याबळ, कौल यांचा युक्तिवाद

 • 27 Sep 2022 12:54 PM (IST)

  घटनापीठाने नोंदवलं महत्त्वाचं निरीक्षण

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: अपात्रेबाबत निवडणूक आयोगाकडे कुणी गेलं तर त्यावर आयोग निर्णय घेऊ शकतं का, घटनापीठाची विचारणा, याचिका प्रलंबित असेल तर खासदार, आमदारांना निवडणूक आयोगाकडे जाण्यास मनाई होऊ शकते- घटनापीठ

 • 27 Sep 2022 12:51 PM (IST)

  सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा न्यायमूर्तींची एकमेकांशी चर्चा

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: सुनावणीदरम्यान पुन्हा एकदा घटनापीठातील न्यायमूर्तींची एकमेकांशी चर्चा, शिंदे गटाचे वकील कौल यांच्याकडून शिवसेनेचे वकील सिब्बल आणि सिंघवी यांच्या युक्तिवादाला प्रत्युत्तर

 • 27 Sep 2022 12:44 PM (IST)

  सदस्यांना पक्षातून काढलं का?

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: सदस्यांना पक्षातून काढलं का? तसं पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं का? कपिल सिब्बल यांना घटनापीठाची विचारणा, 'होय सदस्यांना पदावरुन हटवलंय', कपिल सिब्बल यांचं उत्तर, मात्र पक्षातून काढल्याचा उल्लेख कपिल सिब्बल यांच्याकडून नाही

 • 27 Sep 2022 12:40 PM (IST)

  'प्रमुख पार्टी कोण हे पाहावं लागेल'

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: प्रमुख पार्टी कोण हे पाहावं लागेल, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, शिंदे गटाच्या वकिलांचा दावा #SupremeCourtOfIndia #maharastra #BreakingNews #ShivSena

 • 27 Sep 2022 12:34 PM (IST)

  बहुमत चाचणीआधीच ठाकरेंचा राजीनामा- कौल

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: 12 जुलैपर्यंत आम्हाला मुदत दिली होती, शिंदेंचे वकील नीरज यांच्याकडून अपात्रतेवर युक्तिवाद, उपसभापतींच्या नोटिसीला आम्ही आव्हान दिलं- कौल, बहुमत चाचणीआधीच ठाकरेंनी राजीनामा दिल्याचाही युक्तिवाद

 • 27 Sep 2022 12:31 PM (IST)

  शिंदे यांना हटवल्यानंतर अपात्रतेची नोटीस- कौल

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: शिंदे यांना हटवल्यानंतर अपात्रतेची नोटीस देण्यात आली, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा युक्तिवाद, मात्र त्याआधी उपसभापतींच्या विरोधात अविश्वास ठराव होता, कौल यांच्या कोर्टात माहिती, अपात्रतेची भूमिका मांडता येणार नाही- कौल

 • 27 Sep 2022 12:29 PM (IST)

  नीरज कौल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: संख्याबळ नसताना शिवसेनेनं व्हीप बजावून बैठक बोलावली आणि शिंदेंना गटनेते पदावरुन हटवलं होतं, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांच्या युक्तिवादाला सुरुवात, शिवसेनेच्या वकिलांच्या युक्तिवाद संपला, शिंदे गटाच्या वकिलांकडून युक्तिवाला सुरुवात

 • 27 Sep 2022 12:23 PM (IST)

  10 मिनिटांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: 10 मिनिटांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात, महाराष्ट्राच्या संघर्षाची सुप्रिम कोर्टात सुनावणी

 • 27 Sep 2022 12:07 PM (IST)

  सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान 10 मिनिटांचा ब्रेक

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: घटनापीठाने कामकाज 10 मिनिटांसाठी थांबवलं, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी, 10 मिनिटांनी पुन्हा सुनावणी सुरु होणार 

 • 27 Sep 2022 12:05 PM (IST)

  अपात्रतेचा मुद्दाच महत्त्वाचा- सिंघवी

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: कोणती खरी शिवसेना? याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकतं का? घटनापीठाचा सवाल! अपात्रतेचा मुद्दाच महत्त्वाचा, तोच आधी ठरवावा लागेल, सिंघवी यांचा युक्तिवाद

 • 27 Sep 2022 12:01 PM (IST)

  चर्चा संपली, पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: न्यायमूर्तींमधील चर्चा संपली, पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात, सिंघवी यांच्याकडून 1972 मधील सादीक अली प्रकरणाचा दाखला, निवडणूक चिन्ह गोठवण्याबाबत दिलेला सादीक अली प्रकरणाचा हवाला देत अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडून युक्तिवाद सुरु

 • 27 Sep 2022 12:00 PM (IST)

  तिसऱ्यांदा सुनावणी थांबवली, न्यायमूर्तींमध्ये चर्चा

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: घटनापीठातील न्यायमूर्तींमध्ये पुन्हा चर्चा, पात्र-अपात्रतेचा मुद्द्यानंतर पुन्हा न्यायमूर्तींची एकमेकांशी चर्चा, सुनावणी पुन्हा तिसऱ्यांदा थांबवली

 • 27 Sep 2022 11:56 AM (IST)

  अपात्रतेचा मुद्दा विधीमंडळाचा- घटनापीठ

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: अपात्रतेचा मुद्दा विधीमंडळाचा आहे- घटनापीठ

  निवडणूक चिन्हा आधी बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय व्हावा, असा शिवसेनेच्या वकिलांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

 • 27 Sep 2022 11:53 AM (IST)

  न्यायमूर्तीमधील चर्चा संपली, सुनावणी पुन्हा सुरु

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: न्यायमूर्तीमधील चर्चा संपली, सुनावणी पुन्हा सुरु, घटनापीठाकडून काही प्रश्नांची विचारणा

 • 27 Sep 2022 11:52 AM (IST)

  घटनापीठाच्या न्यायमूर्तींमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा सुरु

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: सुनावणी काही काळ थांबली, घटनापीठाच्या न्यायमूर्तींमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा सुरु, एक तासापेक्षाही अधिक वेळापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

 • 27 Sep 2022 11:50 AM (IST)

  हे घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखं आहे- सिंघवी

  अपात्रतेसंदर्भात आधी निर्णय व्हावा, सिंघवी यांचाही सिब्बल यांच्याप्रमाणेच युक्तिवाद, बहुसंख्य असल्याचं सांगू शकतात, मात्र ते अपात्र होणार, हे घोड्याच्या पुढे गाडी ठेवण्यासारखं आहे- सिंघवी

 • 27 Sep 2022 11:48 AM (IST)

  'निवडणूक आयोग कोर्टाच्या निर्णयाची वाट का बघू शकत नाही'

  Supreme Court hearing Shiv sena vs Eknath Shinde LIVE: तुमचा मुद्दा कळला, पुढचा मुद्दा सांगा, घटनापीठाचं सिंघवी यांना म्हणणं, निवडणूक आयोग कोर्टाच्या निर्णयाची वाट का बघू शकत नाही, सिंघवी यांचा सवाल

 • 27 Sep 2022 11:45 AM (IST)

  विलिनीकरण केलं नाही तर अपात्रतेचाच विचार : सिंघवी

  विलिनीकरण केलं नाही तर अपात्रतेचाच विचार केला जातो, शिवसेनेचे वकील अभिषेक मनुसिंघवी यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद, सिब्बल आणि सिंघवी यांच्या काही क्षण चर्चा, पुन्हा सिंघवी यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात

 • 27 Sep 2022 11:42 AM (IST)

  शिंदे गटाला विलीन व्हावं लागेल- सिंघवी

  एकाचवेळी कोर्ट आणि निवडणूक आयोगाकडे सुनावणी कशी शक्य? अभिषेक मनुसिंघवी यांचा सुप्रीम कोर्टात सवाल, सगळे मुद्दे एकमेकांशी संबंधित, शिंदे गटाला विलीन व्हावं लागेल, किंवा नवा पक्ष बनवावा लागेल- सिंघवी

 • 27 Sep 2022 11:40 AM (IST)

  मूळ पक्षाबद्दल सूचीत काय आहे? घटनापीठाची विचारणा

  मूळ पक्षाबद्दल सूचीत काय आहे? घटनापीठाची अभिषेक मनुसिंघवी यांना विचारणा, 10व्या सूचीनुसार अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडून व्याख्या वाचून दाखवण्यास सुरुवात, शिवसेनेच्या वतीने सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद

 • 27 Sep 2022 11:38 AM (IST)

  वकील अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात

  10व्या सूचीत 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी, चारही मुद्द्यांचं वाचन सुरु, राजकीय पक्ष आणि इतर बाबींबाबत काय म्हटलं आहे, या बाबतच्या व्याख्या स्पष्ट करण्याचा मनुसिंघवी यांच्याकडून प्रयत्न

 • 27 Sep 2022 11:35 AM (IST)

  बीएमसी निवडणुकीवर स्थगिती- सिब्बल

  मुंबई हायकोर्टानुसार बीएमसी निवडणुकीवर स्थगिती, सिब्बल यांची कोर्टात माहिती, कोणतीही स्थगिती नाही, असं नीरज कौल यांच्याकडून सिब्बल यांच्या दाव्याचं खंडन, ती स्थगिती ओबीसी आरक्षणासंदर्भात, जेटमलानी यांची कोर्टात माहिती

 • 27 Sep 2022 11:29 AM (IST)

  निवडणूक चिन्ह आणि अपात्रतेचा विषय

  घटनापीठाची चर्चा संपली, पुन्हा एकदा युक्तिवादाला सुरुवात

  कपिल सिब्बल यांच्याकडून पुन्हा एका युक्तिवाद सुरु

  निवडणूक चिन्ह आणि अपात्रतेच्या मुद्द्यावर जोरदार युक्तिवाद

  पाच मिनिटांच्या चर्चेनंतर पुन्हा एकदा सिब्बल यांच्याकडून युक्तिवाद

 • 27 Sep 2022 11:23 AM (IST)

  निवडणूक चिन्हाआधी अपत्रातेचा विषय निकाली काढा, शिवसेनेची मागणी

  Supreme court hearing shiv sena vs Eknath Shinde live : 'निवडणूक आयोगाकडे जाऊन आम्ही शिवसेना आहोत, असं ते सांगतात...'

  शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  बंडखोर आमदारावंर अपात्रतेची कारवाई व्हावी, यासाठी सिब्बलांचा युक्तिवाद

  'कोर्टाच्या प्रक्रियेमुळे सदस्यत्वावरच सवाल, त्यामुळे त्यावर आधी निर्णय व्हावा'

  जोपर्यंत सुप्रीम कोर्ट निकाल देत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाकडे जाऊ नये- सिब्बल

  फुटीचा आणि चिन्हाचा संबंध काय? घटनापीठासमोर सिब्बल यांचा सवाल

  सिब्बल यांच्याकडून निवडणूक चिन्हाच्या बाबींचं वाचन सुरु

  सिब्बल यांना घटनापीठानं (constitutional bench decision) थांबण्यास सांगितलं, न्यायमूर्तींकडून आपसाच चर्चा सुरु

  पाहा व्हिडीओ :

 • 27 Sep 2022 11:20 AM (IST)

  "शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही", कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  10 व्या परिशिष्टानुसार शिंदे गटाला विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही

  शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

  10 व्या अनुसूची नुसार त्यांना दुसरा पर्याय नाहीय

  असाही युक्तिवाद त्यांनी केलाय

 • 27 Sep 2022 11:16 AM (IST)

  कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातील ठळक बाबी

  कपिल सिब्ब्ल यांनी केलेल्या युक्तिवादातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या होत्या?

  सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर कपिल सिब्बल यांच्याकडून अपात्रेच्या मुद्द्यावर महत्त्वाची टिप्पणी

  कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातून शिंदे गटाने उचलेल्या पावलांवर गंभीर सवाल

  राजकीय पेच निर्माण करण्यावरुन युक्तिवादादरम्यान नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

 • 27 Sep 2022 11:13 AM (IST)

  ...म्हणून अध्यक्ष अपात्रतेबाबत ठरणार नाही! - सिब्बल

  त्यांचा स्वतःचा अध्यक्ष असल्याने ते अपत्रतेबाबत ठरणार नाही- कपिल सिब्बल

  विधिमंडळात जे आमदार असतात ते पक्षाच्या नियमाप्रमाणे काम करतात

  राजकीय पक्ष व्हीपच्या माध्यमातूनच सदस्यांना आदेश देत असतात

  एखादं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सरकार कसं बनवलं? सिब्बल यांचा सवाल

 • 27 Sep 2022 11:10 AM (IST)

  'या तऱ्हेनं तुम्ही कोणतंही सरकार पाडू शकता'

  या तऱ्हेनं तुम्ही कोणतंही सरकार पाडू शकता!, सिब्बल यांचा महत्त्वपूर्ण युक्तिवाद

  फुटीर आमदार हा मूळ पक्ष कसा असू शकतो?

  शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांचा यांचा घटनापीठासमोर सवाल

  पक्षाच्या बैठकीला आमदार आले नाहीत

  कोणत्या मुद्द्यांवर राज्यपालांनी अधिवेशन बोलावलं? सिब्बल यांचा सवाल

 • 27 Sep 2022 11:06 AM (IST)

  घटनापीठाचा कपिल सिब्बल यांना सवाल

  अपात्रतेबद्दल निर्णय घेतल्याशिवाय इतर गोष्टी ठरवू शकणार नाही?

  घटनापीठाचा कपिल सिब्बल यांना सवाल

  कपिल सिब्बल यांचा सुप्रिम कोर्टात जोरदार युक्तिवाद

  10वं परिशिष्टानुसार अपात्रतेचा निर्णय आधी व्हावा, कपिल सिब्बल यांची मागणी

  शिंदे यांचा गट अवैध असल्याचा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद

 • 27 Sep 2022 11:02 AM (IST)

  सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

  सिब्बल यांचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

  20 जूनपासून सगळ्या गोष्टी सुरु झाल्या- सिब्बल

  घटनापीठासमोर प्रकरण आणण्याची परिस्थिती निर्माण गेली गेली

  10व्या परिशिष्टानुसार फुटीची मान्यता नाही

  जर पक्ष सोडला नव्हता, तर व्हीपचा पालन का केलं नाही?, सिब्बल यांचा सवाल

  बंडखोरींनी पक्षाच्या शिस्तीचं उल्लंघन केल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित

 • 27 Sep 2022 10:43 AM (IST)

  शिवसेनेचं निवडणूक चिन्हावर युक्तिवाद

  शिवसेनेच्या चिन्हावर बाजू मांडा - सुप्रीम कोर्ट

  शिवसेनेनं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण

  धनुष्यबाण चिन्हावर नीरज कौल आणि कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात

  निवडणूक आयोगाकडे कारवाई करावी की नाही, यावरुन युक्तिवाद

  आधी बंडखोर 16 आमदारांच्या अपात्रतेवर आधी निकाल द्यावा, सिब्बल आणि मनु सिंघवी यांचा युक्तिवाद

 • 27 Sep 2022 10:39 AM (IST)

  सुप्रीम कोर्टातील सुनावणीला सुरुवात

  महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीला सुरुवात

  कपिल सिब्बल यांच्याकडून शिवसेनेची बाजू मांडण्यास सुरुवात

  कपिल सिब्बल हे शिवसेनेचे वकील

  निवडणूक आयोगाला कारवाई करण्यास दिली जाणार का? यावरुन युक्तिवाद

  धनुष्यबाण चिन्हाबाबत काय निर्णय होणार? यावर महत्त्वपूर्ण युक्तिवाद

 • 27 Sep 2022 10:33 AM (IST)

  सुप्रीम कोर्टातली सुनावणी लाईव्ह

  शिवसेनेचे नेते सुप्रीम कोर्टात दाखल

  थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार

  सुनावणीचं थेट प्रक्षेपण लोकांना पाहता येणार

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष

  निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती मिळणार की नाही?

  आजच्या सुनावणीतून नेमका काय निर्णय येतो, हे याकडे लक्ष

 • 27 Sep 2022 10:22 AM (IST)

  अनिल देसाई काय म्हणाले...

  राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होतेय

  अनिल देसाई यांची माध्यमांशी बातचित

  सगळ्याच याचिका महत्वाच्या आणि एकमेकांशी सलग्न

  सत्याचा विजय होणार

  आम्हाला न्याय मिळणार

 • 27 Sep 2022 09:44 AM (IST)

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उल्हास बापट लाईव्ह

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उल्हास बापट लाईव्ह

  सुनावणीआधी उल्हास बापट यांची महत्त्वाची प्रतिक्रिया

  आजच्या निर्णयाचे लोकशाहीवर दूरगामी परिणाम होणार

  राज्यपालांची भूमिका घटनेशी विसंगत- उल्हास बापट

  राज्यपालांचे अधिकार आणि तारतम्य काय, हे सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल- बापट

  विधानसभा अध्यक्षांचे अधिकार काय, हे देखील सुप्रीम कोर्टाला ठरवावं लागेल - बापट

  सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पक्षांतर बंदी कायद्याचा दुरुपयोग होत असेल तर त्याचाही उद्देश नीट सुस्पष्ट करण्याची गरज आहे - बापट

 • 27 Sep 2022 09:15 AM (IST)

  राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत आज बैठक

  राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक

  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन

  वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये सकाळी 11 वाजता बैठक होणार

  राज ठाकरे मनसे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार

  आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक

 • 27 Sep 2022 09:10 AM (IST)

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया

  धनुष्यबाण कुणाचं, याचा निकाल आज तातडीने लागेल, याची शक्यता कमी

  ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची आजच्या सुनावणीवर प्रतिक्रिया

  वेगवेगळ्या प्रकरणांची खिचडी झाली आहे, त्यामुळे घटनापीठ तातडीने निर्णय लावण्याची शक्यता कमी

  अनेक प्रकरणांचा संपूर्ण अंगानी घटनापीठासमोर विचार केला जाईल, त्यानंतर निकाल येऊ शकेल

  निवडणूक आयोगाला पुढील कारवाई करण्यासाठी स्थगिती द्यावी की नाही, याचा विचार घटनापीठाला करावा लागणार- उज्ज्वल निकम

  निवडणूक चिन्हाच्या संदर्भातील वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी

  पाच सदस्यांच्या घटनापीठासमोर पार पडणार सुनावणी

 • 27 Sep 2022 09:05 AM (IST)

  मुंबई : डी गँगचा मेम्बर असलेल्या रियाझ भाटीला अटक

  कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याच्या टोळीचा सदस्य आणि जवळचा हस्तक असलेल्या रियाझ भाटीला अटक.

  मुंबई पोलिसांनी केली अटकेची कारवाई

  भाटीने एका व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचा आरोप

  खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून अटकेची कारवाई

  सलिम फ्रुटच्या अटकेनंतर आता रियाझलाही अटक

  रियाझ भाटीच्या अटकेनंतर त्याला आज न्यायालयात हजर केलं जाणार

 • 27 Sep 2022 08:55 AM (IST)

  औरंगाबादेत एटीएसची PFI विरोधात मोठी कारवाई

  औरंगाबाद येथील पीएफआयच्या 13 ते 14 कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

  देश विघातक कृत्याच्या संशयावरून घेतलं ताब्यात

  13 ते 14 कार्यकर्त्यांची एटीएस कडून चौकशी सुरू

  काल दिवसभर आणि मध्यरात्री एटीएस कडून मोठी कारवाई

  13 ते 14 जणांना ताब्यात घेतल्यामुळे औरंगाबाद येथे खळबळ

 • 27 Sep 2022 08:50 AM (IST)

  मोदी जपान मध्ये दाखल

  पंतप्रधान नरेंद्र मोदी जपान मध्ये दाखल

  जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार

  8 जुलै रोजी आबे यांची करण्यात आली होती हत्या

  आज संध्याकाळी जपानमधून पंतप्रधान मोदी भारतात परतणार

 • 27 Sep 2022 08:45 AM (IST)

  NIA ऍक्शन मोडमध्ये! 8 राज्यांमध्ये 25 हून अधिक ठिकाणी छापे

  देशभरात NIA संस्था पुन्हा अलर्ट मोडवर

  आठ राज्यांमध्ये 25 हून अधिक ठिकाणी NIA चे छापे

  कर्नाटक राज्यात 12 पेक्षा जास्त ठिकाणी छापा

  आतापर्यंत सहा जणांना केली अटक

  दोन दिवसांपूर्वी 95 ठिकाणी छापे टाकत 106 जणांना ताब्यात घेतलं

 • 27 Sep 2022 08:35 AM (IST)

  कोरोना प्रतिबंधाबाबत कॅनडाचा मोठा दिलासा

  कोरोना प्रतिबंधाबाबत कॅनडा सरकारचा मोठा निर्णय

  कोरोना संदर्भातले सगळे निर्णय हटवण्याचा कॅनडा सरकारचा निर्णय

  जगभरातील सगळ्या देशातील प्रवाशांना कॅनडामध्ये प्रवेश करता येणार

  भारतातील पर्यटकांना मोठा दिलासा

  विमानतळ आणि स्थानिक पातळीवर असणारे कोरोनाचे निर्बंध 1 ऑक्टोबर पासून हटवले जाणार - कॅनडा सरकारची माहिती

 • 27 Sep 2022 08:25 AM (IST)

  सकाळी 10.30 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालय लाईव्ह

  सकाळी 10.30 वाजल्यापासून सर्वोच्च न्यायालय लाईव्ह

  ऐतिहासिक दिवस! देशातील सर्वसामान्य नागरिकांना सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज पाहाता येणार

  आज तीन महत्त्वाच्या खटल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

  महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष , EWS आरक्षण आणि बार कौन्सिल परीक्षेच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार

  तिन्ही खटल्यांचे थेट प्रक्षेपण संपूर्ण देशवासीयांना पाहता येणार

  सकाळी साडेदहा वाजल्यापासून सुरू होणार थेट प्रक्षेपण

 • 27 Sep 2022 08:15 AM (IST)

  खेडच्या माजी नगराध्यक्षांच्या अडचणीत वाढ

  खेडच्या माजी नगराध्यक्षांच्या अडचणीत वाढ

  खेडचे मनसेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा

  गणेशोत्सवात लकी ड्रॉ स्पर्धेसाठी नियमबाह्य रक्कम केल्याचा ठपका

  खेड पोलिस स्थानकात खेडेकरांविरोधात गुन्हा दाखल

  लकी ड्रॉ स्पर्धेच्या तिकीट विक्रीसाठी धर्मादाय आयुक्त किंवा जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतली नाही आणि नियमबाह्य पैसे जमवल्याचा खेडेकरांवर आरोप

 • 27 Sep 2022 08:05 AM (IST)

  शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी चार हजार एसटींची मागणी?

  शिंदे गटाची दसरा मेळाव्यासाठी चार हजार एसटींची मागणी?

  गाड्या आरक्षित केल्यास नियमित प्रवासी सेवा कोलमडण्याची भीती

  दसरा मेळाव्याला शक्तिप्रदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिदे गटाने कंबर कसली

  मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना आणण्यासाठी वाहने आरक्षित केली जात असल्याची माहिती

  त्यात एसटी गाड्यांचेही समूह आरक्षण करण्यासाठी शिंदे गटाचे आमदार आणि पदाधिकारी सरसावल्याचं वृत्त

  4 हजारांहून अधिक एसटी गाडय़ा आरक्षित करण्यासंदर्भात विचारणा, सूत्रांची माहिती

 • 27 Sep 2022 08:00 AM (IST)

  वर्धा : वाघाच्या हल्ल्यात पशूपालकाचा मृत्यू

  वाघाच्या हल्ल्यात पशूपालकाचा मृत्यू

  वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील बांगडापूर शिवारातील घटना

  होरेश्वर घसाड असं मृत पशूपालकाचं नावं

  गाई चरायला घेऊन गेले होते, पण जिवंत परतलेच नाही

  घरी परतत असताना वाघाने हल्ला करत जंगलात फरफटत नेल्याची घटना उघडकीस

  वाघाच्या हल्ल्यामुळे बांगडापूरमध्ये एकच खळबळ

 • 27 Sep 2022 07:55 AM (IST)

  आजच्या सुनावणीनंतर शिवसेना पुरावे सादर करणार

  धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार? चुरस वाढली!

  आज सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर शिवसेना निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करणार

  निवडणूक आयोगाकडून पुरावे सादर करण्यासाठी शिवसेनेला आजची मुदत

 • 27 Sep 2022 07:50 AM (IST)

  शिंदे गट आणि शिवसेनेकडून लेखी युक्तीवाद सादर

  शिंदे गट आणि शिवसेनेकडून लेखी युक्तीवाद सादर

  सत्ता संघर्षाच्या सुनावणीआधी शिंदे गट आणि शिवसेनेकडून कोर्टात लेखी युक्तीवाद

  युक्तिवादाबाबत कोर्टाच्या टिपण्णीकडे सर्वांचं लक्ष

  आज होणारी सुनावणी लाईव्ह देखील पाहता येणार

 • 27 Sep 2022 07:35 AM (IST)

  आजपासून पुढचे चार दिवस पावसाची शक्यता

  राज्यात पावसासाठी पुन्हा पोषक हवामान

  आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

  पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

  आज धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, हिंगोली या जिल्ह्यांत विजांसह पावसाचा यलो अलर्ट

 • 27 Sep 2022 07:30 AM (IST)

  शिवभोजन थाळी बंद करण्यावरुन शिंदे गटात मतभेद?

  शिवभोजन थाळी बंद करण्यावरुन शिंदे गटात मतभेद- सूत्र

  शिंदे गटाचे आमदार नाराज असल्याने मंत्री आढावा घेणार

  शिंदे गटातील आमदारांचा शिवभोजन थाळी बंद करण्यास विरोध

  'शिंदे गटातील आमदारांचा योजना सुरु ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह'- सूत्र

 • 27 Sep 2022 07:25 AM (IST)

  सोलापूरमध्येही NIAची कारवाई

  सोलापूरमध्येही NIAची पीएफआयविरोधात कारवाई- सूत्र

  सोलापुरातून NIAने एका संशयिताला घेतलं ताब्यात- सूत्र

  ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला दिल्लीला नेल्याची माहिती- सूत्र

  PFIशी संबंधित असल्याने संशयिताला ताब्यात घेतलं...

 • 27 Sep 2022 07:25 AM (IST)

  सोलापूरमध्येही NIAची कारवाई

  सोलापूरमध्येही NIAची पीएफआयविरोधात कारवाई- सूत्र

  सोलापुरातून NIAने एका संशयिताला घेतलं ताब्यात- सूत्र

  ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला दिल्लीला नेल्याची माहिती- सूत्र

  PFIशी संबंधित असल्याने संशयिताला ताब्यात घेतलं...

 • 27 Sep 2022 07:18 AM (IST)

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज घटनापीठासमोर सुनावणी

  शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी होणार

  धनुष्यबाण चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज फैसला

  5 सदस्यीय घटनापीठासमोर सत्तासंघर्षावर सुप्रीम सुनावणी

Published On - Sep 27,2022 7:17 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें