AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Pass | आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास कसा मिळवाल? अर्जाची प्रक्रिया काय?

राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र तरी कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. (How To apply For E-Pass for inter district travel)

E-Pass | आंतरजिल्हा प्रवासासाठी ई-पास कसा मिळवाल? अर्जाची प्रक्रिया काय?
Maharashtra Lockdown
| Updated on: May 31, 2021 | 9:17 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना विषाणू संसर्गाची दुसरी लाट आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र तरी कठोर निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच पुढील 15 दिवस राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अत्यावश्यक कारणांशिवाय आंतरजिल्हा प्रवासाला मनाई करण्यात आली आहे. आंतरजिल्हा प्रवास करायचा असेल तर त्यासाठी ई-पास काढणं बंधनकारक आहे. त्यामुळे प्रवास करणाऱ्या नागरिकांना ई-पास कसा काढायचा, त्यासाठीची नेमकी प्रक्रिया काय, तो डाऊनलोड कसा करायचा, याची माहिती असणं आवश्यक आहे. (Maharashtra Lockdown How To apply For E-Pass for inter district travel)

?ई-पास कसा काढायचा??

ई-पास काढण्यासाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर वेबसाईटवर दिलेल्या सूचना वाचून घ्या. सूचना वाचून झाल्यानंतर तुम्ही ई-पास साठी अर्ज करा या बटनावर क्लिक करा आणि पुढे जा. महाराष्ट्राबाहेर जायचं आहे की नाही यावर क्लिक करा.

?ई-पास मिळवण्यासाठीची प्रक्रिया?

स्टेप 1: जिल्हा किंवा पोलीस आयुक्तालय निवडा. स्टेप 2: तुमचे संपूर्ण नाव नोंद करा. स्टेप 3: प्रवास कोणत्या तारखेपासून ते किती तारखेपर्यंत करणार ते नमूद करा. स्टेप 4: मोबाईल नंबर आणि प्रवासाचे कारण आणि प्रवासाचा उद्देश सविस्तर पणे नोंद करा. स्टेप 5: वाहनाचा प्रकार, वाहनाचा नोंदणी क्रमांक, सध्याचा पत्ता आणि ई-मेल नोंद करा. स्टेप 6: प्रवास जिथून करणार ते ठिकाण, प्रवासाचे अंतिम ठिकाण, सहप्रवासी संख्या नमूद करा. स्टेप 7 : आपण कटेंन्टमेंट झोनमधील आहात का? याविषयी माहिती सादर करा. स्टेप 8: परतीचा प्रवास याच मार्गानं करणार का हे नमूद करा. स्टेप 9: 200 केबी पेक्षा लहान साईजचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती चेक करुन अर्ज सादर करा.

?अर्जासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक??

वैध ओळखपत्र, वैद्यकीय प्रमाणपत्र, लग्नपत्रिका किंवा त्यासंबंधित कागदपत्र, वैद्यकीय कामांसाठी प्रवास करायचा असल्याचे त्यासाठीचा अहवाल किंवा कागदपत्र, मृत्यूचा दाखला, अन्य आपत्कालीन हेतूसंबंधी कागदपत्र आवश्यक आहेत.

?ई-पाससाठी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना?

?शासकीय कर्मचारी/ वैद्यकीय कर्मचारी/ अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना केवळ त्यांचे कार्यालयीन कामकाजाच्या प्रवास करण्याकरिता आंतरजिल्हा किंवा आंतर-शहर प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही ?21 एप्रिल 2021 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार अन्य खासगी व्यक्तींना अत्यंत तातडीच्या आणि अत्यावश्यक कारणांत्सव मुंबई शहराबाहेर अथवा आंतरजिल्हा प्रवास करण्यासाठी ई-पास प्राप्त करणे बंधनकारक असेल ?पास मंजूर करण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार केवळ मुंबई पोलीस आयुक्तालयातील संबंधित परिमंडळीय पोलीस उपआयुक्त कार्यालयाकडे आहे. ?आवश्यक ती कागदपत्र जोडून अर्ज केल्यास अर्जदारास अर्जात नमूद वैध कारणास्तव ई-पास वितरीत करण्यात येईल. ?अत्यावश्यक सेवा/ शासकीय सेवा/ वैद्यकीय सेवांशी संबंधित असलेल्या व्यक्तींना कार्यालयीन कामकाजाच्या प्रवासाकरिता ई पास आवश्यक नाही. त्यांना ओळखपत्रांच्या आधारे प्रवासाची मुभा देण्यात येईल. ?मुंबई शहरात प्रवास करण्यास, अत्यावश्यक आणि शासनाने सूट दिलेल्या कारणांसाठी ई-पासची आवश्यकता नाही. सर्व तपशील योग्यरित्या भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा ?अपलोड करताना सर्व संबंधित कागदपत्र एका फाईलमध्ये एकत्र करा ?फोटोची साईझ 200 केबीपेक्षा जास्त नसावी आणि संबंधित दस्ताऐवजांची साईज ही 1 MB पेक्षा जास्त नसावी ?अर्ज सबमिट केल्यानंतर आपल्याला एक टोकन आयडी मिळेल. ते जतन करा आणि आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासण्यासाठी त्याचा वापर करा ?संबंधित विभागाकडून अर्ज पडताळणी आणि मान्यता मिळाल्यानंतर तुम्ही नमूद टोकन आयडी वापरुन ई-पास डाऊनलोड करु शकता. ?ई-पासमध्ये तुमचे वाहन क्रमांक, ई-पासची वैधता आणि क्यूआर कोड असा तपशील असेल. ?प्रवास करताना आपल्याकडे ई-पासची सॉफ्ट कॉपी/ हार्ड कॉपी सोबत ठेवा आणि पोलिसांनी विचारले असता त्यांना ?आपला ई-पास दाखवा किंवा तुम्ही तो प्रिंट करुन वाहनावर चिकटवू शकता. ?ई-पासची डुप्लीकेट प्रत बनवणे. तसेच वैध तारखेनंतर किंवा अधिकृत परवानगीशिवाय त्याचा वापर करणे किंवा त्याचा दुरुपयोग करणे हा दंडनीय गुन्हा आहे.

?ई-पास कसा डाऊनलोड कराल??

ई-पाससाठी https://covid19.mhpolice.in/ या वेबसाईटवर अर्ज केल्यानंतर संबंधित कार्यालयाकडून मंजुरी देण्यात आल्यानंतर टोकन क्रमांक नोंदवून ई-पास पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करा. आणि प्रिंट आऊट काढून ठेवा. (Maharashtra Lockdown How To apply For E-Pass for inter district travel)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Lockdown : राज्यातील लॉकडाऊन वाढवला, 15 जूनपर्यंत निर्बंध कायम राहणार

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.