Maharashtra News LIVE : तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू
Maharashtra News LIVE : मुंबईत पावसाचं जोरदार कमबॅक झालं आहे. मुंबईतील काही भागात रात्रीपासून पाऊस सुरू आहे. तर अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वसई-विरार भागातही पाऊस सुरू आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
तारेच्या कुंपणात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू
गोंदिया : शेताच्या संरक्षणासाठी लावलेल्या कुंपणात अडकल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील बोरकन्हार येथे हा प्रकार घडला आहे. बिबट्या शिकारीच्या शोधात असताना तो तारेच्या कुंपणात अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.
-
चॉकलेटचे आमीष दाखवून सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, ६० वर्षीय आरोपीला अटक
जालना शहरातील रामनगर मध्ये चॉकलेटचे आमीष दाखवून सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 60 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक झाली आहे. दिनेश सुवर्णकार असे आरोपीचे नाव आहे.
-
-
मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत ‘सेवासंकल्प अभियान’
पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपाने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंत ‘सेवासंकल्प अभियान’ सुरु करणार असल्याची घोषणा गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष अभियान राबवलं जाणार आहे. 17 सप्टेंबरपासून 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान संपूर्ण देशात राबवले जाणार आहे. मोदींनी सलग 25 वर्षे जनसेवा केली, या निमित्ताने हे सेवा संकल्प अभियान राबवलं जाणार असून, या अभियानात 12 विशेष कार्यक्रम राबवले जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे.
-
शरद पवार आणि रोहित पवार पुण्यात एकाच मंचावर
शरद पवार आणि रोहित पवार पुण्यात एकाच मंचावर.
मराठा बिझनेस कमुनिटीचा इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो 2027 चा शरद पवार यांच्या हस्ते शुभारंभ
पुण्यातील सारथी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन
कार्यक्रमाला आमदार रोहित पवार यांची देखील उपस्थिती
-
-
कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत
कल्याण रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड, मध्य रेल्वे विस्कळीत,
प्लॅटफॉर्म १ आणि २ वरील लोकल वाहतूक ठप्प
कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड
लोकल रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम
डोंबिवलीहून कसाऱ्याकडे जाणाऱ्या लोकलच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर मोठी गर्दी
काही लोकल गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय
-
येवल्यात अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू
नाशिक : येवल्यात अहिल्यानगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. फत्तेबुरुज नाका परिसरात भरधाव वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने दुचाकीस्वारांना चिरडले आहे. या अपघातात कोपरगाव येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
-
-
नाशिकमध्ये इगतपुरी येथे मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात कंटेनर पलटी
नाशिकमध्ये इगतपुरी येथे मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात कंटेनर पलटी झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झालाय. अपघातात चालक जखमी झाला आहे. कंटेनर भर रस्त्यात पलटी झाल्याने वाहतुक एकेरी मार्गाने सुरू आहे.
-
मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू होताच फुलांचे दर गगनाला भिडले
मुंबईत गणेशोत्सवाची लगबग सुरू होताच फुलांचे दर गगनाला भिडले… 20 ते 30 रुपये किलोचा झेंडू आता 120 रुपयांवर…. तर जास्वंदीच्या एका फुलासाठी मोजावे लागतायत 10 रुपये…
-
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा… गणेश गल्लीच्या बाप्पाचा पहिला लूक समोर… बाप्पाचे विलोभनीय आणि आकर्षक रूप पाहण्यासाठी मंडपात भाविकांची मोठी गर्दी
-
आम्ही मुंबईला जाणार, शांततेत आंदोलन करणार- जरांगे
आम्ही मुंबईला जाणार, शांततेत आंदोलन करणार.. मुंबई पोलिसांनी परवानागी नाकारल्यानंतरही जरांगे ठाम… आम्हाला गोळ्या घालून मारण्याचं सरकारचं षडयंत्र, जरागेंचा आरोप
-
सिद्धार्थ गोरेच्या मृत्यूनंतर नाशिक महापालिकेसमोर आंदोलन
सिद्धार्थ गोरेच्या मृत्यूनंतर नाशिक महापालिकेसमोर आंदोलन… मृतदेह महापालिकेसमोर ठेवत कुटुंबीय आणि नागरिकांचा आक्रोश… पाईपलाईन कामातील निष्काळजीपणामुळे सिद्धार्थचा मृत्यू झाल्याचा आरोप… सिद्धार्थ नगर झोपडपट्टी परिसरात रात्री भीषण अपघात झाला होता
-
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी नाकारली. आझाद मैदान पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली. गंगाधर काळकुटेंच्या नावाने दिलं होतं पत्र. जरांगे आझाद मैदानात 19 तारखेला करणार होते आंदोलन. मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम. नियमांचा भंग होत असल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली
-
प्लास्टिकच्या फुलांनी झेंडू बाजारावर मारला परिणाम; विक्रमी आवकेमुळे कल्याण APMC मध्ये फुलांचे भाव कोसळले!
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कल्याण APMC फुल मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांची विक्रमी आवक झाली. शेतकऱ्यांनी आणलेल्या फुलांच्या ट्रक व पिकअप वाहनांच्या लांबच लांब रांगा मार्केट परिसरात लागलेल्या पाहायला मिळाल्या. दरवर्षी १५० ते २०० रुपये किलोपर्यंत जाणाऱ्या फुलांना यंदा शेतकऱ्यांना अवघा १५ ते २० रुपये दर मिळत आहे. व्यापाऱ्यांकडून हीच फुले ४० ते ५० रुपये किलो दराने विक्री केली जात असल्याचे चित्र आहे. प्लास्टिकच्या फुलांचा वाढता वापर, ग्राहकांची घटलेली संख्या आणि पावसाचा परिणाम यामुळे नैसर्गिक फुलांच्या मागणीत घट झाली आहे. आवक जास्त आणि मागणी कमी असल्याने शेतकरी व फुलव्यापाऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागत आहे.
-
वडगावशेरी मधील मराठी माध्यमाची शिवराज विद्यामंदिर शाळा महानगरपालिकेने पाडल्याने शाळेतील विद्यार्थी पालक यांचे आंदोलन….
कर्नाटक मधून आलेली एक बाई महाराष्ट्रातल्या मराठी शाळे विरोधात तक्रार करते आणि त्या तक्रारीवरून महापालिका शाळा पाडते हे वेदना देणार आहे. चाळीस वर्षांमध्ये या शाळेने अनेक विद्यार्थ्यांना घडवलं आहे. ही शाळा वाचली पाहिजे प्रतिक्रिया पालक व्यक्त करताय तर मराठी शाळा वाचल्या पाहिजेत असं म्हणतात मात्र आमच्या डोळ्यात एकच आमची शाळा पाडली याचं दुःख होत आहे. माझं दहावीचं वर्ष आहे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे.
-
जरांगेंची वडेट्टीवारांवर टीका
माझ्याविरोधात बोलल्यावर ओबीसी मंत्री जवळ करतात. पण समाजाचे लेकरं उपाशी मरत आहेत त्याचे काय, आपल्या लेकरासाठी माती, विष खावा पण त्यांचे पैसे खाऊ नका. पोरांना मार्क कमी पडले तर आई बाप कोपऱ्यात बसून रडत आहे आणि तुम्ही मला बोलून विरोधी नेत्याजवळ जाऊन बसता, अशी टीका जरांगे यांनी वडेट्टीवारांवर केली.
-
मी तुम्हाला शरण नाही जाणार -मनोज जरांगे
फडणवीस यांनी बाजी मारत 58 लाख नोंदी लागू केल्या, 4 सर्टिफिकेट दिले तर मग आमचे आणि फडणवीस यांचे चांगले होईल. मग बावनकुळे, वगैरे यांचे काय होईल. मी अजून सांगतो चौकशीने मीं घाबरणार नाही. मी मरण पत्करेन. मी माझा गाळा कापून घेईन पण मी तुम्हाला शरण नाही जाणार, असे जरांगे म्हणाले.
-
मनोज जरांगे पाटील यांची शिंदे यांच्यावर टीका
वाशीला गेल्यावर राजपत्र घेऊन आलो तेव्हा मराठे गोड वाटले. तेव्हा शिंदे साहेबांचा सन्मान केला तेव्हा गोड वाटले. शिंदे यांनी आपल्या एका मंत्र्याला सांगितले पाहिजे होते की सर्टिफिकेट रद्द कां केले म्हणून, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी केली.
-
19 ला आझाद मैदानात उपोषणाला बसणार -मनोज जरांगे
मी 19 ला आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे. आमच्या मागे न्याय देवता आहे आम्ही कायद्याला मानतो फडणवीस कायद्याला, न्याय देवतेला मानत असतील तर परवानगी देतील. मी जे आंदोलन करतोय त्याला अटी शर्थी घाला. मागीलवेळी वाशीला गेल्यावर परवानगी दिली. जर आम्हाला परवानगी 18 ला दिली आणि 19 आंदोलन करा म्हणाले तर आम्ही तिथे कसं पोहोचणार, असे जरांगे पाटील म्हणाले.
-
मंत्री गेले उडत- मनोज जरांगे
मी कोणती शिवराळ भाषा वापरली. सरकारचा नामर्दपणा दिसतोय ते मान्य करा ना. वर्षभर मी फडणवीस, 3 वर्ष शिंदे यांना काय बोललो कां? पण आता तुम्ही राजकारण केलात तर मीं असंच बोलणार. मंत्र्यांना चांगलं बोलले, मैत्री ठेवली तर ते मदत करतील म्हणे. गेले उडत ते मंत्री, असंच बोलणार आहे, असे जरांगे म्हणाले.
-
माझा समाज मला तुकडे घालेल-मनोज जरांगे
तुम्ही किती चौकश्या केल्या तरी फरक पडत नाही. माझ्या सहकाऱ्यांनाही मी सांगितले आहे की तुमच्या मागे चौकश्या लागतील. सोडायचे असेल तर मला सोडा. पण ते म्हणाले सोबत राहतो. मला आणि सहकाऱ्यांना समजा तुकडे घालेल, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
-
मनोज जरांगे पाटील यांची बावनकुळे यांच्यावर टीका
मनोज जरांगे पाटील यांची बावनकुळे यांच्यावर टीका केली. ते बाईच्या पदराआडून डाव टाकत आहेत. अधिकारी आता शनिवारी, रविवारी अधिकारी आता काम करू लागले.शनिवारी दुपारपासून काम न करणारे अधिकारी आता काम करू लागले. शेतकरी गेल्यावर अधिकारी सांगतात आज सुट्टी आहे पण आता रविवारी अधिकारी काम करू लागले प्रसाद लाडमुळे बावनकुळे तुला सोडले होते. आंदोलन काळात चौकश्या कां? हे सगळ्यांना कळते.
-
सरकारला आठ दिवस संधी आहे-मनोज जरांगे पाटील
15 सप्टेंबरला मुंबईला निघतोय. गरीब मराठ्यांची कदर सरकारला नाही. लोकशाही मार्गाने शांततेत उपोषण सुरू होईल. बळीराजा संकटात होता मात्र कालपासून पाऊस सुरू झाला त्यामुळे आनंदी आहोत. शेतीची कामे संपलीत आणि पाऊस आला त्यामुळे आनंद होईल. पाऊल आहे आणि शेती काम नाही त्यामुळे मराठे मुंबईत येणार आहे
-
मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आज निशाणा साधला. सरकारला गोरगरिब लोकांची चिंता नाही, असे ते म्हणाले. बळीराजा शेतकरी संकटात सापडला होता. पण पावसामुळे तो आंनदीत झाला आहे, असे ते म्हणाले
-
बाप्पाच्या सजावटीसाठी अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये भाविकांची सकाळपासून तुफान गर्दी
गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी अमरावतीच्या बाजारपेठेमध्ये भाविकांची सकाळपासून तुफान गर्दी….बंदी असूनही आर्टिफिशियल प्लास्टिकची फुले, हार बाजारपेठेत विक्रीसाठी….गणेशोत्सवाचा उत्साह भाविकांमध्ये पोहोचला शिगेला…वेगवेगळ्या मखर ,रंगीबिरंगी फुलं, लाइटिंग कडे भाविकांचा कल..
-
अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर
केंद्रीय अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. सह्याद्रीवर अर्धा तास चर्चा झाली आहे.
-
एकनाथ शिंदे अमित शाह यांची सह्याद्रीवर भेट झाली
एकनाथ शिंदे अमित शाह यांची सह्याद्रीवर भेट झाली आहे. सह्याद्री अतितीगृहावर अर्धा तास चर्चा झाली आणि नंतर गाडीतून एकत्र प्रवास केला.
-
अमित शाह दोन दिवस मुंबईच्या दौऱ्यावर असणार
* लालबागचा राजाचे दर्शन घेतील त्यानंतर आता बाजूला चिंचपोकळीचा चिंतामणी तिकडे देखील जाणार आहेत कारण ते आधार गौतम अडाणी यांनी घेतला आहे त्याच्यामुळे उद्योगपतींच्या गणपती साठी त्यांना जावं लागेल त्यासाठी ते व्यवस्थेसाठी थांबले आहेत ते सुद्धा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे * जरांगे पाटील यांचा कालचा कार्यक्रम मी पाहिला ते मुंबईला धडकणार आहेत बीडला येतील नंतर श्रीगोंदा मी त्यांचा दौरा पाहिला आणि कोर्टाने सांगितला आहे त्यांना आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यांच्यामुळे ते आंदोलन करत आहेत मला आश्चर्य वाटत आहे त्यांच्याशी चर्चा होत नाही चर्चा न होण्याच्या पहिल्या कारण असा आहे की त्यांची भाषा चांगली नाही ते थोडी शिवराळ भाषा वापरतात त्यांच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करता येत नाही असं सरकारचं म्हणणं आहे सरकारच्या काही मंत्र्यांनी हे असं वारंवार सांगितलं आहे * हेच जर कारण असेल तर पुण्यामध्ये एक विद्यानंद बापट आहेत ते अत्यंत संस्कारी भाषेत त्यांच्या आंदोलन करत आहेत म्हणजे विद्यानंदा बापट यांचा एक आदर्श आहे मराठी भाषा संदर्भात सभ्य संस्कारी भाषा वापरतात पण ही भाषा वापरली म्हणून त्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत का उलट सभ्य संस्कारी आणि सुसंस्कृत भाषा वापरली म्हणून त्यांच्यावर सरकार पुरस्कृत गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला सध्या भाषा वापरणाऱ्या विद्यानंद बापट यांना धमक्या येत आहेत त्यांना परवाच्या मोर्चाला बाहेर पडू दिलं नाही ही संस्कारी आणि सुसंस्कृत भाषेचा हे मोल आहे मग जरांगे पाटलांनी जर भाषा वापरली त्याच्यामुळे सरकारचा एवढा जळ फळात व्हायचं कारण नाही विद्यानंद बापट त्यांची सुसंस्कृत भाषा वापरत आहे ती तुम्ही स्वीकारा त्यांच्या मागण्या मान्य करा तुम्ही तेही करत नाही * सरकारला जी भाषा कळते ज्याला ती भाषा कळते ती भाषा वापरावी असं मानवी बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले सरकारला जर शिवि भाषा कळत असेल तर ती भाषा वापरायला पाहिजे सरकारमध्ये अर्धे लोक भ्रष्ट आणि गुंडा आहेत त्यांना कोणती भाषा वापरणार
-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांची भेट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज हॉटेल फेअरमोंट येथे प्रिन्स रहीम आगा खान पंचम यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत मंत्री आशीष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोढा हे देखील उपस्थित होते. या महत्त्वाच्या भेटीदरम्यान विविध विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे
-
अमित शाह दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार
अमित शाह द एशियाटिक सोसायटीमध्ये दाखल झाले आहे. अमित शाह दोन दिवस मुंबई दौऱ्यावर असणार आहे.
-
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी जोरदार पावसाची हजेरी
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळी जोरदार पावसाची हजेरी. पावसामुळे जरांगे पाटलांच्या आंदोलनस्थळावरील मंडपात काही प्रमाणात पाणी साचले. मंडपात पाणी गळत असल्याने आंदोलकांची काही प्रमाणात अडचण
-
गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात वाढ
गोसेखुर्द धरणाच्या विसर्गात वाढ. गोसेखुर्द धरणाचे ७ दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. धरणातून ३३ हजार ८७६ प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग.
-
शिरवणे गावात तरुणाची निर्घृण हत्या
स्थानिक शिरवणे गावातील ‘सनराईज हॉटेल अँड लॉजिंग बोर्डिंग’च्या आवारात दोन तरुणांमध्ये झालेल्या भीषण वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनराईज हॉटेलच्या जवळ दोन तरुणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वादादरम्यान एका तरुणाच्या हातात बांबू आणि धारदार हत्यार सदृश वस्तू दिसून येत होती. हा वाद विकोपाला जाऊन एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस ठाण्यात त्यांची सखोल चौकशी व विचारपूस सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधला असता, त्यांनी कर्तव्यावर असल्याचे सांगत अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
-
कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दहीहंडी
कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दहीहंडी. हेक्टरी एक लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांना देऊन तात्काळ कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. भोकर पाटीवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुष्काळग्रस्तांची दहीहंडी सुरू. दीड महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे पीक होरपळत असतांना लोकप्रतिनिधी शासनकर्ते शेताकडे फिरकत नसल्याने शेतकरी आक्रमक. शेतकऱ्यांच्या घरात दहीहंडी करायला दूध तूप नसल्याने सडलेल्या करपलेल्या पिकांची शेतकऱ्यांकडून दहीहंडी.कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. लोकप्रतिनिधिकडून दुष्काळात दहीहंडीच्या नावाखाली महिला नाचवून पैश्यांची उधळपट्टी केली जात असल्याने शेतकरी आक्रमक.
-
वाशिममधून महत्त्वाची बातमी समोर
वाशिम जिल्हा परिषदेच्या मानोरा तालुक्यातील पोहरादेवी उर्दू शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकावर दहशतवाद विरोधी पथकाने गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेकडून या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मोहम्मद फुरकान शेख हसन असं या शिक्षकाचे नाव असून तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथला रहिवासी आहे. १९ जून २०२४ ते २२ जून २०२४ या कालावधीत पुसद इथं इस्लामिक युथ फेडरेशन अर्थात IYF या संघटनेनं लहान मुलांसाठी ‘कारवा ए उकाब’ कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, या कार्यक्रमात मुलांना धार्मिक तेढ निर्माण करणारं प्रशिक्षण दिल्याचा या शिक्षकावार आरोप आहे. या प्रकरणी शिक्षक मोहम्मद फुरकान आणि अन्य पाच जणांविरोधात काळाचौकी पोलीस ठाणे मुंबई इथं भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. जिल्हा परिषदेने निलंबन करतांना कर्तव्यात कसूर करणे, जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणे, देशद्रोह कटात सहभागी होणे, लहान मुलांना सांप्रदायिक द्वेशाचे बीजारोपण करणे आणि मुख्यालय वास्तव्यास न राहणे. अशा आरोपात दोषी आढळल्यानं निलंबनाची कारवाई केली आहे.
-
गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असताना रात्रीपासून पडलेल्या पावसाने विघ्न
गणरायाच्या आगमनाला अवघे काही तास उरले असताना रात्रीपासून पडलेल्या पावसाने विघ्न निर्माण केले आहे. नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातील फुलमार्केट, बाजारपेठ पाण्याखाली गेल्याने फुल, फळ विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुकानात, रस्त्यावर, सोसायटी मध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सकाळ पासून लगभग करणाऱ्या आणि साहित्य खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे.
-
विरेंद्र द्विवेदी यांच्या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे द्विवेदी यांच्या मिञांची मागणी….
विरेंद्र द्विवेदी या सॉफ्टवेअर इंजिनिअरच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या १९ वर्षांच्या ईशान विशाल शेठिया या तरुणाला अटक न करता फक्त नोटीस बजावून पोलिसांनी दिल सोडून….अपघातानंतर ईशांत पळून गेला नाही आणि त्याने स्वतःच्या गाडीतुन विरेंद्र द्विवेदी यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यामुळे त्याला अटक करण्याची गरज नाही असं पोलिसांनी म्हटलंय. मात्र विरेंद्र द्विवेदी यांच्या मित्रांनी यांवर आक्षेप घेत सखोल चौकशीची मागणी केलीय. अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तरुणाला फक्त नोटीस बजावून सोडून दिल्याने चुकीचा संदेश जाईल असं विरेंद्र द्विवेदी यांच्या मित्रांचं म्हणणं आहे.
-
जळगावच्या फत्तेपूरजवळ बसची मालवाहू वाहनाला जोरदार धडक
जळगावच्या फत्तेपूरजवळ बसची मालवाहू वाहनाला जोरदार धडक झाली आहे. या घटनेत मालवाहू वाहनातील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोनजण जखमी झाले आहेत.
-
विसर्जन कुंडातील दुर्गंधीयुक्त पाणी आद्यप न काढल्याने मनसे विद्यार्थी सेना आक्रमक
सोलापुरात गणपती घाटावरील विसर्जन कुंडातील दुर्गंधीयुक्त पाणी आद्यप न काढल्याने मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. गणपती आगमनाला एक दिवस बाकी असूनही महापालिकेकडून अद्याप विसर्जन कुंडांची स्वच्छता करण्यात आली नाही. गणेशोत्सवात दीड दिवसाचे गणपती कसे आणि कुठे विसर्जन करणार असा सवाल मनसे विद्यार्थी सेनेने केलाय.
-
वर्ध्यातील रायपूर येथील वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू
वर्ध्यातील रायपूर येथील वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. घटनेला सुमारे ८० तासांचे वर कालावधी उलटूनही मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले नाहीत. मृतकाच्या परिवारास एक कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, कुटुंबातील एकास शासकीय नोकरी द्यावी, वाघाचा बंदोबस्त करावा, ग्रामपंचायत हद्दीत घरकुल द्यावे, वाघाला जीपीएस चीप लावाव्या आदी गावकऱ्यांच्या मागण्या आहेत.
-
वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजमधुन 22 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग
गोंदिया जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ. गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वैनगंगा नदीवरील धापेवाडा बॅरेजमधुन 22 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग
-
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगावत एफडीएची मोठी कारवाई
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जळगाव आणि पाचोरा शहरात छापा टाकून एफडीएची मोठी कारवाई. जळगाव शहरातील अग्रवाल वेफर्स व नमकीन येथे तसेच पाचोऱ्यातही दोन ठिकाणी छापे टाकून पथकाने बनावट साठा थेट नष्ट केला आहे.
-
भांडूप पोलिसांची मोठी कारवाई, कोट्यवधींचा गुटखा जप्त
भांडुप पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी गणेशोत्सव काळात होणारी गुटख्याची विक्री रोखण्यासाठी कोट्यावधींचा गुटखा जप्त केला. गुटख्याने भरलेला कंटेनर भांडुप पोलिसांनी पकडला. अन्न व औषध प्रशासन आणि भांडुप पोलिसांकडून मुद्देमालसह आरोपींना अटक केली.
-
सोलापूरच्या विंचूर गावात गॅस सिलेंडरचा स्फोट
दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर गावात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे . सुदैवानं स्फ़ोटात कोणतीही जीवितहानी नाही मात्र घरांचे नुकसान झालं. गॅसच्या स्फोटामुळे तीन घरांना आग लागली. दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही, मात्र घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गॅसचा स्फोट होताना आवाज मोठा आल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण पसरलं.
-
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांकडून आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज
मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज केला आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आझाद मैदानात पोलीस स्टेशनमध्ये अर्ज केला आहे. आता त्यांनी अर्ज केल्यानंतर पोलिसांकडून परवानगी मिळते का, हे पाहावे लागेल. परंतु त्याआधीच मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आझाद मैदानावर येऊन उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे.
-
नाशिकमध्ये आंघोळ करताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू
नाशकात स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना शॉक लागून 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तेजस संजय जगताप असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रिसॉर्टमधील स्विमिंग पूल मध्ये आंघोळ करत असताना शॉक लागून मृत्यू झाला. तरुणाच्या शरीराचा उच्चदाबाच्या विज तारेला स्पर्श झाल्याने जोरदार शॉक बसला. शॉक लागल्यानंतर जिल्हा रुग्णालयाचे विचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले .
-
जळगावात भीषण अपघात, कारच्या धडकेत गणेश मंडळाने उभारलेला मंडप कोसळला
जळगावच्या रिंग रोड परिसरात भरधाव चार चाकीने दिलेल्या धडकेत गणेश मंडळाने उभारलेला मंडप कोसळला. अजय कॉलनी गणेश मित्र मंडळाच्या उभारलेल्या मंडपाला अज्ञात चारचाकी ने धडक दिल्याने मंडप कोसळल्याची घटना घडली आहे. मंडपाला धडक दिल्यावर तसेच मंडप कोसळून पडल्यावर झाल्यावर चारचाकी चालक घटनास्थळावरून फरार झालाय.
-
जळगाव जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी, शेतकऱ्यांच्या पिकांना जीवदान
जळगाव शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. जळगाव जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १६.५ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात तब्बल महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शेतांमध्ये माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. गेल्या 24 तासांपासून झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील तापमानात देखील घट झाली.
-
पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आशा बुचके यांचे निधन
जुन्नर तालुक्यातील महिला नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या माजी गटनेत्या आणि भाजपा नेत्या आशा बुचके यांचे निधन झालं. त्यांच्या निधनाने जुन्नरच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
-
लक्ष्मण हाकेंशी झटपट करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
-सोलापूरच्या पाकणी फाटा येथे OBC नेते लक्ष्मण हाकेंशी झटपट करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधित दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेपूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि संबंधित तरुणाच्या शाब्दिक वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हाकेंसोबत शाब्दिक वाद घालणारे दोघेही लातूर जिल्ह्यातील चाकूरचे रहिवासी असून ऍड. प्रकाश सोमवंशी आणि चंद्रकांत एकनफळे अशी त्यांची नावे आहेत.
राज्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईसह विविध भागात पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई शहरातील विविध भागात पावसाच्या सरी कोसळल्या. मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर कांदिवली-मालाड पश्चिम परिसरात काल रात्रीपासून अधूनमधून पाऊस पडत आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.
गणेशोत्सवात विरारहून गावाकडे जाणाऱ्या कोकणकरांचे सलग पडणाऱ्या पावसाने हाल सुरू झालेत. विरारकडून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे. यामुळे अनेक वाहनांना कसरत करावी लागत आहे. या पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनांची गती मंदावली आहे. तसेच अनेक वाहनांना साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे. अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून पडायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे. यासहित शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात बुलढाणा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यासहित विविध भागातील सर्व अपडेट जाणून घ्या
Published On - Sep 13,2026 9:03 AM
