AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मेटाचे अधिकारी पुढील आठवड्यात भारतात येणार

| Edited By: | Updated on: Aug 01, 2026 | 8:52 AM
Share

Maharashtra News LIVE : राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. अनेक भागात कोसळधार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू आहे. मुंबईसह परिसरात पावसाने दमदार सुरुवात केली आहे. भिवंडीत इमारत कोसळली आहे. तर राज्यसभेतही सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर झाले आहे.

Maharashtra News LIVE :  मेटाचे अधिकारी पुढील आठवड्यात भारतात येणार

Maharashtra News LIVE : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट दिल्याने शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भिवंडीत चार मजली इमारत कोसळली आहे. बचावकार्य सुरू आहे. ढिगाऱ्याखाली 5 ते 6 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आले आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोलीत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. अमरावतीमधील मेळघाटत पावसामुळे अनेक भाग पाण्याखाली गेला आहे.

लोकसभेनंतर राज्यसभेतही सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. आता नवीन कायद्यानुसार पेपरफुटीप्रकरणात दोषींवर कडक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. राज्यसभेतही काल जोरदार हंगामा झाला. पेपरफुटीत भाजपचे 8 जणांचा समावेश असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. पेपर लीक करणाऱ्या गँगला सोडणार नाही असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले. त्यांनी काल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली. मोदींनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खर्गे यांनी केली. तर जंतरमंतरवरील आंदोलकांवर कारवाई न करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 31 Jul 2026 06:51 PM (IST)

    अंकित शर्मा हत्या प्रकरणात ताहिर हुसेन आणि इतर पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा

    फेब्रुवारी 2020 मध्ये दिल्लीत दंगली उसळल्या होत्या. यात आयबी अधिकारी अंकित शर्मा यांची हत्या झाली होती. या प्रकरणात दोषी ठरल्यानंतर, माजी नगरसेवक ताहीर हुसेन यांना आता करकरडूमा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ताहीर यांच्यासोबत अदनान, जावेद, नाझिम आणि कासिम यांनाही जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • 31 Jul 2026 06:42 PM (IST)

    पुण्यातील एकता नगर परिसरात शिरले पाणी

    पुण्यातील एकता नगर परिसरात पावसाचे  पाणी शिरले. इतकंच काय तर मुठा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  तर खडकवासला धरणातून 43 हजार 500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

  • 31 Jul 2026 06:34 PM (IST)

    जम्मू-काश्मीर: पाकिस्तानी पाळत ठेवणारा ड्रोन लष्कराने पाडला

    भारतीय लष्कराने जम्मू आणि काश्मीरच्या खौर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी पाळत ठेवणारा ड्रोन पाडला आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, हा ड्रोन भारतीय लष्कराच्या महत्त्वाच्या तळांच्या अगदी जवळून उडत होता.

  • 31 Jul 2026 06:19 PM (IST)

    एफसीआरए विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर केले जाईल

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार पुढील आठवड्यात संसदेत एफसीआरए विधेयक सादर करणार आहे. गृहमंत्री अमित शाह हे विधेयक सादर करतील. ते चर्चेलाही प्रतिसाद देतील.

  • 31 Jul 2026 06:08 PM (IST)

    मेटाचे अधिकारी पुढील आठवड्यात भारतात येणार

    मेटाचे अधिकारी पुढील आठवड्यात भारतात भेट देणार आहेत. सरकार कंपनीला अल्गोरिदममधील पक्षपाताबाबत प्रश्न विचारणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कंपनीच्या भूमिकेबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातील. अधिकारी संसदीय स्थायी समितीसमोरही हजर होतील.

  • 31 Jul 2026 04:54 PM (IST)

    बुलढाणा : मलकापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग बंद

    बुलढाणा जिल्ह्यात पडणाऱ्या मुसळधार पावसाने येळगाव धरण 100 टक्के भरले असून पैनगंगा नदीला पूर आला आहे. यामुळे या नदीवर असलेला मलकापूर सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली आहे. मात्र पुराच्या पाण्यातून अनेकांचा जीवघेणा प्रवास पाहायला मिळाला आहे.

  • 31 Jul 2026 04:40 PM (IST)

    जळगावातील भडगाव तालुक्यातील नालबंदी गावात अचानक पूर

    जळगावच्या भडगाव तालुक्यातील नालबंदी येथे आज मुसळधार पावसानंतर अचानक पूरस्थिती निर्माण झाली. गावाजवळील नाल्यांना आलेल्या पाण्यामुळे पुराचे पाणी शाळेत शिरले आणि शिक्षक इम्तियाज खान हे शाळेच्या गच्चीवर अडकले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी धाडस दाखवत तात्काळ बचावकार्य करून त्यांना सुखरूप बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अचानक आलेल्या पुरामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले झाले होते.

  • 31 Jul 2026 04:24 PM (IST)

    जळगाव : गिरणा धरणाचे चार दरवाजे उघडले

    जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाचे चार दरवाजे उघडले आहेत. गिरणा धरणाच्या उगमस्थळी जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक सुरू आहे. गिरणा धरणातून चार हजार 952 क्युसेस एवढ्या पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

  • 31 Jul 2026 04:12 PM (IST)

    मंत्रालयाच्या कँटिनबाबत हायकोर्टाकडून FDA ला वार्निंग, तुकाराम मुंडेंच्या भूमिकेकडे लक्ष

    मंत्रालयाच्या कँटीनमध्ये साधा एक कीटकही आढळला नसल्याचा दावा एफडीएच्या वतीने हायकोर्टात करण्यात आला होता, मात्र तपासणीमध्ये या कँटीनमध्ये माश्या आढळून आल्या आहेत, त्यावर आता हाय कोर्टाने एफडीएला दोन पर्याय दिले आहेत. एक तर मंत्रालयाच्या उपहारगृहाचे लायसन्स सस्पेंड करा किंवा केळ्यांवर फक्त काळे डाग आहेत म्हणून कारवाई केलेले लायसन्स रद्द केलेली ऑर्डर मागे घ्या. कायदा नियम हा सगळ्यांना समान असायला हवा, त्यात व्हीआयपी कल्चर असायला नको. व्हीआयपी लोकांसाठी तर कायदा अजिबात मोठा असायला नको. आम्ही एफडीएच्या अधिकाऱ्यांना आता वॉर्निंग देत आहोत यावर सविस्तर स्पष्टीकरण हवे आहे असं कोर्टाने म्हटले आहे.

  • 31 Jul 2026 02:55 PM (IST)

    धाराशिवमध्ये विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन

    शाळेत गणित विज्ञानचे शिक्षक नाहीत म्हणून विद्यार्थी आणि ग्रामस्थांचे जिल्हा परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन. गेली चार वर्षापासून परंडा तालुक्यातील सोनारी जिल्हा परिषद शाळेला शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थी ग्रामस्थ आक्रमक. शिक्षकांची नियुक्ती केल्याशिवाय उठणार नाही म्हणत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या केबिन समोर आंदोलन

  • 31 Jul 2026 02:40 PM (IST)

    सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ

    कोयना आणि वारणा धरणातून केला जाणाऱ्या विसर्ग मुळे सांगलीच्या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ होत आहे. वारणा धरणातून 7 हजार क्यूसेक्सने पाणी नदी पात्रात विसर्ग करण्यात येत आहे. तर कोयना धरणातून 6 हजार क्यूसेक्सने विसर्ग कृष्णा नदीत सोडण्यात आला आहे. कृष्णा आणि वारणा नदी पात्रा बाहेर पडू लागली आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्याने शेतीच नुकसान होत आहे. प्रशासन कडून नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचं आव्हान करण्यात आले आहे.

  • 31 Jul 2026 02:29 PM (IST)

    करमाळा तालुक्यातील जेऊर-पोफळज दरम्यान हुतात्मा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

    करमाळा तालुक्यातील जेऊर ते पोफळज रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या हुतात्मा एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. या अचानक झालेल्या बिघाडामुळे ही रेल्वेगाडी तब्बल अर्धा तास जागीच थांबून राहिल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

  • 31 Jul 2026 02:23 PM (IST)

    अमोल महाडिक करणार काँग्रेस पक्षात प्रवेश

    एअर इंडिया मधे कार्यरत असलेले माजी पायलट अमोल महाडिक थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. अमोल महाडिक यांच्या पत्नीचा अपघात अहमदाबाद विमान अपघातात झाला होता. अमोल महाडीक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे भाचे आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडणार आहे

  • 31 Jul 2026 02:10 PM (IST)

    ठाणे महानगरपालिकेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक सुरू

    ठाणे महापालिका आयुक्त आणि अधिकारी यांच्या सोबत ठाणे महानगरपालिकेमध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक सुरू. ओवळा माजिवाडा विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामें आणि प्रकल्प आढावा बैठक सुरू…

  • 31 Jul 2026 02:02 PM (IST)

    FDA अधिकारी आणि वकिलांची टीम आता विधानभवनाच्या कँटीनच्या दिशेने रवाना

    FDA अधिकारी आणि वकिलांची टीम आता विधानभवनाच्या कँटीनमध्येही तपासणीसाठी जाणार आहे. मंत्रालयाच्या कँटीनमधील तपासणेनंतर आता विधानभवाच्या कँटीनच्या दिशेने रवाना झाले आहेत.

  • 31 Jul 2026 02:00 PM (IST)

    वकिलांकडून आक्षेप घेतलेला मंत्रालयातील चाकूंवर आक्षेप

    मंत्रालयातील कँटीनमधील पाच चाकू आहेत, यावर वकिलांकडून आक्षेप घेतलेला पाहायला मिळाला. आता या सगळ्या त्रुटी ते अहवालात सादर करतात का याकडे लक्ष असणार आहे.

  • 31 Jul 2026 01:54 PM (IST)

    मंत्रालयातील कँटीन एक आणि कँटीन दोन यांची तपासणी

    मंत्रालयातील कँटीनमध्ये FDA अधिकारी, आणि वकिलांकडून तपासणी सुरु असून आता तीन वाजेपर्यंत हा अहवाल सादर करायचा आहे. यावर नंतर सुनावणी केली जाईल. कँटीन एक आणि कँटीन दोन यांची तपासणी सुरु आहे,

  • 31 Jul 2026 01:50 PM (IST)

    हतनूर धरणाचा विसर्ग वाढला

    हतनूर धरणाचा विसर्ग वाढला. हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडले. 3 लाख क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात होत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला

  • 31 Jul 2026 01:49 PM (IST)

    मंत्रालयाच्या कँटीनमध्ये FDA अधिकारी, आणि वकिलांकडून तपासणी सुरु

    मंत्रालयाच्या कँटीनमध्ये FDA अधिकारी, आणि वकिलांकडून तपासणी सुरु आहे. स्वच्छता किती आहे, जेवणाचा दर्जा कसा आहे, टापटिपपणा कसा आहे, ज्यात जेवण बनवले जात त्या वस्तू स्वच्छ आहे की नाही तर स्टॉर रुम किती स्वच्छ आहे याची तपासणी आता सुरु आहे.

  • 31 Jul 2026 01:45 PM (IST)

    मातंग समाजात कलावंतांची कमतरता नाही- देवेंद्र फडणवीस

    “मातंग समाजात कलावंतांची कमतरता नाही. आजही समाजात मागासलेपणा पाहायला मिळतो आणि आपण तो दूर करण्याचा प्रयत्न करतोय. क्रांतीगुरु म्हणून ओळखले जाणारे लहूजी साळवे यांचेही स्मारक हे पुण्यामध्ये तयार करण्याची सुरुवात केली आहे.” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 31 Jul 2026 01:38 PM (IST)

    स्मारक उभारताना वंचिताना उद्धवस्त करणार नाही- देवेंद्र फडणवीस

    वंचिताचा आवाज म्हणून अण्णाभाऊ साठेंनी मोलाचे कार्य केले आहे. स्मारक उभारताना वंचिताना उद्धवस्त करणार नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णाभाऊ साठेंनी मोलाचं कार्य केले आहे. प्रत्येक क्षेत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे मोलाचे कार्य आहे.

  • 31 Jul 2026 01:33 PM (IST)

    अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभा करतोय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    अण्णाभाऊ साठे संशोशन संस्था प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभा करतोय. हा प्रकल्प खासगी विकासक करणार नसून SRA स्वत: हा प्रकल्प करेल SRA या प्रकल्पामध्ये पैसा टाकेल, SRA पुर्नवसन करेल आणि SRA च हे स्मारक बांधेल हा निर्णय आपण केला. सरकार गेल्यानंतर फारसे काम झालेले नाही.

  • 31 Jul 2026 01:30 PM (IST)

    जळगावच्या महापालिकेच्या महात्मा गांधी व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचलं

    जळगावच्या महापालिकेच्या महात्मा गांधी व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचलं. महात्मा गांधी व्यापारी संकुलामध्ये गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी साचला असून मार्केट मधील अनेक दुकानांमध्ये पाणी शिरला आहे. “दोन दिवसांपासून सततचा पाऊस सुरू आहे, व्यवस्थित नालेसफाई न झाल्यामुळे रस्त्यांवरून पाणी थेट मार्केटमध्ये शिरले अशी माहिती भाजपचे जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्याकडून मार्केट परिसरातील पाहणी करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आदित्य जीवने देखील फिल्डवर उतरलेल्या असून ठिकठिकाणी झालेला नुकसानाचा आढावा घेत आहेत.

  • 31 Jul 2026 01:26 PM (IST)

    हायकोर्टाचे वकील मंत्रालयाच्या कँटीनमध्ये दाखल

    हायकोर्टाचे वकील मंत्रालयाच्या कँटीनमध्ये दाखल झाले आहेत. चार वकिलांसह FDA अधिकाऱ्यांना तपासणीचा आदेश देण्यात आला आहे. तीन वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हाटकोर्टाने दिले आहे.

  • 31 Jul 2026 01:20 PM (IST)

    भाजपच्या गुंडांना आधी अटक करा- अभिजीत दिपके

    भाजपच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. जंतरमंतरवर दगडांनी भरलेला ट्रक कुणी आणून ठेवला होता? भाजपच्या गुंडांना आधी अटक करा, अशी मागणी अभिजीत दिपके यांनी केली आहे.

  • 31 Jul 2026 01:16 PM (IST)

    आमदार संजय गायकवाड यांची मंत्रालयातील कँटीनमधील अस्वच्छतेवर प्रतिक्रिया

    आमदार संजय गायकवाड म्हणाले की, “मी 25 ते 30 वर्षांपासून त्या कँटीनमध्ये जातो. आता तिथे 98% साफसफाई आहे हे कळतंय पण तुम्ही त्यांना आधी का सांगितले की तुम्ही येत आहात. जर तुम्ही थेट गेला असता तर तुम्हाला कळलं असत की साफसफाई तिथे असते.”

  • 31 Jul 2026 01:10 PM (IST)

    कोर्टाच्या आदेशानंतर मंत्रालय कँटीनची होणार तपासणी

    कोर्टाच्या आदेशानंतर मंत्रालय कँटीनची होणार तपासणी; FDA ला दुपारी 3 पर्यंत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश. हायकोर्टाच्या निर्देशानंतर मंत्रालयात स्वच्छेतेसाठी धावपळ. तपासणीच्या आदेशानंतर कँटीनमध्ये साफसफाई सुरु.

  • 31 Jul 2026 12:59 PM (IST)

    कोहिनूर दुर्घटनेनंतर शेजारची घरे जमीनदोस्त; बेघर रहिवाशांचा गिरीश महाजनांसमोर आक्रोश

    कोहिनूर दुर्घटनेनंतर शेजारची घरे जमीनदोस्त; बेघर रहिवाशांनी मंत्री गिरीश महाजनांसमोर आक्रोश केला.  भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनेनंतर बचाव पथकांना मार्ग मोकळा करण्यासाठी इमारतीला लागून असलेल्या चाळीतील 10 ते 12 घरे जेसीबीच्या साहाय्याने पाडण्यात आली.

    घरांवर कारवाई झाल्यामुळे अनेक कुटुंबे काल रात्रीपासून उघड्यावर राहत असून त्यांच्यासमोर निवारा आणि अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • 31 Jul 2026 12:45 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर-तुपावर धडक कारवाई, लाखोंचा मुद्देमाल जप्त

    छत्रपती संभाजीनगरात भेसळयुक्त पनीर-तुपावर धडक कारवाई करत  – 3 लाख 12 लाखांचा 950 किलो मुद्देमाल जप्त करण्यात आला.  अमोल दूध डेअरीचा परवाना निलंबित तसेच  लक्ष्मी डेअरीच्या तीन रिटेल दुकानांवरही कारवाई; गाईच्या तुपाचा साठा जप्त केला आहे.

  • 31 Jul 2026 12:36 PM (IST)

    हायकोर्टातील कँटीन बंद करण्याची FDAची नोटीस

    मुंबई हायकोर्टातील स्टाफ कँटीन बंद करण्याची नोटीस FDAने दिली आहे. स्टाफ कँटीनचा परवाना FDAकडून निलंबित करण्यात आला आहे.

  • 31 Jul 2026 12:26 PM (IST)

    शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे वाढले दिल्ली दौरे

    शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांचे वाढले दिल्ली दौरे.  मनरेगाच्या प्रलंबित निधीसाठी मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिल्लीत केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांची भेट घेतली . बैठकीस खासदार श्रीरंग बारणे, सहसचिव अतुल कोदे, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या सहसचिव रोहिणी भाजीभाकरे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    1 जुलै 2024 ते 30 जून 2026 या कालावधीतील कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीचा मुद्दा मार्गी लावल्याची माहीती समोर आली आहे. वैयक्तिक व सार्वजनिक विहिरींसह विविध विकासकामांचा रखडलेला निधी तातडीने देण्याची मागणी आहे.

  • 31 Jul 2026 12:18 PM (IST)

    पारोळा – मातीच्या घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू

    पारोळा तालुक्यातील वसंत नगर येथे मातीच्या घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू झाला.  बाबू जाधव असे नाव असून ते 75 वर्षांचे होते.  जाधव हे रात्री घरात झोपलेले असताना अचानक भिंत कोसळून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.  पारोळा तालुक्यात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असल्याने पावसामुळे भिंत कोसळली.  घटनास्थळी महसूल प्रशासनाचे अधिकारी दाखल झाले आहेत.

  • 31 Jul 2026 12:05 PM (IST)

    नाशिकमध्ये प्रचंड खड्डे, इतकं बेकार नाशिक कधीही नव्हतं – छगन भुजबळ

    नाशिकमध्ये प्रचंड खड्डे, इतकं बेकार नाशिक कधीही नव्हतं अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.  नाशिकमधील कामांवरून ते आक्रमक झालेले दिसले.  मंत्री गिरीश महाजन यांनी त्याकडे लक्ष दिलू पाहिजे. रस्त्यावरील खड्डे तत्काळ भरले पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केली.

  • 31 Jul 2026 12:00 PM (IST)

    भिवंडीत दुर्घटना, 9 जणांचा मृत्यू, मंत्री महाजन दुर्घटनास्थळी

    भिवंडीत धोकादायक इमारक कोसळली असून मृत्यांचा आकडा 9 वर पोहोचला आहे… अशात मंत्री गिरीश महाजन यांनी दुर्घटनास्थळी येत परिस्थितीचा आढावा घेतला. महाजन म्हणाले, ‘इमारतील 2 वेळा नोटीस दिली केली होती. आणखी 2 -3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे… मृतांच्या नातेवाईकांना आर्थीक मदत दिली जाईल..’ असं देखील गिरीज महाजन म्हणाले आहेत.

  • 31 Jul 2026 11:50 AM (IST)

    भिवंडी कोहिनूर दुर्घटनास्थळी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी; बचावकार्याचा आढावा घेत आहे

    भिवंडी कोहिनूर दुर्घटनास्थळी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत, बचावकार्याचा आढावा घेतला. भिवंडीतील कोहिनूर इमारत दुर्घटनास्थळी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळी सुरू असलेल्या बचाव आणि शोध मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजनांच्या सूचना दिल्या. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध आणि मदतकार्य वेगाने पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • 31 Jul 2026 11:40 AM (IST)

    पंढरपूर कॉरिडॉर पाठोपाठ आता अक्कलकोट नगरीचाही होणार विकास

    अक्कलकोटच्या विकासासाठी म्हाडाची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अक्कलकोट कॉरिडॉरचा 500 कोटींचा आराखडा तात्काळ सादर करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाला आदेश दिले आहेत. अक्कलकोट कॉरिडॉर संदर्भात जीआर निघाल्यानंतर अवघ्या 24 तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांची  तातडीची बैठक घेतली. अक्कलकोट कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना  महत्वपूर्ण सूचना दिल्या. राज्य शासनाने अक्कलकोटच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी राज्य शासनाचे आभार मानले आहे.

  • 31 Jul 2026 11:30 AM (IST)

    नांदेड – जिल्ह्यात मागील 24 तासात 93 मंडळापैकी 73 मंडळात अतिवृष्टीची नोंद

    नांदेड – जिल्ह्यात मागील 24 तासात 93 मंडळापैकी 73 मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.  16 पैकी 15 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. तर धर्माबाद वगळता सर्वच तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. नांदेड जिल्ह्यात मागील 24 तासात 88 मिली मिटर पाऊस झाला असून  माहूर तालुक्यात सर्वाधिक 188 मिलिमिटर पाऊस झाल आहे.  आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 46 टक्के पाऊस झाला आहे.

  • 31 Jul 2026 11:20 AM (IST)

    पारोळा तालुक्यातील वसंत नगर येथे घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू

    पारोळा तालुक्यातील वसंत नगर येथे घराची भिंत पडून वृद्धाचा मृत्यू झाला आहे,  वसंत कल्लू जाधव असे 75 वर्षीय मयत वृद्धाचे नाव आहे.  रात्री घरात झोपलेले असताना अचानक भिंत कोसळून जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. पारोळा तालुक्यात मध्यरात्रीपासून पाऊस सुरू असल्याने पावसामुळे भिंत कोसळल्याची माहिती समोर येत आहे.

  • 31 Jul 2026 11:08 AM (IST)

    मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता

    मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने मुंबईसाठी यलो अलर्ट घोषित केला आहे.काही भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. वसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक ५ ते ७ मिनिटे उशिराने सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 31 Jul 2026 10:40 AM (IST)

    आर्णी मार्गावरील दहेली गावाजवळ कुपटी नदीवरून कार गेली वाहून

    दारव्हा आर्णी मार्गावरील दहेली गावाजवळ कुपटी नदीवरून कार गेली वाहून. प्रशासन कडून योग्य ती मदत मिळत नसल्याची गावकऱ्यांची माहिती. तात्काळ मदत करून शोध कार्य न केल्यास आंदोलन करण्याचा दिला गावकऱ्यांनी ईशारा

  • 31 Jul 2026 10:30 AM (IST)

    विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत संतापजनक घटना समोर

    सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केल्या जात आहे आहे. संबंधित गर्भवती महिला बुधवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे संगितले. मात्र रुग्णालय प्रशासनाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप ही करण्यात आला आहे

  • 31 Jul 2026 10:20 AM (IST)

    अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान….शेतात तलाव सदृश्य परिस्थिती

    अमरावती जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अनेक गावांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. शेतांमध्ये तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आहे. लिंबूनिचे बाग तसेच सोयाबीन पीक पाण्यामध्ये आहे. शेती सह पिकाच मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अद्यापही प्रशासनाचे कर्मचारी दाखल झाल्यानंतर आम्हाला योग्य ती मदत मिळावी अशी अपेक्षा आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी लक्ष्मण जाधव यांनी….

  • 31 Jul 2026 10:05 AM (IST)

    कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी तातडीने पूर्ण करा-विनय गौडा जी. सी

    दोन याद्यांमध्ये जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 128 पात्र. 64 हजार 899 शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप प्रलंबित, 2 लाखांपर्यंतचे कर्ज पूर्ण माफ होणार. ई-केवायसीसाठी शुल्क घेतल्यास कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांची माहिती

  • 31 Jul 2026 10:05 AM (IST)

    बोरीवली पूर्व नॅशनल पार्कजवळ डंपर-ऑटो अपघात, 2 जखमी

    मुंबईच्या बोरीवली पूर्वेतून एक अपघाताची बातमी आहे. नॅशनल पार्कजवळ डंपर आणि ऑटो रिक्षाचा भीषण अपघात झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी 7.30 वाजताची आहे. माहितीनुसार नॅशनल पार्कजवळ भरधाव डंपरने ऑटो रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघात ऑटोमधील महिला प्रवासी आणि चालक हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.

  • 31 Jul 2026 09:59 AM (IST)

    बुलढाण्यात अतिवृष्टी; जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद

    बुलढाण्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग बंद झाले आहेत. तर पुलांवरून पाणी वाहत असतानाही वाहनचालकांचा जीव धोक्यात घालून प्रवास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतिक्षा करत होते. त्यानंतर आलेल्या पावसाने बुलढाणाकरांना चांगलंच झोडपून काढलं आहे.

  • 31 Jul 2026 09:45 AM (IST)

    रत्नागिरीत काँग्रेसला धक्का; अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द

    रत्नागिरीत काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवक पद रद्द करण्यात आल आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला. झारी या डिसेंबर २०२५ मध्ये राजापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या. या निर्णयामुळे राजापुरात महाविकास आघाडीला धक्का बसला आहे.

  • 31 Jul 2026 09:42 AM (IST)

    राष्ट्रभक्तीचं काय ढोंग सुरूय; संजय राऊत यांची सत्ताधाऱ्यांवर टीका

    संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. लाठीचार्ज, पॅलेट गन होऊन मोदी, शहा संसदेत नव्हते. राष्ट्रभक्तीचं काय ढोंग सुरू आहे. अमित शहा यांचा उद्या पुणे दौरा आहे. त्यांच्या दौऱ्याला विरोध करण्याचं पुणेकरांनी ठरवलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.

  • 31 Jul 2026 09:25 AM (IST)

    Nashik Rain : नाशिकमध्ये 3 तासांसाठी रेड अलर्ट; हवामान विभागाकडून इशारा

    नाशिकमध्ये आज ३१ जुलै रोजी सकाळी ७.०० वाजता पुढील ३ तासांसाठी हवामान विभागाने इशार्‍याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिककरांना आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलंय.

  • 31 Jul 2026 09:15 AM (IST)

    Amravati Rain : अमरावतीत मूसळधार पाऊस, वाघोडा गावातील पूल वाहून गेला

    विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अमरावतीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. अमरावतीच्या वाघोडा गावाजवळ पूल वाहून गेल्याची घटना घडली आहे. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पूल वाहून गेला आहे. तर पुराच्या पाण्यामुळे गावातील पूल वाहून गेला.

  • 31 Jul 2026 09:04 AM (IST)

    Bhiwandi tragedy : भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून मोठी दुर्घटना; मृतांचा आकडा वाढला

    भिवंडीत धोकादायक इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. बचाव पथकाकडून बचत कार्य सुरू आहे. घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांकडून आक्रोश व्यक्त केला जात आहे. प्रशासकीय अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.

  • 31 Jul 2026 09:00 AM (IST)

    अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस

    अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. नांदगाव खंडेश्वर मध्ये अनेक घरांमध्ये दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना प्रशासनाकडून आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शाळा महाविद्यालय सुट्टीचे परिपत्रक काढण्यात आले.

  • 31 Jul 2026 08:50 AM (IST)

    वर्धा जिल्ह्यात रात्रभर पाऊस

    वर्धा जिल्ह्यात रात्रभर पाऊस होता. सकाळी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. वर्धा ते राळेगाव मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. सरूळ गावाजवळ यशोदा नदीवरील पुलावर पाणी असल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली.अलमडोह – अल्लीपूर मार्गावरील वाहतूकही बंद झाली.

  • 31 Jul 2026 08:40 AM (IST)

    गोंदियातील पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच

    गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुधडी भरून वाहत आहेत, तर अश्यातच गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धारणा मध्ये पाणी साठा वाढत असल्याने सध्या च्या घडीला 83 टक्के धरण भरले असल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुजारी टोला धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून या धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आले आहे. तर धरणातील पाणी पातळी वाढली तर आणखी दरवाजे उघडण्यात येणार आहेत.

  • 31 Jul 2026 08:30 AM (IST)

    धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून जोरदार पावसाची हजेरी

    धाराशिव जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी आणि नागरिक चिंतेत होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत सातत्याने पाऊस सुरू असून मध्यरात्रीपासून त्याचा जोर अधिक वाढला आहे. या पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोयाबीन, तूर यांसह खरीप पिकांना या पावसाचा मोठा दिलासा मिळणार आहे

  • 31 Jul 2026 08:20 AM (IST)

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रमुख नद्यांना मोठा पूर

    गडचिरोली जिल्ह्यातील अनेक प्रमुख नद्यांना मोठा पूर आलेला असून जिल्ह्यातील ४ राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील १६ रस्ते बंद आहेत. भामरागड सिरोंचा अशा दोन तालुक्यात विद्युत सेवा व दूरध्वनी सेवा खंडित झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. पुरामुळे काल सायंकाळी गडचिरोली जिल्ह्यात दोन घटना घडली असून एक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची कार पुरात वाहून गेली. तर दुसर्‍या ठिकाणी चार युवकांनी हुज्जत घालून दुचाकी पुराच्या पाण्यात टाकल्यामुळे एक दुचाकी वाहून गेली. सध्याही अनेक रस्ते बंद असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. जिल्ह्यातील वैनगंगा गोदावरी प्राणहिता इंद्रावती प्रमुख नद्या धोका पातळीच्या जवळ जवळ वाहत असून सध्या पाऊस नसला तरी पूर परिस्थिती कायम आहे

  • 31 Jul 2026 08:09 AM (IST)

    भिवंडीत झोपेतच काळाचा घाला, इमारत कोसळून तीन ठार

    भिवंडीतील कोहिनुर हि धोकादायक इमारत रात्री 11 वाजता कोसळली. ढिगाऱ्याखालून 9 तासानंतर 3 रा मृतदेह बाहेर काढण्यात एनडीआरएफला यश आले आहे. त्याचबरोबर अजून काही जण ढिगार्‍याखाली असल्याची माहिती मिळत आहे. तीन मृतदेह ढिगाऱ्याबाहेर काढल्यानंतर पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. तिन्हीही मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील आय जी एम सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Published On - Jul 31,2026 8:08 AM

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा