Maharashtra Rain LIVE | पूरग्रस्तांसाठी परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी काढली मदत फेरी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता.

Maharashtra Rain LIVE | पूरग्रस्तांसाठी परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी काढली मदत फेरी
पंकजा मुंडेंची मदत फेरी

| Edited By: Yuvraj Jadhav

Jul 29, 2021 | 11:52 PM

गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 29 Jul 2021 12:06 PM (IST)

  पंचमाने झाल्यावरच ठोस मदत जाहीर होईल – उपमुख्यमंत्री

  उपमुख्यमंत्री अजित पवार –

  पंचमाने झाल्यावरच ठोस मदत जाहीर होईल

  पूर्ण पाणी ओसरल्याशिवाय शेतीचे पंचनामे नाही

  जिथे पाणी ओसरलंय, तिथले पंचनामे सुरु झालेत

  सगळ्या पूरग्रस्तांना योग्य ती मदत मिळेल

  मदतीसाठी निधीची कमतरता भासणार नाही

  दौऱ्यावर जाणाऱ्या नेत्यांसोबत नोडल ऑफिसर दिला जाईल

  येत्या तीन-चार दिवसांसाठी पावसाचा अलर्ट आहे

  हे संकट केवळ राज्यावर नाही, जगात अनेक ठिकाणी आलंय

  केंद्रानं केलेली मदत 2020 मधील आपत्तीसाठीची आहे

 • 29 Jul 2021 11:42 AM (IST)

  कोकणला आर्थिक मदत गरजेची, दोन दिवसात पंचनामे करण्याचे काम पुर्ण होणार – उदय सामंत

  कोकणला आर्थिक मदत गरजेची,

  दोन दिवसात पंचनामे करण्याचे काम पुर्ण होणार,

  राज्य सरकारने 10 हजार रुपये तत्काळ मदत देण्याचा निर्णय घेतलाय,

  कोकणासाठी चार दिवसात मदतीची घोषणा केला जाणार,

  मंत्री उदय सामंत यांची माहिती,

  मंत्री आदित्य ठाकरे आज चिपळुणचा दौरा करणार,

 • 29 Jul 2021 11:24 AM (IST)

  पूरग्रस्तांसाठी परळीत भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी काढली मदत फेरी

  परळी :

  पूरग्रस्तांसाठी परळीत मदत फेरी

  भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी काढली मदत फेरी

  पहिल्याच फेरीत 50 हजारांची मदत

  वाढदिवस टाळून एका कार्यकर्त्याने केली मदत

  मदत फेरीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

  परळीत शेकडो कार्यकर्ते मदत फेरीत सहभागी

 • 29 Jul 2021 10:42 AM (IST)

  कोयना धरणातून विसर्ग वाढवणार

  कराड

  कोयना धरणातून विसर्ग वाढवणार

  धरणातील पाणी नियमनासाठी विसर्ग वाढवणार

  सध्या कोयना धरणातून 33045

  कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात सुरू आहे

  सकाळी 11 वाजता सहा वक्री दरवाजे नऊ फुटांने उचलुन 49300 कयुसेक पाणी विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार

  105 tmc साठवण क्षमता असलेल्या धरणात 90.42 tmc पाणीसाठा झाला

  कोयना-कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 • 29 Jul 2021 10:40 AM (IST)

  नाशिकच्या गंगापूर धरणातून 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

  - नाशिकच्या गंगापूर धरणातून 500 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू

  - यंदाच्या पावसाळयातील पहिल्यांदाच पाण्याचा विसर्ग

  - धरण 80 टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग सुरू.. नदी काठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश

 • 29 Jul 2021 09:15 AM (IST)

  कोकणात मदतीचा ओघ वाढला, महामार्गावर मदतीच्या बसेसची मोठी रांग

  कोकणात मदतीचा ओघ वाढला,

  महामार्गावर मदतीच्या बसेसची मोठी रांग,

  राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून कोकणात मदतीला कार्यकर्ते,

  धावून कोकणातील सर्वच भागात मदत पोहोचली जातीये,

  रस्त्यालगतच्या गावात मदतीसाठी कार्यकर्ते पुढे, ...

  मोठमोठाल्या गाड्या भरून मदत पुरवली जातीये...

 • 29 Jul 2021 09:14 AM (IST)

  एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात

  पुणे

  एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पुण्यात पुन्हा पावसाला सुरुवात

  पुढेच दोन दिवस पुणे शहरासह घाटमाथ्याच्या परिसरात हवामान खात्याने दिलाय यलो अलर्ट

 • 29 Jul 2021 07:55 AM (IST)

  खेड तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीतील भूस्खलन होण्याचे प्रमाण वाढले

  पुणे

  खेड तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतीतील भूस्खलन होण्याचे प्रमाण वाढले

  संकटात सापडलेल्या सर्व घरांना त्यांच्या जनावरांसह सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलयं

  जिल्हा परिषदेची तालुका टीम सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून

 • 29 Jul 2021 07:19 AM (IST)

  गंगापूर धरणातून आज होणार पाण्याचा विसर्ग

  नाशिक - गंगापूर धरणातून आज होणार पाण्याचा विसर्ग..

  गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

  संततधार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ..

  गंगापूर धरण 75 टक्के,गौतमी गोदावरी 48 टक्के तर कश्यपी 43 टक्के भरलं..

 • 29 Jul 2021 06:58 AM (IST)

  महापूराने पलुस तालुक्यातील तीनही पुलांच्या संरक्षक पाईपचे नुकसान, आमणापूर पूल आज खुला होणार

  सांगली -

  पलुस तालुक्यातील महापुराचे पाणी अतिशय मंदगतीने ओसरत आहे.

  भिलवडी पुलावरुन पाणी ओसरले आहे.  पुलावरून दुचाकी व छोट्या चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू आहे.

  तर आमणापूर - अंकलखोप पुलावर सुमारे अर्धा फुट पाणी आहे.

  प्रशासनाकडून तपासणी नंतरच आज सकाळपासून औपचारिकरित्या हा आमणापूर पूल सुरू होणार आहे.

  यामुळे पलुसचा तालुक्याचा दक्षिण भागाशी  तुटलेला संपर्क पुन्हा सुरु होणार आहे.

  पाणीपातळी ओसरत असताना तालुक्यातील अनेक रस्ते चिखलमय झाले आहेत.

  पलुस तालुक्यातील पुणदी तर्फ वाळवा येथील पुनदी - जुनेखेड पुलावरील पाणी ओसरले आहे.

  तर महापुराच्या प्रचंड प्रवाहाने सर्वच पुलांच संरक्षक पाईप वाकून मोठे नुकसान झाले आहे.

 • 29 Jul 2021 06:55 AM (IST)

  सरकार पुरबाधीताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार - कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम

  जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने नदी  काठावरील गावांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासन स्तरावरून पुरग्रस्तांना तात्काळ दिलासा देण्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी या साठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.

Published On - Jul 29,2021 6:51 AM

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें