दोन वर्ष महाविकासाची! महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण; मुख्यमंत्र्यांनी सादर केला विकास कामांचा लेखाजोखा

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्याच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडणारे एक पत्रक सीएमओ महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

दोन वर्ष महाविकासाची! महाविकास आघाडीला सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण; मुख्यमंत्र्यांनी सादर केला विकास कामांचा लेखाजोखा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्याच्या विकास कामांचा लेखाजोखा मांडणारे एक पत्रक सीएमओ महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रकासोबतच दोन वर्ष महाविकासाची असे कॅप्शन देखील देण्यात आले आहे. राज्यात सर्वच आघाड्यांवर सकारात्मकता आहे. कोरोनामुळे राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र आपण विविध उपययोजनांच्या माध्यमातून कोरोनावर यशस्वी मात केली आहे. कोरोना काळात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले, त्याचा जनसामान्यांना फायदा झाल्याचे या पत्रकार म्हटले आहे.

काय म्हटले आहे पत्रकात?

राज्यात सर्वच आघाड्यावर सकारात्मकता आहे, कृषी, पर्यटन, शहरांचा विकास, पर्यावरण, पायाभूत विकासाचे प्रकल्प, रस्ते उभारणी, विविध जनकल्याणकारी योजना, तसेच कोरोना काळात करण्यात आलेल्या विविध योजना याचा गेल्या दोन वर्षांत सर्वसामान्यांना प्रत्यक्षात लाभ पोहोचला आहे. महाविकास आघाडी सरकारने केवळ योजना आणल्याच नाही, तर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी कशी होईल, शेवटच्या घटकापर्यंत त्या योजनेचा लाभ कसा पोहोचेल याकडे देखील लक्ष दिले आहे. आम्ही लवकरच समुद्धी महामार्ग देखील सुरू करणार आहोत. समृद्धी महामार्गामुळे राज्यातील दळणवळणाला गती येणार असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

कोरोना काळात कृषी क्षेत्राने राज्याला तारले

दरम्यान शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे, कोरोना काळात कृषी क्षेत्राने राज्याला तारले, राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळ पडत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची आवस्था बिकट बनली आहे. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये महात्मा ज्योतीराव फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गंत शेतकऱ्यांवरील जवळपास 20 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. महाविकास आघाडी सरकारने आपला शब्द पाळत शेतकऱ्यांना दिलासा दिला. भविष्यात देखील शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना राबवण्यात येतील.

पर्यावरणपूरक विकासाचे नियोजन

आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. राज्यात अतंर्गत रस्त्यांचे जाळे वाढवायचे आहे. वाहतूक व्यवस्था आणि रस्त्यांची कामे करायची आहेत. राज्यातील हवाई वाहतुकीच्या जाळ्याचा विस्तार करून, राज्याला देशातील सर्व प्रमुख शहरांची जोडायचे आहे. कृषी क्षेत्रासाठी देखील अनेक कल्याणकारी योजना येत्या काळात राबवण्यात येतील. मात्र हा सर्व विकास करत असताना पर्यावरणचाी हाणी होणार नाही, याकडे देखील सरकारचे लक्ष असणार आहे. राज्यातील वनसंपत्तीचे रक्षण व्हावे, ती वाढीस लागावी यासाठी देखील सरकार विविध योजना आखत असल्याचे या पत्रकार म्हटले आहे.

संबंधित बातम्या 

जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार: गुणरत्न सदावर्ते

Omecron : HIV च्या विषाणुमुळे आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ? वैज्ञानिकांच्या अंदाजाने मोठी खळबळ

Published On - 9:22 am, Sun, 28 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI