AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार: गुणरत्न सदावर्ते

जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. डंके चोटपर आमचा लढा सुरूच राहील, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज स्पष्ट केलं. ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते.

जोपर्यंत विलीनीकरण नाही, तोपर्यंत संप मागे नाही, एसटी कर्मचाऱ्यांचा लढा सुरूच राहणार: गुणरत्न सदावर्ते
gunratna sadavarte
| Edited By: | Updated on: Nov 27, 2021 | 7:26 PM
Share

मुंबई: जोपर्यंत एसटीचं विलीनीकरण होत नाही. तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच राहणार आहे. डंके चोटपर आमचा लढा सुरूच राहील, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज स्पष्ट केलं. ते आझाद मैदानात एसटी कर्मचाऱ्यांना संबोधित करत होते.

गुणरत्न सदावर्ते यांनी आज दिवसभर एसटी कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा केली. कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. आम्ही उघड्या आकाशाखाली बसलो आहोत. आम्ही कष्टकऱ्यांचा लढा सुरूच ठेवणार आहोत. डंके की चोटपर आमचा लढा सुरूच राहील. आम्ही माघार घेणार नाही. विलीनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत, असं सदावर्ते यांनी सांगितलं.

कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना अटक

देशभरातील लोक कष्टकऱ्यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे आमचा आजही बंद आहे. 95 टक्के कष्टकरी दुखवट्यात आहेत. आमच्यासाठी दुखवटा आहे. सरकारसाठी संप आहे. कोल्हापूरच्या टोलनाक्यावर संतोष शिंदे आणि इतरांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासोबतच्या 35 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आम्ही पोलीस ठाण्याला फोन लावून कारणं विचारली. या कर्मचाऱ्यांना नाहक सहातास डांबून ठेवण्यात आलं होतं. आम्ही आमचा कायद्याचा बडगा दाखवला तेव्हा फ्यॅ फ्यॅ झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घळवे यांना विचारमा करण्यात आल. त्यानंतर कर्मचाऱ्यांना सोडण्यात आलं. हे कर्मचारी कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात असताना अटक केली. त्यांनी कोणत्याही घोषणा दिल्या नाहीत. त्यांनी कोणतीही निदर्शने केली नाही. तरीही अटक केली. त्यामुळे संतोष घोळवेंना निलंबित करा, अशी आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.

पवारांनी विलीनीकरणाचा शब्द पाळावा

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज नंदूरबार आगारात जाऊन कर्मचाऱ्यांची भेट घेतली. राज्यातील एसटीची होत असलेली तोडफोड सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे का हे तपासण्याची गरज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा बस स्थानकातील आंदोलक कर्मचाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कामगारांची भूमिका समजून घेतली. सरकारची पगारवाढ आभासी असून कर्मचाऱ्यांनी किती लाभ होतो याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. शासनाने दडपशाहीने आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिरडू नये, शरद पवारांनी विलीकरणाचा शब्द पाळावा, आम्ही सरकारचे अभिनंदन करु, असं दरेकर म्हणाले.

शासनाला विलीनीकरणाचा मार्ग मी दाखवतो

मी सरकारसोबत चर्चा करायला तयार आहे. एसटीचं विलीनीकरण कसे होईल याचा शासनाला मार्ग दाखवतो. सरकार पत्रकार परिषदमध्ये काय बोललं हा निर्णय नाही. पगारवाढीसह ज्या घोषणा केल्या त्याचा अद्यापही लेखी शासन निर्णय जाहीर झाला नाही. कोर्टाने विलीनीकरण करु नका असे सांगितलेले नाही. समितीचे सारे सदस्य सरकारचेच आहेत, असंही दरेकरांनी सांगितलं.

वाहकाने भिरकावला दगड

दरम्यान, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार जळगाव आगाराची पहिली बस क्र. MH 20 BL 3451 जामनेर येथे रवाना झालेली होती. जामनेर येथून दुपारी 2 वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात जामनेर आगाराचा वाहक उमेश आवटी एका आयशर ट्रकमागे लपून बसला होता. बस समोर येतात त्याने धारदार दगड बसच्या काचेवर भिरकावला. एसटी बस चालक सोपान सपकाळे चालक यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने बसचा समोरील काच थोडक्यात बचावला. याप्रसंगी बसमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिस तसेच जळगाव आगारातील वाहक गोपाळ पाटील यांनी संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो एका शेतात सापडला. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. याप्रसंगी पोलीस ठाण्यात जामनेर आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

राज्यांशी समन्वय साधून आरोग्य सुविधांचा आढावा घ्या; कोरोना व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मोदींचे आदेश

Omecron : HIV च्या विषाणुमुळे आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन ? वैज्ञानिकांच्या अंदाजाने मोठी खळबळ

नारायण राणेंचा मार्च कुठला ते शोधावं लागेल; भुजबळांनी उडवली खिल्ली

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.