दोस्तीत कुस्ती, लोकसभेच्या ‘या’ मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्सीखेच, नुसते दावे-प्रतिदावे

लोकसभेचं घोडामैदान जवळ येत असताना इच्छूकांची गर्दीत आता दावे-प्रतिदावे रंगताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेत महाविकासआघाडीहून महायुतीत जास्त रस्सीखेच सुरु आहे. रत्नागिरी-सिंदुदुर्गची जागा भाजपच लढणार हे नारायण राणेंनी ट्विट केल्यानंतर जागावाटपाचे अधिकार शिंदेंना असल्याचं उत्तर उदय सामंतांनी दिलंय.

दोस्तीत कुस्ती, लोकसभेच्या 'या' मतदारसंघांमध्ये महायुतीत रस्सीखेच, नुसते दावे-प्रतिदावे
ajit pawar, eknath shinde and devendra fadnavisImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Feb 29, 2024 | 10:04 PM

मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : लोकसभेचं घोडामैदान जवळ येत असताना इच्छूकांची गर्दीत आता दावे-प्रतिदावे रंगताना दिसत आहेत. इच्छुक उमेदवारांच्या स्पर्धेत महाविकासआघाडीहून महायुतीत जास्त रस्सीखेच सुरु आहे. रत्नागिरी-सिंदुदुर्गची जागा भाजपच लढणार हे नारायण राणेंनी ट्विट केल्यानंतर जागावाटपाचे अधिकार शिंदेंना असल्याचं उत्तर उदय सामंतांनी दिलंय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात गेल्यावेळी शिवसेनेचे विनायक राऊत विरुद्ध महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या निलेश राणेंमध्ये लढत झाली. या निवडणुकीत विनायक राऊत यांना 4,58,022 तर निलेश राणेंना 2,79,700 मतं पडली. राऊतांनी 1 लाख 78 हजार 322 मतांनी राणेंचा पराभव केला होता

अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठीसुद्धा महायुतीत चुरस

अहमदनगर लोकसभेच्या जागेसाठीही महायुतीत मोठी चुरस दिसतेय. या मतदारसंघात आपण 5 वर्षांपासून तयारी करतोय, यंदा आपण 5 लाख मतांनी जिंकून येवू, असा दावा भाजपच्या सुजय विखेंनी वर्तवलाय. तर भाजपच्या राम शिंदेंनीही नगर लोकसभेतून लढण्याची इच्छा बोलून दाखवलीय. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून निलेश लंकेंनीही आधीपासून तयारी सुरु केलीय. नगरची जागा भाजपला गेली तर निलेश लंके पुन्हा शरद पवारांकडे परतणार का? याच्याही चर्चा आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून निलेश लंकेंच्या कार्यक्रम आणि बॅनरवर शरद पवारांचा फोटो लागतोय.

गेल्यावेळी नगर लोकसभेसाठी भाजपचे सुजय विखे आणि राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांमध्ये सामना झाला होता. विखेंना 7,04,660 तर जगतापांना 4,23,186 मतं पडली होती. त्यावेळी विखेंचा 2,81,474 विजय झाला होता.

संभाजीनगर जागेवरही रस्सीखेच

संभाजीनगर लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून संदीपान भुमरे इच्छुक असताना आता भाजपच्या भागवत कराडांनीही इच्छा बोलून दाखवलीय. आधीच्या समीकरणांनुसार संभाजीनगरची जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंचं नाव चर्चेत राहतंय. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून अद्याप कोणतंही नाव चर्चेत नाही. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून यावेळी संदीपान भुमरे इच्छुक आहेत. तर भाजपचे मंत्री भागवत कराड यांनीही भाजपकडून संभाजीनगरमध्ये निवडणूक लढवण्याची इच्छा वर्तवलीय.

गेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील यांना 3,89,042, शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंना 3,84,550, अपक्ष लढलेल्या हर्षवर्धन जाधवांना 2,83,798, तर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांना 91,789 मतं पडली. यात 4 हजार 492 मतांनी जलील यांचा विजय झाला. संभाजीनगरची लोकसभेची जागा भाजपने मागितली आहे. संभाजीनगरच्या जागेसाठी आमची तयारी सुरु आहे पण महायुती जो निर्णय घेइल तो अम्हाला मान्य असेल. संभाजीनगरचा खासदार या वेळचा मोदी साहेबांना सपोर्ट करणारा असेल यावर आमचं लक्ष असणार, संभाजीनगर च्या जागेसाठी मी उत्सुक आहे. परंतु पक्ष जो निर्णय देईल तो मान्य करणार, असं भागवत कराड म्हणाले आहेत.

नंदुरबारच्या जागेवरही महायुतीत दोघांकडून दावा

नंदुरबार लोकसभेची जागा युतीत भाजप लढत आलीय. तर आघाडीत ही जागा काँग्रेस लढत होती. यंदा भाजपकडून विद्यमान खासदार हिना गावित पुन्हा इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून अद्याप कुणाच्याही नावाची चर्चा नाही. अजित पवार गटानं इथं भाजपच्या हिना गावितांना पाठिंबा दिलाय. मात्र शिंदेंचे शहरप्रमुख चंद्रकांत सूर्यवंशींनी हिना गावितांना उमेदवारी देण्यास विरोध केलाय.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजपच्या गावित विरुद्ध काँग्रेसच्या के. सी. पाडवींमध्ये लढत झाली. गावितांना 6,39,136, पाडवींना 5,43,507 मतं मिळाली. गावितांचा 95,629 मतांनी विजय झाला आणि पाडवी पराभूत झाले.

हिंगोलीतही तिढा

तिकडे हिंगोलीची जागा युतीत शिवसेनेकडे आहे. विद्यमान खासदार हेमंत पाटील हे शिंदेंकडे आहेत. ते पुन्हा इच्छुक असताना भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळेंनी हिंगोलीवर दावा सांगत त्यासाठी तयारीही केल्याचं बोललं जातंय. हिंगोली लोकसभेवर भाजपचे वर्चस्व असल्याचा उल्‍लेख मुटकुळे यांनी केला. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघ महायुतीमधून भाजपलाच सोडवावा, अशी मागणी केली. हिंगोली लोकसभा मतदारसंघ भाजपला सोडावा या मागणीसाठी येत्या दोन दिवसात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे शिष्टमंडळ भेटण्यासाठी जाणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्यावेळी शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसच्या सुभाष वानखेडेंमध्ये हिंगोलीची लढत झाली होती. हेमंत पाटलांना 5,86,312 तर वानखेडेंना 3,08,456 मतं पडली होती. पाटील २ लाख 77 हजार मतांनी जिंकले होते.

उत्तर मध्य मुंबईसाठी अनेक नावं चर्चेत

उत्तर मध्य मुंबईसाठी भाजपकडून विद्यमान खासदार पूनम महाजन, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, आशिष शेलार आणि माधुरी दीक्षित यांची नावं चर्चेत आहेत. गेल्यावेळी इथं पूजन महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्यात लढत झाली होती. महाजन यांना 4,86,672, प्रिया दत्ता यांना 3,56,667 मतं मिळाली होती. महाजनांचा 1 लाख हजार मतांनी विजय झाला होता.

ठाण्यात कोण निवडणूक लढवणार?

ठाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान खासदार राजन विचारे तर शिंदेंच्या शिवसेनेकडून रविंद्र फाटकांचं नाव चर्चेत आहे. गेल्यावेळी शिवसेनेच्या विचारेंविरोधात एकसंघ राष्ट्रवादीतून आनंद परांजपे लढले होते. विचारेंना 7,40,969 तर परांजपेंना 3,28,824 मतं पडली होती. विचारेंचा तब्बल 4 लाख 12 हजार मतांनी विजय झाला होता.

Non Stop LIVE Update
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला
किडनीत शिंदे गट, लिव्हरमध्ये...निंबाळकरांचा मल्हार पाटलांना खोचक टोला.
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?
दोन दिवस प्रतीक्षा, नाहीतर सांगलीतून विशाल पाटील अपक्ष म्हणून लढणार?.
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?
आधी जीवेमारण्याची धमकी आता गोळीबार, सलमान खानच्या घराबाहेर काय घडलं?.
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्...
प्रचार तापला...टांगा पलटीवरुन सुरू झालेली जहरी टीका; रखेल, नाचे अन्....
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण
आता मनसे महायुतीचा प्रचार करणार, राज ठाकरेंनी सांगितल पाठिंब्याच कारण.
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी
मनसेला ठोकला रामराम. मनसेच्या पाठिंब्यासाठी वंचितचे वसंत मोरे आशावादी.
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता..
धाराशिवच्या पाटलांना अजितदादांनीच भाजपात पाठवलं? आधी पोस्टचा वाद आता...
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण
मुंबईतील जागेचा तिढा, वर्षा गायकवाड थेट दिल्लीला रवाना, चर्चांना उधाण.
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक
शरद पवार यांच्या 'त्या' विधानावर सुनेत्रा पवार भावूक.
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी
गोट्यांसारखे घरंगळत जाऊ नका; राज ठाकरे यांची पदाधिकाऱ्यांना तंबी.