उस्मानाबादमध्ये कंटेनर बॅरीगेट तोडून पोलीस चोकपोस्टमध्ये, 2 पोलिसांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर

सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Solapur Aurangabad Highway) येडशी उड्डाण पुल येथे एक भीषण अपघात (Truck Container Accident in Osmanabad) झाला आहे.

उस्मानाबादमध्ये कंटेनर बॅरीगेट तोडून पोलीस चोकपोस्टमध्ये, 2 पोलिसांचा जागीच मृत्यू, 1 गंभीर

उस्मानाबाद : सोलापूर-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Solapur Aurangabad Highway) येडशी उड्डाण पुल येथे एक भीषण अपघात (Truck Container Accident in Osmanabad) झाला आहे. एक भरधाव कंटेनर बॅरीगेट तोडून थेट पोलिसांच्या चेकपोस्टमधील तंबूत घुसला. यात 2 पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले, तर 1 पोलीस गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पहाटे 3 च्या सुमारास घडली. दीपक नाईकवाडी आणि संतोष जोशी अशी मृत पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत.

ऐन नवरात्र उत्सवात वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी पोलीस तैनात होते. या काळात मोठ्या वाहनांना शहरात प्रवेश बंदी होती. त्यामुळे अशी वाहने शहराच्या हद्दीवरच अडवण्याचं काम संबंधित पोलीस कर्मचारी करत होते. याचवेळी हा भीषण अपघात झाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *