बियरसाठी वॉईन शॉपमध्ये घुसून मॅनेजरला भोकसले; खासदारांच्या नातेवाईकांचे दुकान असूनही गुंडांचा हैदोस

मॅनेजर वाकोरे यांना तात्काळ रुग्णालयात दखल करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यापासून केवळ 500 मीटरवर असलेल्या ठिकाणी मुख्य चौरस्त्यावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मॅनेजरला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

बियरसाठी वॉईन शॉपमध्ये घुसून मॅनेजरला भोकसले; खासदारांच्या नातेवाईकांचे दुकान असूनही गुंडांचा हैदोस
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 1:43 PM

नांदेडः वॉईन मार्टमध्ये (Wine Mart) बियर खरेदीसाठी (Beer) आलेल्या आणि पाहिजे असलेली बियर मिळाली नाही. त्याच्या रागाच्याभरात वाईन मार्टमध्ये घुसून दिवसाढवळ्या मॅनेजरची हत्या (Manger Murder) करण्यात आल्याची घटना नांदेडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून गुंडागर्दी आणि दादागिरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सिडकोतील ढवळे कॉर्नर मुख्य रस्त्यावर प्रदीप वाईन मार्ट आहे. या ठिकाणी काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एक युवक बियर घेण्यासाठी आला होता. पण तो मागत असलेली बियर त्याला वाईन मार्टवर मिळाली नाही. त्याचा राग मनात ठेऊन बियर नसेल तर दुकान बंद करा म्हणत त्या युवकाने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तासाभराने साडेनऊ वाजता तोच युवक अन्य 4 ते 5 जणांसोबत दुकानात आला. त्यानंतर दुकानाचे लोखंडी गेट जबरदस्तीने उघडून वाईन मार्टमधील दोघा कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली.

तर याच वेळी वाईन मार्टमध्ये मॅनेजर असलेल्या युवकाला जबरदस्तीने बाहेर काढून त्याच्या बरगडीत खंजीर खुपसण्यात आला. त्यावेळी मॅनेजर रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी दुचाकीवरून पोबारा केला.

पोलीस स्थानकाजवळच हत्या

मॅनेजर वाकोरे यांना तात्काळ रुग्णालयात दखल करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सिडको ग्रामीण पोलीस ठाण्यापासून केवळ 500 मीटरवर असलेल्या ठिकाणी मुख्य चौरस्त्यावर घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत सवाल उपस्थित करण्यात येत आहे. मॅनेजरला मारहाण करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

नांदेडमध्ये गुंडांचा हैदोस

नांदेडमध्ये सध्या गुंडांचा हैदोस वाढल्याचे असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. पोलीस ठाण्याजवळ आणि तेही प्रचंड वर्दळीच्या रस्त्यावर ही हत्या झाल्याने व्यापारी वर्गातून दहशत निर्माण झाली आहे. कोणतेही मोठे कारण नसताना केवळ बोलण्याच्या रागातून इतकी क्रूरपणे हत्या करण्यात आल्याने नांदेडमधील सिडको भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

खासदारांच्या पुतण्याचे दुकान

हत्या झालेले वाईन शॉप हे खासदार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या पुतण्याचे आहे, असे असतानाही गुंडांची दुकानात जाऊन मारहाण आणि हत्या करण्यात आल्याने नांदेडमध्ये पोलिसांचा धाक राहिला नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होते आहे.

पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच सवाल

मागच्या वर्षभरापासून नांदेडमध्ये घडलेल्या अनेक गंभीर गुन्ह्यांची नीट उकल करण्यात नांदेड पोलिसांना यश आलेले नाही. त्याउलट जिल्ह्यात मटका जुगारासह अनेक अवैध धंदे मात्र राजरोसपणे सुरू आहेत, त्यामुळे पोलीस नेमकं करतात तरी काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे.

Non Stop LIVE Update
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.