AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पैसे मागितले तर कानफाडात द्या’, जरांगे पाटील यांचे समर्थकांना आवाहन, पाहा नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या समर्थकांना राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारच्या आर्थिक मदती किंवा लाचखोरीला बळी पडू नये असे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांच्याकडून मिळणारा पाठिंबा आणि उमेदवारी पूर्णतः मोफत आहेत. राजकीय नेते भेटीगाठी घेत असले तरी, पैसे देऊ नये आणि जर दिले असतील तर ते परत घ्यावेत असा सल्ला त्यांनी दिला आहे. गरीबांना न्याय मिळवून देण्यासाठी हे आंदोलन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

'पैसे मागितले तर कानफाडात द्या', जरांगे पाटील यांचे समर्थकांना आवाहन, पाहा नेमकं काय म्हणाले?
मनोज जरांगे पाटील
| Updated on: Oct 27, 2024 | 5:00 PM
Share

“सगळ्या महाराष्ट्रातील बांधवांना आवाहन करतो. काही काही म्हणत आहेत मी तुम्हाला तिकीट देतो, पैसे द्या. काय जण सांगतात, मला काही जागा सोडण्याचे अधिकार दिले आहेत. मी म्हटलं राखीव मधल्या असो, साधे कोणी असो, पैसे कोणी देऊ नका. पैसे दिले असतील तर माघारी घ्या, तुझ्या काही हातात नाही. आता गरिबांना खरा न्याय आहे. पाठिंबा फुकट, तिकीटही फुकट मग त्या सत्ताधाऱ्यात आणि विरोधकात आमच्यात काय बदल राहिला? काल एका जणांनी बैठकीत जाहीर सांगितलं म्हणून मला हा विषय घ्यायला लागला”, असं स्पष्टीकरण मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिलं.

“काहीजण म्हणतात जरांगे पाटलांनी मला सांगितले, तुम्ही ती जागा सोडा आणि मला पैसे द्या. ते खरं आहे की खोटं आहे मी ते प्रत्यक्ष बघितलं नाही. तसं असेल तर तुम्ही आपले पैसे मागे घ्या. इथे फुकट पाठिंबा मिळणार आहे. मी दुकानदाऱ्या बंद केल्या आहेत. गरिबाला न्याय द्यायचं काम सुरू केलं आहे. पैसे देऊ नका. तुमचे पैसे वाया जातील. उपयोग होणार नाही. मी कोणाचं ऐकत नाही. कानात बोललेलं ऐकत नाही. कोणाला चिरीमिरी देऊ नका. पैसे मागितले तर कानफाडात द्या”, अशा सूचना मनोज जरांगे यांनी आंदोलकांना दिल्या.

नेतेमंडळींकडून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींकडून मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. आतापर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे आजदेखील अनेक नेत्यांनी जालन्यातील अंतरवली सराटी गावात दाखल होत जरांगेंची भेट घेतली आहे. तुळजापूरचे काँग्रेसचे उमेदवार धीरज पाटील यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची अंतरली सराटी येथे जावून भेट घेतली आहे. भाजपाचे राणा पाटील यांच्या विरोधात धीरज पाटील काँग्रेसचे उमेदवार आहेत. यावेळी मनोज जरांगे पाटील आणि धीरज पाटील यांच्यात चर्चा देखील झाली आहे. यानंतर धीरज पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली.

“तुळजापूर तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांना सांगितली. ते सगळीकडे उमेदवाराची चाचपणी करणार आहेत. आम्ही सांगितलं की मतांचे विभाजणी न होता आपण सर्वजण मिळून बरोबर राहिलो तर चांगले दिवस येतील”, अशी प्रतिक्रिया धीरज पाटील यांनी दिली.

माजी आमदार संतोष टारफे यांनी घेतली जरांगेंची भेट

माजी आमदार संतोष टारफे यांनीदेखील आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. संतोष टारफे हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. कळमनुरी मतदारसंघात ठाकरेंची शिवसेना विरुद्ध शिंदेंची शिवसेना अशी लढत होत आहे. या ठिकाणी शिंदे गटाकडून आमदार संतोष बांगर हे उमेदवार आहेत. दरम्यान, संतोष टारफे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आज चर्चा झाली आहे. माजी आमदार टारफेंना कळमनुरी मतदारसंघासाठी जरांगे पाटलांच्या पाठिंब्याची अपेक्षा आहे.

सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.