AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! भगवे वादळ धडकणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार; जरांगे पाटलांचा एल्गार

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारची झोप उडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकले आहे.

मोठी बातमी! भगवे वादळ धडकणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रस्त्यावर उतरणार; जरांगे पाटलांचा एल्गार
Jarange and ReservationImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 15, 2026 | 6:04 PM
Share

मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत अनेक आंदोलने करून मराठा समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवले आहेत. गेल्या 2-3 वर्षांत केलेल्या आंदोलनात त्यांना चांगले यश मिळाले आहे. मात्र सरकारने दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून सरकारची झोप उडवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकले असून अंतरवाली सराटीतून आंदोलनाची उद्या घोषणा केली जाणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उद्या आंदोलनाची तारीख ठरणार

समोर आलेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची तारीख ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी अंतरवाली सराटी येथे जाहीर पत्रकार परिषद घेणार आहेच. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. कारण कुणबी प्रमाणपत्र, हैदराबाद गॅझेट आणि आंदोलकांवरील गुन्हे यासारख्या विषयांवरून जरांगे यांनी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

जरांगे पाटलांचा सरकारला सवाल

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला प्रश्न विचारताना म्हटले की, ‘8 महिने उलटून गेले असले तरीही तुम्ही प्रमाणपत्र का दिले नाही? सातारा संस्थानचा जीआर 1 महिन्यात काढू म्हटले होते, का नाही काढला? राज्यातील सगळे गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं, का नाही घेतले? शिवाय शिंदे समितीची मुदत वाढ आणि शिंदे समिती रेकॉर्ड शोधत नसल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे, त्यामुळे उद्या आंतरवाली सराटीतून जरांगे पाटील काय बोलणार आणि काय त्यांची पुढची भूमिका असणार याकडे सर्वांचाच लक्ष लागले आहे.

मराठा समाजाचे जरांगे पाटलांच्या आवाहनाकडे लक्ष

मनोज जरांगे यांच्या उद्या होणाऱ्या पत्रकार परिषदेत आंदोलनाची तारीख ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात मराठे पुन्हा एकदा मुंबईकडे कुच करणार आहेत. आज जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच नेकनूरला बळी गेलेला आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता उद्या जरांगे पाटील नेमकं काय बोलणार आणि मराठ्यांना काय आवाहन करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष लागले आहे.

Follow Us
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल