AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? दुपारी समाजाशी करणार चर्चा

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज दुपारी दोन वाजता समाजाशी चर्चा करून ते उपोषण सोडण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ? दुपारी समाजाशी करणार चर्चा
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 30, 2025 | 9:09 AM
Share

मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. त्यानंतर आता मोठ्या हालचाली वाढल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भाजप आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीत जरांगे यांच्या मागण्यांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील गुरुवारी दुपारी मोठ्या निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी दुपारी दोन वाजता ते समाजाशी चर्चा करणार आहे.

दुपारी दोन वाजता समाजाशी करणार चर्चा

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. आज दुपारी दोन वाजता समाजाशी चर्चा करून ते उपोषण सोडण्याची शक्यता आहे. आमदार धस आणि त्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर त्यांचे उपोषण सुटण्याची शक्यता आहे.

अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांच्या सोबत सामूहिक आमरण उपोषणात 110 आंदोलक सहभागी झाले आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात आंदोलन, साखळी उपोषण सुरु आहे. मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यात येईल, असा शब्द तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता. मात्र एक वर्ष उलटूनही आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता राज्यभरात ठिकठिकाणी सकल मराठा समाज आंदोलन करत आहे. धुळ्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी बोलताना सांगितले की, पावणे दोन वर्षे आरक्षणासाठी विविध पद्धतीने आंदोलन केली. आता वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार आहे. यापुढे उपोषण करणार नाही, पण आता झक पक आंदोलन करणार असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. फडणवीस यांना आमच्या मागण्या मान्य करायचे का नाही? हे बोलले पाहिजे. परंतु या विषयावर ते काहीच बोलत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...