Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराड आयसीयूमध्ये; मनोज जरांगेंना वेगळाच संशय, पहिली प्रतिक्रिया समोर

वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

वाल्मिक कराड आयसीयूमध्ये; मनोज जरांगेंना वेगळाच संशय, पहिली प्रतिक्रिया समोर
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 3:07 PM

मराठा आरक्षणासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळाव, या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. ते उद्या पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावर उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वाल्मिक कराडवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. वाल्मिक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावर बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?  

सुटून जायचे किंवा इतर सर्व षडयंत्र झाले असतील तर आता परत जेलमध्ये जावं, डॉक्टर नक्की कोणत्या तपासण्या करत आहेत, काय ऑपरेशन सुरू आहे? सुटून जायचं ऑपरेशन सुरू आहे का? पोलीस अधिकारी आणि डॉक्टरांमध्ये नेमकं काय सुरू आहे? आरोग्य मंत्र्यांनी या विषयात लक्ष घालण्याची गरज आहे. आता तो पळून जात नसतो, पोलीस त्याला पाय धरून अपटतील. ती कोणत्या पोलिसाची रेकॉर्डिंग व्हायरल झाली, त्याचा सगळा सिडीआर तपासला गेला पाहिजे. डॉक्ट तुम्ही जर काही चुकीचे पाऊलं उचलली तर तुमची पण चौकशी होणार असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, डॉक्टर पण गोत्यात येतील, दुखत नसताना का ठेऊन घेतलं आहे.  कोण भेटायला येतंय का तिथे, पुढच्या मागच्या दाराने कोण फोनवर बोलतंय का? आरोपींना आयसीयूमध्ये सांभाळायचं की जेलमध्ये ठेवायचं? आरोग्यमंत्री साहेब तुमच्या डॉक्टरांना विचारा नक्की त्याचं दुखतंय काय ? आरोग्यमंत्री यावर लक्ष ठेवा, कारण यात खूप शंका येत आहे. त्या रेकॉर्डिंग आलेल्या पीआयला तिथून बाजूला काढा आणि त्याची तपासणी करा. आंधळे, मुंडे, गित्ते यांना न्याय मिळाला पाहिजे.

ज्या महादेव भय्या मुंडे यांची क्रूर हत्या केली, तुमच्याच समाजातल्या लेकी बाळीच कुंकू पुसलं गेलं आहे. त्याचे तीन चार लेकरं दिसत होते, कसं चालवायचं कुटुंब त्या माउलीने, आरोपी जातीचे असले म्हणून काय झालं. मुंडे असो आंधळे असो की गित्ते त्यांच्या कुटुंबानं आवाज दिल्यास त्यांच्या न्यायासाठी पाठीशी उभे राहणार, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.