लयं फडफड करत होता, कुठं गेला काय माहीत… मनोज जरांगे यांचा कोणावर हल्ला?

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील 8 जूनला होणाऱ्या सभा होणार आहे. ही सभा विश्वविक्रमी होणार आहे. 1700 एकर जमिनीवर सभा होणार आहे. त्यातली 900 एकर जमिनीची साफसफाई होत आहे. येत्या एक तारखेपासून त्याचे कामं अधिक वेगाने सुरू होणारं आहे. नारायणगडाच्या पायथ्याशी शेकडो गावांची जवळपास 2 हजार हेक्टर जमीन आहे

लयं फडफड करत होता, कुठं गेला काय माहीत... मनोज जरांगे यांचा कोणावर हल्ला?
मनोज जरांगे पाटील
Follow us
| Updated on: Apr 22, 2024 | 9:31 AM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक होऊ लागले आहे. एकीकडे ८ जून रोजी त्यांच्या होणाऱ्या सभेची जय्यत तयारी चालली आहे. ही सभा विश्वविक्रमी करण्यात येणार आहे. त्याचवेळी विरोधकांना घेरण्याची तयारी मनोज जरांगे करत आहेत. आत ओबीसी नेत आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांनी घणाघाती हल्ला केला आहे. नाशिकच्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुण्यातील भोरमध्ये भुजबळ यांना घेरले. मनोज जरांगे म्हणले, ”लयं फडफड करत होता, स्वतःलाच मोठा समजत होता कुठं गेला कायं माहिती?..दिसत नाही अजून.. बर्फात जाऊन झोपला का कायं हिमालयात.. असे म्हणत जरांगे यांचा पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

पुण्याच्या भोरमध्ये एका कार्यक्रमाच्या ठिकाणी भाषण करत असताना मनोज जरांगे यांच्या पायाजवळ अचानक सापसुरळी आली. त्यानंतर याचा आधार घेत येवल्यावरून आली का काय?. असे म्हणत त्यांनी हा निशाणा साधला. मी सगळे तुमच्या ताकदीवर नीट केलेले आहेत. पहिल्यांदा आपली जात एकत्र नव्हती. त्याचा पुरेपूर फायदा त्यांनी उचलला. आपला छळ केला. पण आता समाज एक झालाय. लोकसभा निवडणुकीत कुणाला ना पाडा म्हटले, ना कुणाला निवडून आणा म्हटलेयं. तुम्हाला पाडायच आहे, त्यांना पाडा, पण पाडताना एवढ्या ताकदीने पाडा की त्यांच्या पुढच्या पाच पिढ्यांना उभे राहता येणार नाही. एवढी ताकद यावेळी मराठ्यांनी यावेळी दाखवावी, हे मी मराठ्यांना सांगितले आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.

…तर विधानसभेला मराठा रिंगणात

सगेसोयऱ्याची अंबलबजावणी आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा पारित करणे हे महत्वाचे आहे, जो या बाजूने असेलं त्याला समाजानं मतदान करावे. जर आरक्षण नाही दिलं, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज 100 टक्के मैदानात उतरणारं आहेस असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

हे सुद्धा वाचा

सहा कोटी मराठा येणार

मनोज जरांगे पाटील 8 जूनला होणाऱ्या सभेबाबत माहिती दिली. त्यांनी म्हटले की, त्या ठिकाणी 1700 एकर जमीन आहे. त्यातली 900 एकर जमिनीची साफसफाई होत आहे. येत्या एक तारखेपासून त्याचे कामं अधिक वेगाने सुरू होणारं आहे. नारायणगडाच्या पायथ्याशी शेकडो गावांची जवळपास 2 हजार हेक्टर जमीन आहे, पार्किंगची व्यवस्था व्हावी यासाठी शेतकरी त्याचे बांधसुद्धा मोडणार आहेत. राज्यातील 6 कोटी मराठा समाज त्याठिकाणी येणार आहे. गावागावात त्याची जागृती लोकांनी सुरू केलेली आहे. एकही मराठा त्यादिवशी घरी राहणार नाही.

Non Stop LIVE Update
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.