लॉकडाऊन मोडून मुंबईहून प्रवास, महाबळेश्वरला निघालेला तरुण कोरोनाग्रस्त, दापोलीतील तरुणालाही लागण

दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मुंबईहून महाबळेश्वर आणि दापोलीला गेलेल्या दोघा तरुणांना 'कोरोना'ची लागण झाली आहे (Men Traveled From Mumbai breaking Lockdown Detected Corona Positive)

लॉकडाऊन मोडून मुंबईहून प्रवास, महाबळेश्वरला निघालेला तरुण कोरोनाग्रस्त, दापोलीतील तरुणालाही लागण

सातारा/रत्नागिरी : लॉकडाऊन मोडून मुंबईहून प्रवास केलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वेगवेगळ्या जिल्ह्यातील तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईहून महाबळेश्वरला निघालेल्या तरुणाला ‘कोरोना’ झाला आहे. तर जोगेश्वरीहून दापोलीला आलेल्या तरुणालाही ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. (Men Traveled From Mumbai breaking Lockdown Detected Corona Positive)

सातारा जिल्ह्यात आणखी दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. महाबळेश्वर आणि कोरोगावमध्ये प्रत्येकी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 118 झाली आहे. यापैकी एका रुग्णाने मुंबईहून प्रवास केल्याची माहिती उघड झाली आहे.

मुंबईहून महाबळेश्वरला निघालेल्या व्यक्तीला शिरवळमधून पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन करुन हा रुग्ण महाबळेश्वरला निघाला होता.

दुसरीकडे, मुंबईहून दापोलीला आलेला 35 वर्षांचा तरुणही ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या किसान भवन येथील विलगीकरण केंद्रात क्वारंटाईन केले होते.

मूळचा देर्दे गावचा रहिवासी असलेला 7 मे रोजी मुंबईतील जोगेश्वरीहून दापोलीला आला होता. दापोली तालुक्यात आतापर्यंत एकूण 4 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. या रुग्णालाही रत्नागिरीत अधिक उपचारासाठी नेले जात आहे. 24 तासात 14 कोरोना संशयित रुग्ण सापडले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 35 वर गेली आहे.

(Men Traveled From Mumbai breaking Lockdown Detected Corona Positive)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *