महाराष्ट्र सदनला पाणीटंचाईचा फटका, मंत्र्यांचे प्रचंड हाल, पिण्याच्या पाण्याने अंघोळ करण्याची वेळ

महाराष्ट्र सदनलाही दिल्लीतील पाणीटंचाईचा फटका बसल्याची मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र सदनात पाणी नसल्याने मंत्र्यांदेदेखील हाल होत आहेत. महाराष्ट्र सदनात मंत्र्यांवर अंघोळीसाठी बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारावर आता टीका होत आहे.

महाराष्ट्र सदनला पाणीटंचाईचा फटका, मंत्र्यांचे प्रचंड हाल, पिण्याच्या पाण्याने अंघोळ करण्याची वेळ
दिल्ली महाराष्ट्र सदन
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 3:47 PM

भारताची राजधानी असलेल्या दिल्लीला गेल्या काही दिवसांपासून पाणी टंचाईला सामोरं जावं लागत आहे. देशात अद्यापही मान्सून दाखल झालेला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवर आता चिंता व्यक्त केली जात आहे. असं असताना राजधानी दिल्लीतला एक अजबगजब प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्रातील मराठी नागरिकांसाठी दिल्लीत महाराष्ट्र सदन बांधण्यात आलं आहे. या महाराष्ट्र सदनमध्ये देशभरातील नागरीक येत असतात. ते महाराष्ट्र सदनला भेट देत असतात. महाराष्ट्रातीलही अनेक मंत्री, विविध क्षेत्रातील दिग्गज नेते महाराष्ट्र सदनला दिल्लीत गेल्यावर आवर्जून भेट देतात. महाराष्ट्रीत दिग्गज नेते अनेकदा कामानिमित्त महाराष्ट्र सदनला गेले तर तिथे मुक्कामाला देखील राहतात. अतिशय महत्त्वाच्या अशा महाराष्ट्र सदनला दिल्लीतील पाणी टंचाईचा फटका बसला आहे. महाराष्ट्र सदनला पाणी पुरवठा होत नसल्याने इथे असलेल्या मंत्र्यांना चक्क बाटलीबंद पाणीने अंघोळ करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

महाराष्ट्र सदनच्या नव्या इमारतीमधील शौचालयांमध्येदेखील पाण्याची व्यवस्था नाही. पाणी न आल्यामुळे अनेकांची इथे गैरसोय होत असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, आज बकरी ईद आहे. या बकरी ईदमुळे वरिष्ठ अधिकारी सुट्टीवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सदनला आलेल्या अतिथींची मोठी गैरसोय होत आहे. अनेकजण बाहेरुन पाणी मागवत आहेत.

महाराष्ट्र सदनमध्ये सध्या अनेक व्हीआयपी

महाराष्ट्र सदनच्या बांधकामासाठी इतके पैसे खर्च करण्यात आले आहे. असं असताना तिथे पाण्याचं नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं बघायला मिळत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सदनमध्ये सध्या अनेक व्हीआयपीदेखील आल्याची माहिती मिळत आहे. त्यांनादेखील बाहेरुन पाणी आणून दिल्याची माहिती मिळत आहे. पिण्याच्या पाण्याचा मशिनमध्येदेखील काहीच पाणी नाही.

महाराष्ट्र सदनमध्ये पाण्याचं नियोजन करणं गरजेचं होतं. कारण देशभरातीतून आणि महाराष्ट्रातील अतिथी वेगवेगळ्या कामानिमित्ताने महाराष्ट्र सदनमध्ये येत असतात. न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार असे अनेक व्हीआयपी महाराष्ट्र सदवमध्ये येत असतात. त्यामुळे सदनाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित यावर लक्ष घालून पाण्याचं नियोजन करावं, अशी मागणी अतिथींकडून केली जात आहे. ही मागणी आता कधी पूर्ण केली जाते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.