मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मिरा भाईंदर पालिकेची अभय योजना, नागरिकांना मोठा दिलासा

मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने ' अभय योजना 2021 ' आणली आहे. Mira Bhayandar municipal corporation

मालमत्ता कर थकबाकीदारांसाठी मिरा भाईंदर पालिकेची अभय योजना, नागरिकांना मोठा दिलासा
मीरा भाईंदर महानगरपालिका

मिरा भाईंदर : शहरातील मालमत्ता कर भरण्यासाठी मिरा भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने ‘ अभय योजना 2021 ‘ आणली आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर भरणाऱ्या आस्थापनांसाठी करावरील व्याजावर 75 टक्के माफी मिळणार असून 25 टक्के दंड भरावा लागणार आहे. यायोजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. ( Mira Bhayandar municipal corporation announced Abhay Scheme 2021 for Arrears citizen)

थकबाकीदारांसाठी अभय योजना

मालमत्ता करासाठी अभय योजना सुरु करण्यात आली आहे. मूळ रक्कम भरा, व्याज, दंडात 75 टक्के सूट मिळवा, अशी योजना महानगरपालिकेच्या वतीने 25 फेब्रुवारी ते 15 मार्च 2021 या 20 दिवसांच्या कालावधीमध्ये ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवली जात आहे. यामध्ये थकित मालमत्ता कर धारकांनी आपल्या मालमत्ता कराची 25 टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यांची 75 टक्के दंडात्मक रक्कम माफ केली जाणार आहे.

मिरा भाईंदरमधील थकबाकीदारांना दिलासा

मिरा भाईंदर परिसरात या योजनेमुळे थकबाकीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार आयुक्तांना प्राप्त असलेल्या अधिकारान्वये ही योजना लागू करण्यात आली आहे. ‘मालमत्ता कर अभय योजने’चा कालावधी 20 दिवसांचा राहील. या योजनेंतर्गत 31 मार्च 2020 पर्यंत थकित कर असणाऱ्या, तसेच चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता कर 25 फेब्रुवारी 2020 पर्यंत भरल्यास चालू आर्थिक वर्षाकरिता थकबाकीदार होणाऱ्या करदात्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

कोव्हिड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित झाल्याने लोकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असल्याने थकित मालमत्ता कर रकमेवरील शास्ती माफ करण्याची मागणी देखील करदात्यांनी केली होती. त्यानंतर पालिकेने ‘मालमत्ता कर अभय योजना’ राबवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

अभय योजना कालावधीत कर भरण्याचं आवाहन

जे नागरिक व मालमत्ता धारक “अभय योजना” कालावधीत मालमत्ता कराचा भरणा करणार नाहीत, अशा थकबाकीदार मालमत्ता करधारकांविरुद्ध महानगरपालिकेमार्फत मालमत्ता जप्त करणे, मालमत्तेचा लिलाव करणे व इतर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मिरा भाईंदर मनपा महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी दिली.

संबंधित बातम्या :

खडसेंनंतर भाजपला मीरा-भाईंदरमध्येही मोठ्या झटक्याची शक्यता, बडा नेता शिवसेनेत प्रवेश करणार?

मिरा भाईंदरच्या ‘कोरोना’ग्रस्त आमदार गीता जैन यांचे बर्थडे सेलिब्रेशन

( Mira Bhayandar municipal corporation announced Abhay Scheme 2021 for Arrears citizen)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI