Ruturaj Patil Video : आमदार ऋतुराज पाटील बनले ट्रॅफीक पोलीस, चौकातलं ट्रॅफीक हटवल्याचा व्हिडिओ चर्चेत

ऋतुराज पाटलांनी चौकात उभा राहून स्वतः ट्रॅफिक हवालदाराची जबाबदारी बजावत ट्रॅफिक हटवलं आणि मग गाडीत बसले गेले पुढे असे, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

Ruturaj Patil Video : आमदार ऋतुराज पाटील बनले ट्रॅफीक पोलीस, चौकातलं ट्रॅफीक हटवल्याचा व्हिडिओ चर्चेत
आमदार ऋतुराज पाटील झाले ट्रॅफीक पोलीस, चौकातलं ट्रॅफीक हटवल्याचा व्हिडिओ चर्चेत Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 11, 2022 | 9:02 PM

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की फक्त तांबडा-पांढरा (Tambda Pandhra), उसाचे फड, तालमी आणि गौरवशाली इतिहास (History) आणि आदर्श वारसा, कोल्हापुरातले राजकारणीही तसेच आहेत. याचं दर्शन आज पुन्हा घडून आलंय. तुम्ही आमदार ऋतुराज पाटलांचंच (Ruturaj Patil) घ्या की, एरवी इस्त्रीचे कपडे घालून, चकाचक गाडीत बसून, डोळ्याला चष्मा लावून फिरणारे ऋतुराज पाटील आज दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास भर पावसात धैर्यप्रसाद हॉल चौकात पोहोचले. मात्र जाताना त्यांना दिसलं दोन्ही बाजूला ट्रॅफिक, वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या. याठिकाणी गाडीही कोणी मागे घ्यायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे म्हटल्यावर ऋतुराज पाटलांना दम निघेना, त्यांनी उघडला गाडीचा दरवाजा आणि उतरले खाली, राहिले रस्त्याच्या मध्ये चौकात उभा. आता आमदार रस्त्याच्या मध्ये चौकात उभा राहिलाय म्हणल्यावर वाहन चालकांना जरा शिस्त आली. ऋतुराज पाटलांनी चौकात उभा राहून स्वतः ट्रॅफिक हवालदाराची जबाबदारी बजावत ट्रॅफिक हटवलं आणि मग गाडीत बसले गेले पुढे असे, त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

पाहा व्हिडिओ

हे कोल्हापुरातच दिसतं

गोकुळची निवडणूक लागल्यावर आमच्या कोल्हापुरातल्या राजकारण्यांचा राडा तुम्ही अनेकदा पाहिलाय. तसेच आमचं ठरलंय, हे कोल्हापुरातलं वाक्य ही मागच्या निवडणुकीत महाराष्ट्रभर गाजलं. निवडणूक कुठलीही असू द्या कोल्हापूरसारखा माहोल कुठेच बनत नाही. मात्र निवडणूक संपली की तेच राजकारणी जनतेची काम चौकात उभे राहून करताना दिसतात. तेच कर्तव्य आज ऋतुराज पाटलांनी बजावलं आहे. त्यामुळे ऋतुराज पाटलांचा हा व्हिडिओ कोल्हापूरात वाऱ्यासारखा फिरतोय पोरांच्या कमेंट आणि लाईकचा पाऊस पडायला लागलाय.

आमदारांची रस्त्यावर अनोखी फिल्डिंग

तुम्ही कोल्हापूर पोटनिवडणुकीत बंटी पाटलांची फिल्डिंग बघितली असेल, त्या फिल्डिंगच्या जोरावर त्यांनी काँग्रेसचा उमेदवार सहज निवडून आणला. पण ही फिल्डिंग फक्त राजकारणातच नाही तर एक आमदार चौकात उभा राहून लावत वाहनांचा ट्रॅफिक हटवू शकतो, हीही ऋतुराज पाटलांनी आज महाराष्ट्रला दाखवून दिलं आहे. यावेळी काही कार्यकर्तेही त्यांच्या मदतीला उतरल्याचे दिसून आले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.