Raj Thackrey : मनसे मविआत होणार सामील ? राज ठाकरेंची भूमिका काय ? संजय राऊत स्पष्टच बोलले
युती फक्त मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांपुरती मर्यादित न ठेवता, मनसेला महाविकास आघाडीसोबत आणण्यासंबंधी चर्चा सुरू झाली असून त्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केले

महाराष्ट्र नविनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, 5 जुलैच्या मेळव्यात एकत्र आल्यावर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली. त्यानंतरही अनेकवेळा उद्धव आणि राज ठाकरे एकत्क दसिले, कधी एखाद्या कार्यक्रमात तर कधी एकमेकांच्या निवासस्थानी जाताना दिसले. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासंबंधी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नसली तरी दोघांच्या वारंवार होणाऱ्या भेटी, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या होणाऱ्या बैठकी यातून चित्र स्पष्ट होता दिसत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र यावे अशी महाराष्ट्रातील अनेकांची इच्छा असून आगामी महापालिका निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुकांसाठी दोन्ही बंधू युती करणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
मात्र असे असतानाच आता आणखी एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. ही युती फक्त मनसे आणि शिवसेना या दोन पक्षांपुरती मर्यादित न ठेवता, मनसेला महाविकास आघाडीसोबत आणण्यासंबंधी चर्चा सुरू झाली असून त्यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट भाष्य केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी मनसे आणि मविआच्या मनोमिलनाबद्दल सूतोवाच केलं. राज ठाकरे आणि उद्धव एकत्र येतील असं म्हटलं जातं आहे, शरद पवारांनाी सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तशी नेते-पदाधिकाऱ्यांची मागणी आहे, असं असताना राज ठाकरे महाविकास आघाडीत येण्यास तयार आहेत का, उच्छुक आहेत का ? असा सवाल राऊत यांना विचारण्यात आला.
त्यावर राऊत यांनी स्पष्ट भाष्य केले. “स्वत : राज ठाकरे यांची इच्छा आहे की आपल्याला महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला सोबत घेणं गरजेच आहे, ही त्यांची भूमिका आहे. प्रत्येकाचं या राज्यात एक स्थान आहे, शिवसेना ( ठाकरे गट), मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) या पक्षांचं, डाव्या पक्षांचं स्थान आहे. तसंच काँग्रेस हा देखील महाराष्ट्रातील एक महत्वाचा पक्ष आहे. काही निर्णय घेताना शिष्ट मंडळात काँग्रेसचा समावेश होण गरजेचा आहे ही आमची भूमिका आहे. तीच राज ठाकरे यांची देखील आहे ” असं संजय राऊत म्हणाले. मात्र याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचंही राऊतांनी सांगितलं.
काँग्रेसचं नेतृत्व दिल्लीत आहे, काँग्रेसच्या नेतृत्वाला इथे निर्णय घेण्याचा अधिकार नाही, असंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं. ज्यांचं नेतृत्व दिल्लीत, ते दिल्लीमध्ये निर्णय घेतील असंही राऊत म्हणाले.
