AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“जातीयवादाला शरद पवार एकटेच कारणीभूत”; राज ठाकरे यांनी जंत्रीच मांडली

राज ठाकरे हे अमरावती नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.

जातीयवादाला शरद पवार एकटेच कारणीभूत; राज ठाकरे यांनी जंत्रीच मांडली
| Updated on: Aug 24, 2024 | 12:52 PM
Share

Raj Thackeray Big Allegation On Sharad Pawar : “आपल्या महापुरुषांना कधी जातीत पाहिलं नाही. संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. असा महाराष्ट्र कधीच नव्हता”, असा घणाघात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरेंनी राष्ट्रवादी पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही टीका केली.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे अॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे हे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे दौरे करत आहे. आज राज ठाकरे हे अमरावती नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.

“पाच वर्षात गलिच्छ राजकारण झालं”

“लोकसभा निवडणुकीत झालेले मतदान हे अँटी मोदी आणि अँटी शाह होतं. ठाकरे आणि पवारांच्या प्रेमासाठी मतदान केलं नाही. संविधान बदलण्याच्या कारणामुळे दलितांनी एकगठ्ठा मतदान केलं. त्यांनी पाच वर्षात गलिच्छ राजकारण झालं. लोक या राजकारण्यांना स्वीकारणार नाही. मतदार ही गोष्ट विसरलेले नाहीत. ते विधानसभेत त्याचा राग काढतील. मी फिरतोय, वाचतोय आणि ऐकतोय त्यातून मला जे दिसलं ते मी सांगितलं”, असे राज ठाकरे म्हणाले.

“जातीचं विष शरद पवारांनी कालवलं”

“पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवाद अधिक वाढला. पहिली गोष्ट म्हणजे फोडाफोडीचं राजकारण झालं. या सर्व गोष्टींना शरद पवार कारणीभूत आहेत,. त्यांनी ही सुरुवात केली. पुलोद स्थापन झाल्यापासून ही गोष्ट सुरू आहे. शरद पवार यांनी 1991 ला शिवसेनेचे आमदार फोडले. भुजबळ वगैरे फोडले. त्यानंतर अनेक लोकांना फोडलं. गणेश नाईकांना फोडलं. राणे गेले. हे सर्व राजकारण शरद पवार यांनी सुरू केलं. जातीचं विषही शरद पवार यांनीच कालवलं”, असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केला.

“हा घराघरात गेलेला विषय”

“1991 ला राष्ट्रवादी स्थापन झाली. त्यानंतर आणि त्यापूर्वीचा महाराष्ट्र पाहा. आपल्या महापुरुषांना कधी जातीत पाहिलं नाही. संताना आडनावाने किंवा जातीने पाहिलं गेलं नाही. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या गोष्टी सुरू झाल्या. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. 1990 नंतर हा जातीयवाद सुरू झाला. हे सर्वांनी मिळून बंद केलं पाहिजे. हा विषय लोकसभा किंवा विधानसभेसाठीचा नाही. हा घराघरात गेलेला विषय आहे”, असे राज ठाकरे म्हणाले.

लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.