पुणे MAHDA च्या चार हजारहून अधिक घरांसाठी 10 दिवसात 12 हजारांपेक्षा अधिक अर्ज

चार हजार अधिक घरांच्या असलेल्या या लॉटरीसाठी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावेत असे आवाहन पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

पुणे MAHDA च्या चार हजारहून अधिक घरांसाठी 10 दिवसात 12 हजारांपेक्षा अधिक अर्ज
म्हाडा

पुणे- पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) वतीने 16 नोव्हेंबर रोजी तब्बल 4 हजार 222 घरांसाठी सोडत जाहीर केली. या दहा दिवसात राज्यातील विविध भागातून या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लॉटरी जाहीर झाल्यापासून दहा दिवसात तब्बल 12 हजार 633 लोकांनी यासाठी अर्ज केले आहेत. येत्या 16 डिसेंबरपर्यंत नागरिकांना या अर्ज करता येणार आहेत. चार हजार अधिक घरांच्या असलेल्या या लॉटरीसाठी जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करावेत असे आवाहन पुणे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी केले आहे.

पुणे म्हाडाकडून काढण्यात आलेल्या या सोडत योजनेत 2,823 सदनिकेसह 20टक्के   सर्वसमावेशक योजनअंतर्गतच्या 1399  सदनिका अश्या मिळून 4,222 सदनिका आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. या नवीन सोडत योजनेमुळे अनेक गरीब व सर्वसामान्य लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य

4 हजार 222 घरांसाठीची ऑनलाईन लाॅटरी काढली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत संकेत क्रमांक 532परांजपे अभिरुची परिसर, धायरी (1 RK ) येथील 75 सदनिका उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. त्या सदनिकांसाठी 728 इतके विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 405अर्जदारांनी अनामत भरली आहे. या 75 सदनिका वितरित करून झाल्या आहेत.

हिवाळ्याच्या हंगामात मुळ्याच्या पानांचा रस प्या आणि निरोगी राहा!

Bhaiyyu Maharaj | मांत्रिकाशी 25 लाखांची डील, भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करणाऱ्या युवतीचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट, पियुष जिजू कोण?

युरोप, आफ्रिकेत नव्या कोरोना विषाणूचा उद्रेक, शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे काय होणार? टोपे म्हणतात…

Published On - 4:05 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI