उस्मानाबादः महाराष्ट्रात बंडखोरी करून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होतं. त्यामुळे त्यावेळेपासून ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा न्यायालयीन लढा सुरु असल्याने त्याबद्दल बोलताना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाला मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र निवडणूक आयोगावरच ओमराज निंबाळकर यांनी संशय व्यक्त केला आहे.