मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकला आहे, थोड्या वेळाने पुन्हा संपर्क साधेन : संभाजीराजे

MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर त्या निर्णयाचं छत्रपती संभाजीराजेंनी स्वागत केलं आहे.

मुख्यमंत्र्यांना मेसेज टाकला आहे, थोड्या वेळाने पुन्हा संपर्क साधेन : संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Akshay Adhav

|

Oct 09, 2020 | 7:42 PM

मुंबई : ठाकरे सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं खासदार छत्रपती संभाजीराजेंनी स्वागत केलं. आहे तसंच मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभार मानले आहेत. (MP Sambhajiraje On MPSC Exam postponed)

मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली आहे. तसंच सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर मी मुख्यमंत्र्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र ते व्हिडिओ कॉन्सफर्स मध्ये असल्याने व्यस्त होते. आता थोड्यावेळाने पुन्हा मी त्यांच्याशी संपर्क साधेन. मात्र त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करणारा मेसेज मी टाकला असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली.

सरकारच्या निर्णयानंतर संभाजीराजेंनी ट्विट करून सरकारचे आभार मानले आहेत. मराठा समाजाच्या भावना समजून MPSC परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला याबद्दल मराठा समाजाच्या वतीने सरकारचे आभार, असं ट्विट संभाजीराजेंनी केलं आहे.

इतर समाजाच्या विद्यार्थ्यांनी वयोमर्यादाची काळजी करू नये. सर्व विद्यार्थ्यांची वयोमर्यादा वाढवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देखील संभाजीराजेंनी दिली. राज्य सरकार जोपर्यंत MPSC परीक्षा रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा खासदार संभाजीराजे यांनी दिला होता. त्यानंतर आज सरकारने MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

येत्या 11 तारखेला महाराष्ट्रात 200 जागांसाठी एमपीएससी परीक्षा जाहीर झाली होती. आज आमची बैठक झाली. गेल्या चार महिन्यात कोरोनाचं संकट आहे. गेल्या काही महिने अभ्यासिका, क्लासेस बंद होते. विद्यार्थ्यांच्या सूचना आल्या, अभ्यासाला वेळ मिळायला हवा. त्यामुळे ही परीक्षा काही काळ पुढे ढकलत आहोत, यापूर्वी दोनवेळा परीक्षा पुढे ढकलली होती. आता पुढे जी तारीख ठरवू त्याच तारखेला काहीही करून परीक्षा होईल. जे 11 तारखेच्या परीक्षेला पात्र होते, ते सर्व पुढच्या तारखेला म्हणजे जी तारीख जाहीर होईल, त्या तारखेसाठी पात्र असतील, कोणाचंही वय वाया जाणार नाही, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. (MP Sambhajiraje On MPSC Exam postponed)

संबंधित बातम्या

MPSC ची परीक्षा पुढे ढकलली, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

MPSC परीक्षा तात्काळ पुढे ढकलाव्यात, अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक होईल, उदयनराजेंचा इशारा

MPSC परीक्षा रद्द होणार नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; संभाजीराजेंचा इशारा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें