Sanjay Raut : ‘मराठी माणसाला पटकून, पटकून…’ निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल
Sanjay Raut : "तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरुन खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे. डुप्लीकेट शिवसेना कुठे आहे? अर्ध्या दाढीवरुन हात फिरवणारे, अर्धी दाढी कापून अर्ध्या दाढीत महाराष्ट्रात फिरवेल, इतकी जनता चिडली आहे" अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी नाकारली?. या राज्यात मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल, तर मग त्याने हा मोर्चा कुठे काढायचा? हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले. “मीरा-भाईंदरमध्ये आज सर्व पक्ष, त्यांचे झेंडे बाजूला ठेऊन प्रतिकात्मक मोर्चा काढतायत. या मोर्चाची परवानगी मागितली जाते. परवानगी नाकारली जाते आणि पोलीस बळाचा वापर करुन मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना, कार्यकर्त्यांना पहाटे दोन ते तीन वाजता अटक केली जाते. हे महाराष्ट्र राज्य आहे का? या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे का? पुन्हा एकदा मोरारजी देसाईंचा आत्मा फडणवीस यांच्या शरीरात गेलाय आणि ते असे अघोरी काम करायला लागले आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
“मला तरं भिती वाटते, मराठी माणसावर मोराराजी भाईंप्रमाणे गोळ्या चालवून जे 106 हुतात्मे झाले, त्यांचा रेकॉर्ड मोडतील अशा प्रकारच वर्तन फडणवीस करत आहेत. पहाटे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी अविनाश जाधव, शिवसेनेच काही प्रमुख नेते आहेत. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत. या सर्वांना नोटीसा बजावल्या. मोर्चा काढू नका, मग त्यांना ताब्यात घेतलं” असं संजय राऊत म्हणाले.
‘डुप्लीकेट शिवसेना कुठे आहे?’
“तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरुन खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे. डुप्लीकेट शिवसेना कुठे आहे? अर्ध्या दाढीवरुन हात फिरवणारे, अर्धी दाढी कापून अर्ध्या दाढीत महाराष्ट्रात फिरवेल, इतकी जनता चिडली आहे. कुठे आहेत शिवसेने शिवसेना म्हणता, आमचीच खरी शिवसेना. मग, अमित शाहला विचारायला पाहिजे का?. दुबेचा किती लोकांनी निषेध केला” असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
हे उद्यागोपतींची दलाली करुन कमिशन खाण्याइतकं सोपं आहे का?
“महाराष्ट्राविषयी अत्यंत घाणेरड्या शब्दात निशिकांत दुबेने वक्तव्य केलं. तो भाजपा खासदार, नेता नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा खास माणूस आहे. एकतर मुंबई, महाराष्ट्रात कोणत्याही हिंदी भाषिकावर आम्ही हल्ला केलेला नाही. हे फडणवीस यांनी महाराष्ट्राच्यावतीने सांगायला पाहिजे. काय माहित आहे, त्या दुबेला? मराठी माणसाला पटकून, पटकून हे उद्यागोपतींची दलाली करुन कमिशन खाण्याइतकं सोपं आहे का? मिस्टर दुबे. मोदी, शाहंचे बूट चाटण्याइतकं हे सोपं नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे” असं संजय राऊत म्हणाले.
निशिकांत दुबेकडे फेक डिग्री
फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेत बसला आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला. “मऊआ मोईत्राची मुलाखत घ्या. दुबेकडे दिल्ली विद्यापीठाची फेक डिग्री आहे. जसा गुरु तसा चेला. तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देताय. या राज्याचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तोंडात बोळा घालून बसलय” अशी टीका संजय राऊत यांनी केली.
