लाल वादळ सरकारला हवेत घेऊन जाईल, अमोल मिटकरी यांचा जोरदार हल्लाबोल; तो विषाचा घोट होता म्हणून…
अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्या पत्राचा आधार घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा आधार घेत लॉन्ग मार्चवरही भाष्य केलं आहे.

मुंबई : राष्ट्रावादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाशिकहून निघणाऱ्या लाल वादळासह संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. याशिवाय त्यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्ता यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा यावेळेला अमोल मिटकरी यांनी केली आहे. अमोल मिटकरी म्हणाले, अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे सरकार समर्थन करत आहे आणि शिंदे फडणवीस सरकारने जो शेतकऱ्यांच्या बाबतीत अर्थसंकल्प सादर केला तो फक्त विषाचा घोट देणारा अर्थसंकल्प सादर केला आहे. आणि एक प्रकारे अब्दुल सत्तारची पाठ राखण करून शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे समर्थन केलं आहे.
जर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे खरंच शेतकऱ्याच्या बाजूने आहेत तर आजच्या आज अब्दुल सत्तारची हकालपट्टी केली पाहिजे किंवा या सभागृहामध्ये अब्दुल सत्तारला माफी मागायला भाग पाडा की ज्या अब्दुल सत्तारने शेतकऱ्यांचा अपमान केलाय.
अब्दुल सत्तारचं वक्तव्य देशातील तमाम शेतकऱ्याचा अपमान करणार आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळातून कृषिमंत्री पदावरून अब्दुल सत्तार ची हकालपट्टी झाली पाहिजे. प्रत्येक शेतकरी आता हा सुजाण झाला आहे.
शेतकऱ्याला कळतंय मांडलेला अर्थसंकल्पामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, तुर उत्पादक शेतकरी, ऊस, हरभरा उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकरी यांच्या तोंडाला पाना पुसण्याचा पाप या सरकारने केले.
जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूचा समाधानकारक अर्थसंकल्प मांडला असता तर हा मोर्चा धडकला नसता पण हा मोर्चा धडकतोय याचा अर्थ शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रचंड नैराश्य आहे आणि बळीराजाला सुखावणारा कुठलाही निर्णय सरकार घेताना दिसत नाही.
आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था झालेली असताना थातूरमातूर अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी सादर केला नाव जरी त्याला पंचामृत दिलं असेल मात्र तो प्रत्यक्षात विषयाचा घोट आहे.
शेतकऱ्यांनी सरकार विरुद्ध उचललेला एल्गार आहे आणि आज जे वादळ धडकणार आहे ते वादळ भविष्यात या सरकारला हवेत कधी घेऊन जाईल या सरकारच्या पण लक्ष येणार नाही. असा टोला अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
जर भीमा सहकारी साखर कारखान्याबद्दल राज्यसभेचे खासदार संजय राऊत साहेबांनी पत्र उपमुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना दिला असेल तर यावर गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निपक्षपाती चौकशी केली पाहिजे.
किरीट सोमय्या यांनी खोटी कागदपत्र देऊन किंवा उच्च न्यायालयाच्या निकालानंतर सुद्धा ज्या पद्धतीने राजकारण करत असून हसन मुश्रीफ यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सोमय्याच्या पत्रावर ऍक्शन होते आणि संजय राऊत साहेबांनी दिलेल्या पत्रावर जर ऍक्शन होत नसेल तर मग तुमची भूमिका संशयास्पद आहे.
संजय राऊत यांनी जर भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये जर भ्रष्टाचार राहुल कुल यांनी केला असेल तर त्याची निपक्षपाती चौकशी केली पाहिजे आणि जर ते दोष असतील तर त्यांच्या कारवाई केली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालत नाही हे सरकार समोर येईल.
मी संजय राऊत यांना विनंती करतो की अनेक घोटाळे बहाद्दर भाजपमध्ये आहेत, त्यांची सुद्धा गुरुकिल्ली काढा मागच्या सरकारच्या काळात सरकार सत्ता आपली असताना आपण या लोकांना रान मोकळ करून द्यायला नव्हतं पाहिजे ते आपली चूक झाली ही चूक आता तरी दुरुस्त करण्याची वेळ आहे असं मिटकरी यांनी म्हंटलं आहे.
