AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दादरमध्ये 15 मजली इमारतीत लागली भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू

दादर परिसरातील एका इमारतीला आग (fire in building) लागून एका व्यक्तीचा मृत्यू ( one person deAD) झाला आहे. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.

दादरमध्ये 15 मजली इमारतीत लागली भीषण आग, एका व्यक्तीचा मृत्यू
| Updated on: Sep 23, 2023 | 11:23 AM
Share

दादर | 23 सप्टेंबर 2023 : मुंबईतील दादर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दादर परिसरातील एका इमारतीला आग (fire in building) लागून एका व्यक्तीचा मृत्यू ( one person dead) झाला आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून आगीच्या धुरामुळे गुदमरून एक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्याचे समजते. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तर या एका महिलेला वाचवण्यात यश मिळाले आहे.

दादर पूर्वेकडील हिंदू कॉलनीतील एका 15 मजली निवासी इमारतीच्या 13व्या मजल्यावर शनिवारी सकाळी आग साडेआठच्या सुमारास ही आग लागली. आगीमुळे सर्वत्र धुराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे त्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीचा श्वास गुदमरून तो बेशुद्ध झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सचिन पाटकर असे मृत व्यक्तीचे नाव असून ते 60 वर्षांचे होते.

दरम्यान आगीचे वृ्त्त समजताच अग्निशमन दल व पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.

( डिस्क्लेमर :  ही बातमी अपडेट होत आहे.)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.