AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे निलंबित आमदार दाद मागण्यासाठी राज्यपालांना भेटणार; ठाकरे सरकारची तक्रार करणार

गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. (12 BJP suspended MLAs will meet maharashtra governor)

भाजपचे निलंबित आमदार दाद मागण्यासाठी राज्यपालांना भेटणार; ठाकरे सरकारची तक्रार करणार
vidhanbhavan
| Edited By: | Updated on: Jul 05, 2021 | 5:41 PM
Share

मुंबई: गैरवर्तनाच्या कारणावरून भाजपचे 12 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता हे सर्वच्या सर्व निलंबित आमदार राज्यपालांना भेटणार आहेत. हे आमदार राज्यपालांना भेटून वस्तुस्थिती मांडतानाच ठाकरे सरकारची तक्रारही करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (12 BJP suspended MLAs will meet maharashtra governor)

ओबीसी आरक्षणाच्या ठरावावर चर्चा सुरू असताना भाजपच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. काही आमदारांनी तालिका अध्यक्षांचा माईक ओढला. तर काहींनी थेट अध्यक्षांनाच शिवीगाळ केली. त्यामुळे अध्यक्ष प्रचंड संतप्त झाले होते. परिणामी या 12 आमदारांचं निलंबन करण्यात आलं. आता हे आमदार आज संध्याकाळी 6 वाजता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे दाद मागणार आहेत. त्याबाबत भाजपची बैठक सुरू झाली असून त्यात पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

काय घडलं सभागृहात?

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत ओबीसींचा इम्पिरीकल डेटा केंद्र सरकारकडून मिळावा म्हणून अधिवेशनात ठराव मांडला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची भूमिका मांडली. त्यानंतर भुजबळांनी बोलण्यास सुरुवात केली. यावेळी उज्ज्वला गॅससाठी डेटा वापरला जातो. मग ओबीसींच्या आरक्षणासाठी का दिला जात नाही? असा सवाल भुजबळ यांनी केला. त्यावर फडणवीसांनी हरकतीचा मुद्दा मांडला. त्यावेळी तालिका अध्यक्षांनी फडणवीसांचा हरकतीचा मुद्दा स्वीकारला नाही. अध्यक्षांनी भुजबळांना बोलण्यास सांगितलं. त्यामुळे भाजपचे आमदार आक्रमक झाले.

भाजपच्या आक्रमक आमदारांनी अध्यक्षांच्या समोरी हौदात येऊन जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ घातला. त्यानंतर एका आमदाराने अध्यक्षांचा माईक ओढला. या गदारोळात धक्काबुक्की झाली. यावेळी भाजपच्या आमदारांनी तालिका अध्यक्षांना शिवीगाळही केल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे सभागृहाचं वातावरण अधिकच तापलं होतं.

या आमदारांचं निलंबन

संजय कुटे आशिष शेलार अभिमन्यू पवार गिरीष महाजन पराग अळवणी राम सातपुते हरिश पिंगळे भातखळकर जयकुमार रावल नारायण कुचे बंटी भांगडिया योगेश सागर (12 BJP suspended MLAs will meet maharashtra governor)

संबंधित बातम्या:

आमचे आमदार सस्पेंड करण्यासाठी सरकारने स्टोरी रचली; फडणवीसांचा आमदार निलंबनावरून आरोप

तालिका अध्यक्ष म्हणून भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल, अतुल भातखळकरांचा घणाघात

Breaking : विधानसभेत तुफान राडा; भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन, कोणकोणत्या आमदारांचा समावेश?

(12 BJP suspended MLAs will meet maharashtra governor)

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.