Corona Update Today : देशात 24, तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, देशात 16 हजार 135 नवीन रुग्ण

देशात 24 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. देशात 18 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रविवारी देशात 16 हजार 103 नवे रुग्ण आढळले होते. 31 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला होता. देशात 1 लाख 13 हजार 864 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Corona Update Today :  देशात 24, तर राज्यात 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू, देशात 16 हजार 135 नवीन रुग्ण
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 04, 2022 | 8:12 PM

मुंबई : देशात कोरोनाचे 16 हजार 135 नवीन रुग्ण आढळलेत. तर 24 तासांत 24 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. राज्यात कोरोनाचा धोका वाढताना दिसत आहे. आज महाराष्ट्रात (Maharashtra) 3 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. तर 1 हजार 515 नवे रुग्ण आढळून आलेत. 2 हजार 62 कोरोना रुग्ण बरे झालेत. राज्यात आतापर्यंत 78 लाख 16 हजार 933 कोरोना (Corona) बाधित रुग्ण बरे झालेत. राज्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97. 87 टक्के आहे. राज्यात कोरोनाचा मृत्यूदर 1.85 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 8 कोटी 21 लाख 42 हजार नमुन्यांपैकी 79 हजार 86 हजार 811 नमुने पॉझिटिव्ह सापडलेत. मुंबईत (Mumbai) सर्वाधिक 7 हजार 40 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. त्यापाठोपाठ पुण्यात 5 हजार 221 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.

राज्यात 21 हजार 935 अॅक्टिव्ह रुग्ण

राज्यात 4 जुलै रोजी 21 हजार 935 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी मुंबई, पुण्यापाठोपाठ ठाण्यात 4 हजार 605 अॅक्टिव्ह रुग्ण सापडलेत. रायगड जिल्ह्यात 1 हजार 180 रुग्ण आढळून आलेत. पालघरमध्ये 634 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आहेत नागपुरात 511 कोरोना रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. नाशिकमध्ये 378 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. वाशिममध्ये 307 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापुरात 202 रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत सार्वजनिक आरोग्य विभागानं ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

ठाणे मंडळात सर्वाधिक मृत्यू

ठाणे मंडळात बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत 39 हजार 905 रुग्णांचा मृ्त्यू झाला. त्यापाठोपाठ पुणे मंडळात 33 हजार 143 जणांचा मृ्त्यू झाला. नाशिक मंडळात आतापर्यंत कोरोनानं 20 हजार 548 जणांचा बळी घेतला. कोल्हापूर मंडळात 15 हजार 653 जणांचा बळी घेतला. लातूर आणि औरंगाबाद मंडळात अनुक्रमे 10 हजार 217 व 7 हजार 302 जणांचा कोरोनानं मृत्यू झालाय. अकोला मंडळात 6 हजार 391 मृत्यू झाले आहेत.

देशात 1 लाख 13 हजार 864 अॅक्टिव्ह

देशात कोरोनाचे 16 हजार 135 नवीन रुग्ण आढळलेत. तर 24 तासांत देशात 24 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला. देशात 18 हजार 958 रुग्ण कोरोनामुक्त झाले. रविवारी देशात 16 हजार 103 नवे रुग्ण आढळले होते. 31 जणांचा कोरोनानं मृत्यू झाला होता. देशात 1 लाख 13 हजार 864 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें