AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra budget 2021: बजेटपूर्वी चिंता वाढवणारी बातमी; विधिमंडळातील 36 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

मुंबईतील जे.जे. रुग्णालयाने विधिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. | Maharashtra Budget 2021 Coronvirus

Maharashtra budget 2021: बजेटपूर्वी चिंता वाढवणारी बातमी; विधिमंडळातील 36 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
6 आणि 7 मार्चला विधिमंडळातील 2,476 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते. यापैकी 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
| Updated on: Mar 08, 2021 | 10:59 AM
Share

मुंबई: लॉकडाऊनच्या धक्क्यातून हळूहळू सावरत असलेल्या महाराष्ट्राचा वार्षिक अर्थसंकल्प सोमवारी विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) दुपारी 2 वाजता सभागृहात अर्थसंकल्पाच्या (Maharashtra Budget 2021) वाचनाला सुरुवात करतील. मात्र, त्यापूर्वीच विधिमंडळाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. (2,746 samples received from Maharashtra Assembly on 6th & 7th March, 36 tested positive for COVID ahead of Budget session)

मुंबईतील जे.जे. रुग्णालयाने विधिमंडळातील कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, 6 आणि 7 मार्चला विधिमंडळातील 2,476 जणांचे नमुने तपासणीसाठी आले होते. यापैकी 36 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता अर्थसंकल्प मांडतेवेळी राज्य सरकारकडून काय खबरदारी घेतली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यापूर्वी रविवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या 11,141 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. ही राज्यासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. त्यामुळे आता राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे.

राज्यात आठवडय़ाभरात 50 हजार करोनाबाधित

राज्यात एका आठवडय़ातील रुग्णसंख्या 50 हजारांहून अधिक नोंदली गेली आहे. पाच महिन्यांनंतर प्रथमच रुग्णांच्या संख्येत इतकी वाढ नोंदवली गेली आहे. अकोला, अमरावती, वाशिम आणि जळगाव येथे सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे, तर अमरावती येथे मृतांच्या संख्येत सर्वाधिक म्हणजे 11 टक्के वाढ झाली आहे.

विवाह सोहळे आणि लोकलमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

विवाह सोहळे, सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकल ट्रेनमुळे राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे केंद्रीय पथकाने म्हटले आहे. तीन सदस्यीय केंद्रीय पथकाने 1 आणि 2 मार्च रोजी दौरा करून महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी केंद्रीय पथकाने हे निष्कर्ष नोंदवले होते. राज्यातील आरोग्य यंत्रणाही सुस्तावल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केले आहे. आगामी काळात कोरोनाचा प्रसार करण्यासाठी चाचण्यांची संख्या आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्यावर भर द्यावा, अशी सूचना केंद्रीय पथकाने राज्य सरकारला केली आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra Budget 2021 LIVE Updates | राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, सर्वसामान्यांचे लक्ष

Corona Update | राज्यात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक, राज्यात आज 11 हजार 141 कोरोनाचे नवे रुग्ण

लोका सांगे ब्रह्मज्ञान…. नागरिकांना दटावणाऱ्या पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची विनामास्क भ्रमंती

(2,746 samples received from Maharashtra Assembly on 6th & 7th March, 36 tested positive for COVID ahead of Budget session)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.