सावरकर स्मारकातील भाजपच्या आंदोलनात जुही चावला सहभागी

बॉलिवूड सेलिब्रिटी भूमिका घेणं टाळत असल्याचं म्हटलं जात असताना सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका अभिनेत्रीने 'स्टँड' घेतला आहे.

सावरकर स्मारकातील भाजपच्या आंदोलनात जुही चावला सहभागी
Follow us
| Updated on: Jan 08, 2020 | 4:26 PM

मुंबई : ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सावरकर स्मारकात भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनाला प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जुही चावला हिने उपस्थिती लावली होती. कलाकार विषय समजून न घेता कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची घाई करतात, असं जुही ‘टीव्ही9 मराठी’शी बोलताना (Juhi Chawala in BJP Protest) म्हणाली.

प्रत्येक गोष्टीवर लोकांनी प्रतिक्रिया देऊ नयेत. लवकर रिअॅक्ट होण्याच्या नादात अनेक जण विषय समजून घेत नाहीत. त्यांना काही माहित नसतं, असं जुही चावला म्हणाली. कालच अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘जेएनयू’मध्ये हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बॉलिवूड सेलिब्रिटी भूमिका घेणं टाळत असल्याचं म्हटलं जात असताना सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका अभिनेत्रीने ‘स्टँड’ घेतला आहे.

‘आम्ही बऱ्याचदा शूटिंग करत असतो. त्यावेळी बाहेर बरंच काही होतं असतं. त्यामुळे जेव्हा आम्हा कलाकारांना ‘असं’ झालं आहे, आपली प्रतिक्रिया काय, असं विचारलं जातं, तेव्हा बऱ्याचदा आम्हाला नेमकं काय झालंय, तेच माहित नसतं. त्यामुळे काही जण घाईने प्रतिक्रिया देण्यासाठी काहीतरी प्रतिक्रिया देत असतात. त्यांना नेमकं काय झालं, माहीत नसतं. विषय माहित नसतो. मात्र प्रत्येकाने जबाबदारीने बोललं पाहिजे, असं मत जुहीने व्यक्त केलं.

‘आपण ‘तोडणारं’ का बोलावं, ‘जोडणार’ का बोलत नाही? जेव्हा एक बोट आपण दुसऱ्याला दाखवतो तेव्हा बाकीची बोटं आपल्याकडे असतात’ असंही जुही म्हणाली.

विधीमंडळाचं 20 मिनिटांचं अधिवेशन, एससी एसटी आरक्षणावर महत्त्वाचा निर्णय

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरु आहेत. यामधील एक पोस्टर सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘FREE KASHMIR (फ्री काश्मीर)’ असं लिहिलं होतं. भाजपने याविरोधात शिवाजी पार्कजवळ सावरकर स्मारकात निषेध आंदोलन केलं.

या पोस्टरचा भाजपच नाही, तर काँग्रेस नेत्यांनीही निषेध केला आहे. राजकीय नेत्यांसह सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या पोस्टरवर आक्षेप घेतला आहे. जेएनयू हिंसाचाराविरोधातील आंदोलनात असे पोस्टर कशाला? असा सवाल अनेक जणांनी उपस्थित केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेचा फोटो रिट्वीट करत लिहिलं, “हे आंदोलन नक्की कुणासाठी आहे? ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा इथे का दिल्या जात आहेत? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी घटकांना आपण कसं सहन करु शकतो? मुख्यमंत्री कार्यालयापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर आझादी गटाकडून ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा कशा दिल्या जातात? उद्धवजी तुमच्या नाकाखाली अशाप्रकारे फ्री काश्मीरची भारतविरोधी मोहीम सुरु आहे, हे तुम्ही खपवून घेणार का?” असा प्रश्न फडणवीसांनी विचारला होता.

Juhi Chawala in BJP Protest

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.