AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार- अजित पवार एकत्रच…संजय राऊत यांचा नेमका दावा काय?

आम्हाला आतापर्यंत कधी कोणाला एकत्र पहिले का? भेटताना, बोलताना, चहा घेताना आम्हाला कोणी पाहिले का? नाही ना...आम्ही नाही भेटणार.. आमच्याकडे वसंतदादा संस्था नाही. आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही. बंद खोली दरम्यान आम्ही बसलो नाही...

शरद पवार- अजित पवार एकत्रच...संजय राऊत यांचा नेमका दावा काय?
संजय राऊत
| Updated on: Apr 21, 2025 | 11:23 AM
Share

अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेलेच आहे. आम्हाला आतापर्यंत कधी कोणाला एकत्र पहिले का? भेटताना, बोलताना, चहा घेताना आम्हाला कोणी पाहिले का? नाही ना…आम्ही नाही भेटणार.. आमच्याकडे वसंतदादा संस्था नाही. आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही. बंद खोली दरम्यान आम्ही बसलो नाही, असे काही नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. त्याबद्दल संजय राऊत यांनी मत मांडले.

शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्ष कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दोन शून्ये एकत्र केली तरी बेरीज शून्यच होते, अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली होती. त्याला शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच होते, असे म्हणणारे XX आहेत. त्यांना दोन भाऊ एकत्र नको आहे. असे जे बोलत आहे त्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांच्या मनात केवळ द्वेष आहे. त्यांची सत्ता जाणार, त्या भीतीतून ते बोलत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषेचा वादावर शिवसेना उबाठा व मनसेवर टीका केली होती. इंग्रजीचे कौतूक केले जाते, पण हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांनी भारतीय परराष्ट्र सेवेचा कारभार हिंदूतून करावा. चीन, जपान या देशांसारखा हिंदीतून कारभार सुरु केला जावा.

देशाच्या संसदेत ७० टक्के लोक इंग्रजीत बोलतात, त्यांना हिंदीतून बोलण्यास सांगावे. हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करुन बघा मग कळेल. देवेंद्र फडणवीस वेगळे अजेंडा राबवू इच्छीत आहे. त्यांच्या प्रत्येक अजेंडामागे निवडणुकीचे राजकारण आहे. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी येते. महाराष्ट्रात हिंदीच्या अनेक घडामोडींचे स्थान महाराष्ट्र आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा उगम येथे होतो. आम्ही हिंदू पाहतो, हिंदी ऐकतो मग आमच्यावर हिंदी सक्ती का करत आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

महाराष्ट्रात हिंदीची जबरदस्ती करण्याची गरज नाही, हा लोकांचा दबाव होतो. त्या दबावातून आता हिंदी सक्ती मागे घेतली गेली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अमेरिकेत विधान केले. त्या विधानाचे समर्थन राऊत यांनी केले.

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.