खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी द्या: दरेकर

Coronavirus in Mumbai | डोंबिवली आणि कल्याणहून मुंबईत खासगी वाहनाने यायचे असेल तर लोकांना साधारण 700 रुपये मोजावे लागतात. मुंबईत सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे.

खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवासाची परवानगी द्या: दरेकर
मुंबई लोकल ट्रेन
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 2:17 PM

मुंबई: खासगी कंपन्यांमधील कर्मचारी आणि लसीकरणासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. डोंबिवली आणि कल्याणहून मुंबईत खासगी वाहनाने यायचे असेल तर लोकांना साधारण 700 रुपये मोजावे लागतात. मुंबईत सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. त्यामुळे खासगी कर्मचारी आणि लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे दरेकर यांनी म्हटले. प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता रेल्वे खाते आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर मुंबईत लागू झालेले निर्बंध अद्याप कायम आहेत. कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) नियंत्रणात येऊनही हे निर्बंध शिथील करण्यात आले नव्हते. त्यामुळे आता मुंबईकर हे निर्बंध कधी उठणार, असा सवाल विचारू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. येत्या 15 तारखेला यासंदर्भात बैठक होणार आहे. तेव्हा मुंबईकरांना निर्बंधामधून सूट देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

लसीकरण झालेल्या मुंबईकरांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यायची का, यावरही बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. मुंबईत पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या निम्यापेक्षा जास्त आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ज्यांनी दोन डोस घेतलेले आहेत त्यांना भविष्यात काही सवलती देण्याचा विचार होऊ शकतो. दुकाने, शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी कार्यालयात उपस्थिती वाढविण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. याचा निर्णय आठ दिवसांत होईल. मात्र, यामध्ये लोकल ट्रेनचा समावेश होण्याची शक्यता फारच कमी आहे. कारण आजूबाजूच्या शहरांमधील स्थितीचा विचार करावा लागेल. याचा निर्णय राज्य स्तरावर होईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या:

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 1 लाख 35 हजार लसींचे डोस उपलब्ध, लसीकरणाला पुन्हा सुरुवात

मुंबईकरांना दिलासा, म्युकोरमायकोसिसच्या सक्रीय रुग्णांमध्ये घट, 436 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.