AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना दिलासा, म्युकोरमायकोसिसच्या सक्रीय रुग्णांमध्ये घट, 436 रुग्णांना डिस्चार्ज

मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 804 रुग्णांपैकी 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 212 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत

मुंबईकरांना दिलासा, म्युकोरमायकोसिसच्या सक्रीय रुग्णांमध्ये घट, 436 रुग्णांना डिस्चार्ज
mumbai municiple corporation
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 7:54 AM
Share

मुंबई : कोरोनाइतक्याच प्राणघातक असलेल्या म्युकोरमायकोसिस (mucormycosis) आजार आता आटोक्यात येऊ लागला आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून म्युकोरमायकोसिसच्या रुग्णसंख्येत घट होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 804 रुग्णांपैकी 436 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 212 सक्रिय रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु असून यात मुंबईतील केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. (Mumbai Mucormycosis Patient Reduce discharge 436 patients in city)

मुंबईतील परिस्थिती काय?

मुंबईत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये केवळ 30 टक्के रुग्ण मुंबईचे आहेत. मुंबईत आतापर्यंत पालिका आणि खासगी रुग्णालयात म्युकर मायकोसिसचे 804 रुग्ण दाखल झाले. त्यातील 156 जणांचा म्युकर मायकोसिसमुळे मृत्यू झाला. तर सद्यस्थितीत केवळ 212 सक्रिय रुग्ण आहेत.

तसेच मुंबईत आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे एकूण 232 रुग्ण आढळले. यात 47 जणांचा मृत्यू झाला. तर मुंबईत 115 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून केवळ 70 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईत मुंबईबाहेरचे 532 रुग्ण दाखल झाले. यातील 109 जणांचा मृत्यू झाला. तर 321 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तर 142 सक्रिय रुग्ण आहेत.

कोरोना औषधांच्या अतिवापरामुळे म्युकोरमायकोसिसचा धोका 

राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे म्युकोरमायकोसिसमुळे जिवाला धोका निर्माण झाला आहे. या आजारात डोळे, नाक आणि मेंदूवर थेट परिणाम पाहायला मिळतात. कोरोना उपचारादरम्यान अतिप्रमाणात घेतलेली स्टिरॉइड, टोसिलॅझुमॅबचा अतिवापर यामुळे हा आजार होत असल्याची माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या उपाययोजना

मुंबईत म्युकोरमायकोसिसचे रुग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिकेच्या ‘टास्क फोर्स’ने ठरवून दिलेल्या प्रोटोकॉलनुसार यंत्रणेनुसार काम करण्यात आले. पालिकेच्या केईएम, नायर, सायन आणि कूपर रुग्णालयासह खासगी रुग्णालयातही म्युकोरमायकोसिसचे उपचार सुरू आहेत. या आजारावर प्रभावी असणारे इंजेक्शन एम्फोटेरेसिन-बी लॅपोझोम आणि टॅबलेट पोसोकोनेझोल वापरले जात आहेत. तसेच गरज भासल्यास नाक आणि डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून इन्फेक्शन काढून टाकण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिका प्रशासनाने दिली आहे.

?म्युकोरमायकोसिस म्हणजे काय??

म्युकोरमायकोसिस एक दुर्मीळ फंगल इंफेक्शन आहे, याला झिगॉमायकोसिसदेखील म्हणतात. यात रोग आणि जंतूंचा सामना करण्याची क्षमता कमी होते. कोरोनामुक्त झाल्यानंतर मधुमेह असलेल्या नागरिकांना हा आजार होत आहे. वेळेत उपचार घेतल्यास हा आजार लवकर बरा होऊ शकतो. यामुळे तोंडाच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, सायनस रक्तसंचय, तोंडाच्या वरच्या भागात ताप येणे ही लक्षणे आहेत

म्युकरमाक्रोसिस हा नवीन आजार नाही. मात्र कोरोना नसताना वर्षा-दोन वर्षातून एखादी केस पाहायला मिळायची. याचं प्रमाण देशभरात पाहायला मिळत होतं. दोन लाटांमध्ये हा फरक दिसत आहे. पहिल्या कोरोना लाटेत फार रुग्ण नव्हते, पण दुसऱ्या लाटेत चकित करणारे प्रमाण दिसत आहे.

म्युकोरमायकोसिस कसा पसरतो?

म्युकोरमायकोसिस हा असा आजार आहे, ज्याद्वारे श्वासोच्छवास आणि त्वचेच्या माध्यमातून रोगजंतू शरीरात प्रवेश करतात आणि वेगवेगळ्या अवयवांचे नुकसान करतात. बहुधा फुफ्फुसातील आणि त्वचेमध्ये या फंगल इंफेक्शनची सुरुवात होते.

(Mumbai Mucormycosis Patient Reduce discharge 436 patients in city)

संबंधित बातम्या :

मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावरच लढणार; आता विरोधी पक्षनेते रवी राजांचाही नारा

मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?

ओळखपत्रधारक पत्रकार, लसीचे 2 डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्या, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मागणी

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.