उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला, काय वाह्यातपणा चाललाय?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने फटकारलं

एकदा आम्ही आत्मक्लेश केला. आता आत्मक्लेश करणार नाही. एकदा आम्ही गांधीवादीमार्गाने चाललो, पुढचा मार्ग आमचा भगतसिंगाचा असू शकतो याची खबरदारी भाजपने घ्यावी.

उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला, काय वाह्यातपणा चाललाय?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने फटकारलं
उद्या म्हणतील शिवरायांचा जन्म सुरतला झाला, काय वाह्यातपणा चाललाय?; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने फटकारलंImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 2:03 PM

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात वादग्रस्त विधान केलेलं असतानाच आता भाजपचे नेते, आमदार प्रसाद लाड यांनी अजब विधान केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला आणि रायगडावर त्यांचं बालपण गेल्याचा जावई शोध लाड यांनी लावला आहे. लाड यांच्या या विधानाचा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे. उद्या गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी शिवाजी महाराजांचा जन्म सुरतला झाल्याचंही हे लोक म्हणतील. काय वाह्यातपणा चालला आहे? असा संतप्त सवाल अमोल मिटकरी यांनी केला आहे.

अमोल मिटकरी यांनी मीडियाशी संवाद साधताना प्रसाद लाड यांच्या विधानावरून भाजपची अक्षरश: लक्तरे काढली. उद्या जर गुजरात महोत्सव झाला. तिथे प्रसाद लाड यांना बोलावलं. तर गुजरातच्या लोकांना खूश करण्यासाठी ते असंही म्हणतील शिवाजी महाराजांचा जन्म सुरतला झाला होता. काय वाह्यातपणा लावलाय? तेही शिवाजी महाराजांच्या इतिहासासोबत, असा संताप अमोल मिटकरी यांनी केला.

हे सुद्धा वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्यात येत आहे. भाजपच्या लोकांकडून वारंवार हा अवमान केला जात आहे. या सर्व गोष्टींना देवेंद्र फडणवीसांचं मूक समर्थन कारणीभूत आहे. कोणीच त्यांना आवर घालताना दिसत नाही, असं मिटकरी म्हणाले.

भाजपने महाराजांचा अपमान करण्याची सुपारी उचलली आहे का? उचलली आहे का नाही त्यांनी उचललीच आहे. कोश्यारी, त्रिवेदी, लोढा आणि प्रसाद लाड यांनी तर नवीनच जावई शोध लावला. लहानपणापासून आपण सर्व इतिहास वाचत आलो. शिवरायांचा जन्म जिजाऊंच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 ला शिवनेरी किल्ल्यावर झाला. हे माहीत असताना कोकण महोत्सवात प्रसाद लाड यांनी नवीन जावई शोध लावला, अशी टीका त्यांनी केली.

शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं त्यांनी सांगितलं. बरं ते वाचून सांगत आहेत. बाजूला प्रवीण दरेकर बसले आहेत. ते काहीच बोलत नाहीत. यापुढे जाऊन ते असंही म्हणतात की शिवाजी महाराजांचं बालपण रायगडावर गेलं. अहो शिवाजी महाराजांचं बालपण राजगडावर गेलं.

स्वराज्याची पहिली राजधानी राजगड होती. तिथे जिजाऊसाहेब आणि शहाजी राजे यांनी त्यांना आत्मसंरक्षणाचे आणि स्वराज्याचे धडे दिले. हा धगधगता इतिहास आहे. हा गौरवशाली इतिहास असताना भाजपकडून जाणीवपूर्वक चुकीची मांडणी केली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

एकदा आम्ही आत्मक्लेश केला. आता आत्मक्लेश करणार नाही. एकदा आम्ही गांधीवादीमार्गाने चाललो, पुढचा मार्ग आमचा भगतसिंगाचा असू शकतो याची खबरदारी भाजपने घ्यावी. आता सारवासारव करू नका. जाणीवपूर्वक तुम्ही बोलला आहात. स्क्रिप्ट समोर ठेवूनच बोलला. त्यामुळे माफी मागून चालणार नाही. नाक घासावं आणि प्रायश्चित करावं, अशी मागणी त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.