Devendra Fadnavis: अचूकता आणि विश्वासार्हता… SIR वरून गोंधळ, आता मुख्यमंत्री मैदानात, काय दिले विरोधकांना सणसणीत उत्तर
Devendra Fadnavis on SIR : अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विरोधकांना मुद्देसुद उत्तर दिले आहे.

सध्या देशभरात केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. विशेष सखोल पुनर्निरीक्षण (SIR) प्रक्रियेवरून त्यांनी रान उठवले आहे. मतचोरी, मतदार यादीमध्ये सावळागोंधळ सुरू असल्याचा विरोधकांचा दावा आहे. त्याचवेळी मैदानात उतरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन विरोधकांना मुद्देसुद उत्तर दिले आहे. तर एसआयआर प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे आणि मु्द्देही समोर आणले आहेत.
मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे ट्वीट
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआरविषयीचे टप्पे आणि मुद्यांविषयी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये “प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.” असे त्यांनी सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर SIR 2026 मधील महत्त्वाची माहितीही त्यांनी शेअर केली आहे.
अचूक आणि अद्ययावत मतदार यादी, विश्वासार्ह निवडणूक प्रक्रियेचा आधार!
प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा अधिकार मिळावा आणि मतदार यादीतील नोंदी अचूक व विश्वासार्ह राहाव्यात, यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) ही महत्त्वाची प्रक्रिया आहे. महाराष्ट्रातील SIR 2026 अंतर्गत 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर SIR 2026 मधील महत्त्वाची माहिती…
महाराष्ट्र SIR 2026 – आकडेवारी:
✅ SIRपूर्वी महाराष्ट्रातील 9.78 कोटींहून अधिक मतदार प्रारूप मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी आधारभूत यादीत होते.
✅ 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
✅ जुन्या मतदार यादीतील ज्या मतदारांची संबंधित गणना प्रपत्रे प्राप्त झालेली नाहीत, त्यांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद झालेली (दुबार नोंदणी) किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
✅ अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. EPIC क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आपले नाव तपासता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
✅ प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना प्रपत्र-6 आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.
✅ 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-6 द्वारे अर्ज करता येणार आहे.
✅ ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येतो. संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.
✅ प्रारूप मतदार यादी आणि SIR अंतर्गत ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे आपले नाव तपासता येणार आहे.
योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणे महत्त्वाचे आहे.
#Maharashtra #SIR #ElectionCommission
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 6, 2026
महाराष्ट्र SIR 2026 – आकडेवारी:
1. SIRपूर्वी महाराष्ट्रातील 9.78 कोटींहून अधिक मतदार प्रारूप मतदार यादीच्या पुनरीक्षणासाठी आधारभूत यादीत होते.
2. 31 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत 7.71 कोटींहून अधिक मतदारांचा समावेश करण्यात आला आहे.
3. जुन्या मतदार यादीतील ज्या मतदारांची संबंधित गणना प्रपत्रे प्राप्त झालेली नाहीत, त्यांची नावे गैरहजर, स्थलांतरित, मृत, अन्यत्र नोंद झालेली (दुबार नोंदणी) किंवा इतर कारणांमुळे प्रारूप मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
4. अशा मतदारांची ASDD (Absent, Shifted, Dead, Duplicate) यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. EPIC क्रमांकाच्या आधारे नागरिकांना आपले नाव तपासता येणार असून मतदान केंद्रनिहाय ASDD यादी डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
5. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांना प्रपत्र-6 आणि घोषणापत्राद्वारे नाव समाविष्ट करण्याची संधी देण्यात आली आहे.
6. 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांनाही प्रपत्र-6 द्वारे अर्ज करता येणार आहे.
7. ऑनलाइन अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या Voter Services Portal वर करता येतो. संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे ऑफलाइन पद्धतीनेही अर्ज करता येणार आहे.
8. प्रारूप मतदार यादी आणि SIR अंतर्गत ASDD यादी मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांना EPIC क्रमांक, वैयक्तिक तपशील किंवा मोबाईल क्रमांकाद्वारे आपले नाव तपासता येणार आहे.
योग्य पडताळणीनंतर पात्र मतदारांची नावे अंतिम मतदार यादीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने प्रारूप मतदार यादीत आपले नाव तपासून आवश्यक असल्यास विहित प्रक्रियेद्वारे अर्ज करणे महत्त्वाचे आहे, असे या ट्वीटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
