करण जोहरच्या ‘त्या’ पार्टीत सरकारचा मंत्री होता का?; आशिष शेलारांची शंका

बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीत काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे.

करण जोहरच्या 'त्या' पार्टीत सरकारचा मंत्री होता का?; आशिष शेलारांची शंका
ashish shelar
राहुल झोरी

| Edited By: भीमराव गवळी

Dec 16, 2021 | 5:25 PM

मुंबई: बॉलिवूडचा दिग्दर्शक करण जोहर यांच्या पार्टीत काही कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. करण जोहरच्या पार्टीत ठाकरे सरकारचा कोणी मंत्री होता का? असेल तर त्यांनी पुढे यावे. लोकांच्या आरोग्याशी खेळू नये, अशी शंकाच आशिष शेलार यांनी उपस्थित केली आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ही शंका उपस्थित केली आहे. करण जोहरच्या पार्टीवरून संभ्रमाचे वातावरण दिसते निर्माण झाले आहे. या पार्टीत राज्‍य शासनातील कोणी मंत्री होता का?, हा संशय बळावयाचे नसेल तर त्‍या इमातीचे सीसीटीव्‍ही फुटेज जाहीर करावे. जी माहिती समोर आली त्‍यामध्‍ये त्‍या पार्टीमधील अन्‍य लोकांनी पालिकेकडून टेस्‍ट केलेल्‍या नाहीत. त्‍यांनी हरकिशनदास रूग्‍णालयात चाचण्‍या केल्‍या आहेत, असं सांगतानाच या पार्टीत किती लोक होती?, अशी शंका निर्माण होत आहे. त्या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील कुणी मंत्री होता का? पालिकेने सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे. जर कुणी मंत्री असेल तर त्याने पुढे यावे. कुणी मंत्री त्या पार्टीला होतं का त्याची स्पष्टता असावी, जन आरोग्‍याची खेळू नये, असे शेलार यांनी म्हटलं आहे.

पार्टीत कितीजण होते?, अधिकारीच संभ्रमात

करण जोहरच्या घरी पार्टी झाली. त्या पार्टीत असलेल्या तिघांना कोरोना झाला अशा बातम्या वाचल्या. त्‍या सत्‍य मानून मी बोलतो आहे. अधिकाऱ्यांशी बोलल्‍या नंतर माहिती मिळाली की, सीमा खान, अमृता अरोरा आणि करीना कपूरला कोरोना झाला. याबाबत महापालिकेला पत्र लिहून तीन प्रश्‍न विचारले आहेत, करण जोहरच्या घरी जी पार्टी होती त्यात किती लोक सहभागी होती?. त्या सर्वांची टेस्ट झाली का?, मनपाचे अधिकारी सांगत आहेत त्‍या पार्टीत आठच लोक होते हे आठच लोक होते हे कशावरून ठरवले?, असे मी प्रश्न पालिकेला विचारले आहेत.

यावर पालिकेच्‍या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्‍ही बाधित लोकांशी चर्चो केली. सीमा खान त्‍यांनी काही नावे सांगितली, काही नावे गाळली होती. लपवली होती. मग अधिकारी म्‍हणाले, की आम्‍ही स्‍वतः करिना कपूर यांच्‍याशी बोललो. त्‍यांनी काही नावे सांगितली. यावरून असे दिसतेय की, यामध्‍ये संभ्रम निर्माण होतो आहे. म्‍हणून आम्‍ही पालिकेला प्रश्‍न विचारला आहे की, सदर इमारतीचे सीसीटीव्‍ही फुटेज घेतले आहे का?, ही पत्रकार परिषद घेईपर्यंत पालिकेने याचे उत्‍तर नाही असे दिले आहे. त्‍यामुळे संशय बळावतो आहे, असंही ते म्हणाले.

किचन कॅबिनेटमधून कुलगुरू ठरवणार का?

विद्यापीठ कुलगुरु नेमण्याचा राज्यपालांकडे असलेला अधिकार राज्य शासनाने आपल्याकडे घेतल्‍यामुळे यापुढे राज्यातील विद्यापीठातील कुलगुरू युवा सेनेच्या किचन कॅबिनेटमध्ये ठरवला जाईल. एखाद्या “सचिन वाझे” सारख्या व्यक्तीला कुलगुरू करायचे आहे का? अशा व्यक्तीच्या स्वाक्षरीने विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देणार का? असे सवालही त्यांनी उपस्थित केले आहेत.

मोकळ्या भूखंडावर डोळा

मुंबई विद्यापीठाचे करोडो रुपयांचे मोकळे भूखंड लक्ष करण्याचे काम ठाकरे सरकारचे आहे. भूखंड लाटण्यासाठी असे कायदा बदल करण्यास सुरुवात झाली आहे, असा आरोपही त्यांनी केलाय. काही बातम्‍या त्‍याबाबत आल्‍या आहेत. एसआरएसाठी भूखंड देणे, काही रजीस्‍टर, रजिस्‍टर नसलेल्‍या काही संस्‍थांना भूखंड देणे सुरू आहे. त्‍यामुळे आपल्‍या मर्जीतील कुलगुरू विद्यापीठात बसविले जात असून भूखंड लाटण्‍यासाठी केलेले हे बदल आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.

विद्यापीठ बचाव आंदोलन करणार

भाजपच्या युवा मोर्चाकडून विद्यापीठ बचाव हा कार्यक्रम घेण्यात येईल. तुम्ही घेतलेले सर्व निर्णय अधिकारांचे विकेंद्रीकरण करणारे आहेत, केंद्रीकरण करणारे आहेत, विद्यापीठांची गुणवत्‍ता कशी वाढेल याबाबत कधी चर्चा का केली नाही, असा सवालही त्‍यांनी केला. हा विद्यापीठांवर हा घाला असून महाराष्‍ट्रातील नागरीकांनी या विरोधात व्‍यक्‍त व्‍हायला हवे, असे आवाहनही त्यांनी केले.

संबंधित बातम्या:

Ajit Pawar | हा अधिकार त्यांचाच आहे म्हणत अजित पवारांनी राज्यपालांना लोकशाहीचा धडा सांगितला, नेमकं काय म्हणाले?

Mumbai : मुंबई विद्यापीठाच्या जागेवरील एसआरए प्रकल्प बंद पाडला, भूखंड ताब्यात घेतल्यास राजीनामा देईन-सामंत

OBC Reservation : ओबीसींच्या जागा खुल्या प्रवर्गात टाकून जानेवारीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें