AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी गजानन कीर्तीकर म्हणजे विजय निश्चित, आशिष शेलार यांना विश्वास

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन कीर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.

अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी गजानन कीर्तीकर म्हणजे विजय निश्चित, आशिष शेलार यांना विश्वास
भाजप आमदार आशिष शेलारImage Credit source: TV9MARATHI
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Apr 08, 2024 | 9:50 PM
Share

महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांना हरवण्यासाठी खासदार गजानन कीर्तीकर प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. म्हणजे महायुतीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. दिंडोशी विधानसभा मतदारसंघाचा मेळावा आज खासदार गजानन किर्तीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. भाजपा आमदार राजहंस सिंह यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थितीत होते. यावेळी आमदार आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात काँग्रेसच्या न्यायपत्राचा खरपूस समाचार घेतला. “संविधानावर चर्चा करण्यासाठी जितेंद्र आव्हाड, नाना पटोले आणि काँग्रेसवाल्यांनी यावे आम्ही तयार आहोत. जागा, तारीख, वेळ तुमची”, असे थेट आव्हानही यावेळी आमदार आशिष शेलार यांनी दिले.

“महामानव भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेली घटना बदलणार असा अपप्रचार आज विरोधक करीत आहेत. ते हे का विसरत आहेत की, हेच ते कॉंग्रेसवाले आहेत त्‍यांनी घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पराभूत केले होते. एवढेच नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍याप्रती कधी प्रेमही दाखवले नाही. तर कॉंग्रेसने आपल्‍या राजवटीत अनेक वेळा घटना बदलण्‍याचे काम केले. त्‍यामुळे आज केवळ खोटे बोलून दिशाभूल करण्‍याचे काम काँग्रेस करीत आहे”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.

‘काँग्रेसचा जाहीरनामा खोटारडेपणाचा कळस’

“काँग्रेसचा जाहीरनामा म्‍हणजे असाच एक खोटारडेपणाचा कळस म्‍हणावा असाचा आहे. त्‍यांनी जाहीरनाम्‍याचे नाव न्यायपत्र असे ठेवले आहे. त्‍यांनी या झुठपत्रात संविधानाचे संरक्षण करण्‍याची बाब नमूद केली आहे. मग आणीबाणीमध्‍ये या देशाला कुणी ढकलले? हे आज युवा वर्गाला न्‍याय देण्‍याची बात करीत आहेत, मग जेएनयुमध्‍ये तरुणांची माथी कुणी भडकवली? हे आज शिक्षणाला न्‍याय देण्‍याची घोषणा करीत आहेत मग नवे शैक्षणिक धोरण कुणी रोखले?”, असे सवाल आशिष शेलार यांनी केले.

हे भ्रष्‍टाचार कमी करणार असे आज सांगत आहेत. काँग्रेसच्‍या घोटाळ्यांची यादीच वाचून दाखवत आमदार अँड आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेतला. आदिवासींना न्‍याय देण्‍याचे काँग्रेस बोलत आहे. मग आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मु राष्‍ट्रपती झाल्‍या त्‍यावेळी त्‍यांना काँग्रेसने पाठींबा का दिला नाही? असा थेट सवालही त्यांनी यावेळी केला.

Follow Us
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल
नंदुरबार-मालेगाव मार्गावरील बस रस्त्यातच बंद, प्रवाशांचे हाल; एसटी महामंडळावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम, शेलारांचे प्रत्युत्तर
शेलारांचे राऊतांना प्रत्युत्तर: महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यास फडणवीस सक्षम
पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता, मेट्रो-१३ प्रकल्पही मंजूर
देवेंद्र फडणवीस: पुणे रिंग रोडसाठी १०,५०२ कोटींची मान्यता. मेट्रो-१३ प्रकल्पालाही मंजुरी.
अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवारांना बारामतीकरांचं पत्र
अजित पवारांच्या निधनानंतर बारामती पोरकी? पवार कुटुंबीयांना बारामतीकरांचं खुलं पत्र
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय
सिब्बलांच्या आरोपांवर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “निर्णय शाश्वत”
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम; परीक्षेसाठी 30 मिनिटं आधी पोहोचणं बंधनकार
मुंबई विद्यापीठाचा नवा नियम. परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती बंधनकारक
मराठी पाट्यांच्या मोहिमेचा महापालिकेकडून तिसरा टप्पा सुरू
१२ कोटींचा दंड वसूल: मुंबईत मराठी पाट्यांसाठी महापालिकेची धडक मोहीम
मराठा नेते आक्रमक; वाघमारेला मारणाऱ्याला 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा
मराठा नेत्यांकडून नवनाथ वाघमारे यांना थेट धमकी; माफी मागण्याची मागणी
पुण्यातील चूल मटण हॉटेलचा परवाना एफडीएने केला निलंबित
लोहगाव येथील चूल मटण हॉटेलवर अस्वच्छतेमुळे एफडीएची कारवाई
नाशिक पालकमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांची निवड, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन