अविनाश भोसलेंच्या ईडी विरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी, भोसलेंना दिलासा मिळणार?

उद्योजक अविनाश भोसले यांनी ईडी कारवाईविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, त्यावर आज सुनावणी होणार आहे. Avinash Bhosale Mumbai High Court

अविनाश भोसलेंच्या ईडी विरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी,  भोसलेंना दिलासा मिळणार?
अविनाश भोसले

मुंबई: पुण्यातील बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात ईडीने मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी अविनाश भोसले यांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीत अविनाश भोसलेंना दिलासा मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. (Avinash Bhosale file petition at Mumbai High Court to cancel money laundering case decision )

अविनाश भोसलेंच्या चार ठिकाणांवर छापे

बिल्डर अविनाश भोसले यांच्या विरोधात पुणे येथील जमिनीबाबत गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा पुणे पोलिसांनी दाखल केलेला असून या प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. याच प्रकरणात ईडीने 11 फेब्रुवारी रोजी भोसले यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते. यावेळी अविनाश भोसले याचा मुलगा अमित भोसले याला ताब्यात घेऊन त्याची चार तास चौकशी केली होती. या चौकशी नंतर 12 फेब्रुवारी रोजी अविनाश भोसले त्यांचा मुलगा अमित भोसले यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं होतं.मात्र, दोघे ही चौकशीसाठी हजर झाले नाहीत. भोससले पिता पुत्रांनी त्यांच्या विरोधात दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

ईडीकडून अविनाश भोसलेंची फेमाअंतर्गत चौकशी

परकीय चलन नियमन कायद्यातंर्गत अविनाश भोसले यांनी सहा वर्षांपूर्वी केलेल्या एका व्यवहाराची चौकशी होत आहे. यापूर्वीही ईडीने अविनाश भोसले यांना अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. 10 फेब्रुवारीला अंमलबजावणी संचलनालय अर्थात ED ने अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर छापाही टाकला होता. गुरुवारी ईडीने अविनाश भोसले यांचा मुलगा अमित भोसले यांनाही चौकशीसाठी पाचारण केले होते.

यापूर्वीही ईडीकडून चौकशी

दरम्यान, अविनाश भोसले यांची यापूर्वीही ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबर महिन्यात तब्बल दहा तास त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली होती. FEMA कायद्यांतर्गत त्यांची चौकशी करण्यात आल्याचं वृत्त आहे. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

मुलीलाही नोटीस?

अविनाश भोसले यांच्यासह त्यांच्या मुलीला म्हणजेच राज्याचे कृषीराज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांनाही ईडीने नोटीस पाठवल्याची माहिती आहे. दोन आठवड्यापूर्वीच हे वृत्त आलं होतं. मात्र याबाबत विश्वजीत कदम यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.


संबंधित बातम्या:

रिअल इस्टेट किंग अविनाश भोसले यांची 10 तास चौकशी; ईडी कार्यालयातून बाहेर

Special Report | व्हाईट हाऊसमध्ये राहणारे अविनाश भोसले नेमके कोण?

ईडीनं छापा टाकलेले अविनाश भोसले कोण आहेत? रिक्षा चालक ते रिअल इस्टेटचे बादशाह, थक्क करणारा प्रवास, वाचा सविस्तर

(Avinash Bhosale file petition at Mumbai High Court to cancel money laundering case decision )