Bandra East Election Result 2024: अखेर बालेकिल्ला ठाकरेंनी परत मिळवलाच, ‘मातोश्री’च्या अंगणात गुलाल कोणाचा?

Bandra East MLA Vidhan Sabha Election Result 2024 LIVE Updates: मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत अखेर शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे.

Bandra East Election Result 2024: अखेर बालेकिल्ला ठाकरेंनी परत मिळवलाच, मातोश्रीच्या अंगणात गुलाल कोणाचा?
| Updated on: Nov 23, 2024 | 5:08 PM

Bandra East Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. अखेर या लढतीत महायुतीने महाविकासआघाडीचा सुपडा साफ केला आहे. महायुतीने तब्बल २२८ जागांवर आघाडी घेतली आहे. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५५ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त ४७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २१ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना १३ जागा मिळाल्या आहेत.

मुंबईतील 36 मतदारसंघांपैकी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. मुंबईतील हायव्होल्टेज मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ चर्चेत होता. या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. या तिरंगी लढतीत अखेर शिवसेना ठाकरे गटाने बाजी मारली आहे. ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई हे या मतदारसंघात विजयी झाले आहे. वरुण सरदेसाईंनी ११ हजार ३६५ मतांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या झिशान सिद्दीकी यांचा पराभव केला आहे.

मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी पुन्हा रिंगणात उतरले होते. तर महाविकासआघाडीकडून ठाकरे गटाकडून वरुण सरदेसाई यांना रिंगणात उतरवलं होतं. तसेच मनसेकडून तृप्ती सावंत मैदानात उतरल्या होत्या. वांद्रे पूर्व मतदारसंघातील लढत ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची आहे.

शिवसेनेचा बालेकिल्ला अखेर ठाकरेंकडे परत

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे मातोश्री हे निवासस्थान याच मतदारसंघात आहे. त्यामुळे मातोश्रीच्या अंगणात गुलाल कोणाचा असा प्रश्न कायमच उपस्थितीत होत असतो. २०१९ मध्ये या मतदारसंघातून झिशान सिद्दिकी विजयी झाले होते. झिशान सिद्दिकी यांनी शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव केला होता. त्यावेळी तृप्ती सावंत यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला ठाकरे परत मिळवणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं. अखेर ठाकरेंना शिवसेनेचा बालेकिल्ला परत मिळवण्यात यश आले आहे.

झिशान सिद्दीकींचा सहानुभूतीच्या लाटेवर प्रचार

वांद्रे पूर्व मतदारसंघात निवडणूक जाहीर होण्यापूर्वी खूप मोठी घडामोड घडली. विद्यमान आमदार झिशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यानंतर काँग्रेसमध्ये असलेल्या झिशान सिद्दीकींनी अजित पवार गटात प्रवेश करत विधानसभेचे तिकीट मिळवलं. यानंतर झिशान सिद्दीकी यांनी प्रचारसभा किंवा भाषणांमध्ये अनेकदा बाबा सिद्दीकींचा उल्लेख केला. तसेच सोशल मीडियावरही अनेकदा बाबा सिद्दीकींच्या आठवणीत काही पोस्टही शेअर केल्या होत्या. यामुळे झिशान सिद्दीकी सहानुभूतीच्या लाटेवर प्रचार करत असल्याचे म्हटले जात होते.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage