AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भिवंडीत चारमजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच-सहा जण अडकल्याची भीती

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये चारमजली इमारत कोसळून दुर्घटना घडली आहे. इमारतीला तडा गेल्यानंतर रहिवाशांना बाहेर काढल्यामुळे मोठी जीवितहानी टळली.

भिवंडीत चारमजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच-सहा जण अडकल्याची भीती
| Updated on: Aug 24, 2019 | 7:45 AM
Share

भिवंडी : भिवंडी शहरातील पिराणीपाड्यात शांतीनगर भागात धोकादायक इमारत कोसळल्याची (Bhiwandi Building Collapse) दुर्दैवी घटना समोर आली आहे. चार मजली इमारतीला तडे गेल्यानंतर रहिवाशांची सुटका करतानाच इमारत पडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती असून ढिगाराखाली पाच ते सहा जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

शांतीनगर भागातील चार मजली इमारतीचा कॉलम शुक्रवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास हलू लागल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली. साडेनऊच्या सुमारास महापालिका कंट्रोल रुमला फोन गेल्यानंतर रहिवाशांना इमारतीतून सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु होते. त्याचवेळी सुमारास संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही इमारत केवळ सहा वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जात आहे.

या दुर्घटनेत 28 वर्षीय शिराज अन्सारी आणि आकिब या दोघांचा मृत्यू झाला. तर पाच ते सहा जण इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौघांना जिवंत बाहेर काढण्यात आलं असून जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अग्निशामक दलाचे जवान, एनडीआरएफ टीम घटनास्थळी बचावकार्य करत आहे.

इमारतीतून सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं, मात्र काही जण आपलं सामान आणण्यासाठी परवानगी न घेता पुन्हा आत गेले, त्यावेळी दुर्घटना घडली, असा दावा महापालिकेने केला आहे.

इमारत दुर्घटना घडली, तो परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे आणि आत पोहचण्याचा मार्ग अत्यंत चिंचोळा असल्यामुळे यंत्रसामुग्री, अॅम्ब्युलन्स पोहचण्यात अडथळे येत आहेत. एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्कालीन यंत्रणेचे जवान टिकाव आणि फावड्याने ढिगारा उपसण्याचे काम करत आहेत.

काहीच दिवसांपूर्वी मुंबईतील डोंगरी परिसरातील दाटीवाटीच्या भागात इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. यामध्ये 14 जणांना प्राण गमवावे लागले होते.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.