BMC-पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची सोय, नगरसेविकेने तळले बटाटे वडे

संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक गरजू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

BMC-पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नाश्त्याची सोय, नगरसेविकेने तळले बटाटे वडे

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशासह राज्यात लॉकडाऊन असताना शीव- माटुंगा येथील प्रभाग क्रमांक 172 च्या (BJP Corporator Make Batata Vada) भाजपा नगरसेविका राजश्री शिरवडकर आणि दक्षिण मध्य मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांच्यावतीने गरीब आणि गरजूंना जेवणाचे वाटप करण्यात येत आहे. तर महापालिका (BJP Corporator Make Batata Vada) आणि पोलीस यांच्यासाठी नाश्त्याची व्यवस्था केली जात आहे.

पोलीस आणि महापालिका कर्मचाऱ्यांसाठी नाश्तामध्ये बनवण्यात येणारे बटाटे वडे खुद्द नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी तळले. त्याचा एक व्हिडीओ सध्या फिरत आहे.

संपूर्ण देशात सध्या लॉकडाऊन आहे. त्यामुळे अनेक गरजू आणि गरीब लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच, सर्वत्र लॉकडाऊन असल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना उपाशी राहून ड्युटी करावी लागत आहे. अशा काळात भाजपच्या (BJP Corporator Make Batata Vada) नगरसेविका आणि दक्षिण मध्य मुंबईचे भाजप जिल्हाध्यक्षांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली.

नगरसेविका राजश्री शिरवडकर आणि राजेश शिरवडकर यांनी गरजू आणि गरीब लोकांच्या पोटापाण्याची सोय केली. तसेच, उपाशीतापाशी भर उन्हात कर्तव्य बजावत असलेले पोलीसस आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या नाश्त्याची सोय केली.

यावेळी नाश्त्यासाठी बनविण्यात येत असलेले बटाटे वडे हे खुद्द नगरसेविका राजश्री शिरवडकर यांनी तळले. राजेश्री शिरवडकर या बटाटे वडे तळत असतानाचा व्हिडीओही समोर आला आहे. यामध्ये त्या तोडांला मास्क लावून दिसत आहेत. तसेच, त्या बटाटे वडे (BJP Corporator Make Batata Vada) तळताना दिसत आहेत.

संबंधित बातम्या :

साताऱ्यातील मोदी पेढेवाल्यांना लॉकडाऊनचा फटका, कंदी पेढे रस्त्यावर फेकण्याची वेळ

Corona | पिंपरी चिंचवडकरांचा नेटाने लढा, 12 पैकी 9 रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी

संगमनेरमध्ये एकाचवेळी तब्बल 15 कोरोना संशयित रुग्ण, संपर्कात आल्याने संसर्गाची चिन्हं

8 महिन्यांची गर्भवती, पतीसोबत अन्न-पाण्याविना 100 किमीपर्यंत पायपीट

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI