AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला कारागृहात टाकण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे? देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप

देवेंद्र फडणवीस यांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी जगंजगं पछाडले गेले. परंतु माझे काहीच मिळाले नाही. मला कारागृहात टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली होती.

मला कारागृहात टाकण्याचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे? देवेंद्र फडणवीस यांचा मोठा आरोप
| Updated on: Feb 13, 2023 | 6:41 PM
Share

मुंबई :  भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यांवर खळबळजनक आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या संमतीमुळे मला कारागृहात टाकण्यासाठी जंगजंग पछाडण्यात आले. त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. खोटी कागदपत्रे तयार गेली होती. परंतु मी कुठेच अडकणार नव्हतो. कारण खोटे करण्यासाठीही काहीतरी खरे द्यावे लागेत . या सर्व गोष्टी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने किंवा संमतीने होत होत्या, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. टीव्ही ९ मराठीचे संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही दिवसांपुर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपणास कारागृहात टाकण्याचे प्रयत्न तत्कालीन सरकारचे होते, असा आरोप केला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, होय, देवेंद्र फडणवीस यांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी जगंजगं पछाडले गेले. परंतु माझे काहीच मिळाले नाही. मला कारागृहात टाकण्याची सुपारी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना दिली होती.

पोलीस विभागात माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्यांकडून ही माहिती मला मिळत होती. त्यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबाब आणला गेला. परंतु या दबाबानंतरही कोणीही अधिकारी तयार झाले नाही. कारण खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी काही मागचे पुढचे खरे हवे असते. परंतु माझे काहीच नव्हते.

गृहमंत्र्यांकडून आदेश नाहीच

मला अटक करण्याचे आदेश सर्वोच्च पातळीवरुन दिले होते. परंतु ते गृहमंत्र्यांचे आदेश नव्हते. कारण पहिले गृहमंत्री जेलमध्ये गेले. अन् दुसरे असे करु शकणार नाही. यामुळे यासंदर्भात १०० टक्के माहिती तत्कालीन मुख्यमंत्र्यांना होती, या आदेशांना त्यांची समंती होती, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

दोन वेळा विश्वसघात

माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरेंनी केला. त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या प्रचारसभेत मोदीजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे म्हणत होते, अमित शाह ते म्हणत होते. नड्डाजी म्हणत होते.  तेव्हा ते काहीच बोलले नाही. त्यांनी जेव्हा मागणी केली, तेव्हा मी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. त्यावेळी मुख्यमंत्री पद देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. मी हा नकार उद्धव ठाकरे यांना कळवला. दोन दिवासांनी त्यांचा फोन आला. तेव्हा कमीत कमी पालघरची जागा द्या, अशी मागणी त्यांनी केली. त्याला आम्ही समंती दिली.

दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी त्यांना कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत चर्चा करत आहेत. त्यांची चर्चा पुढे गेलीय हे जेव्हा लक्षात आलं त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवंय. म्हणून आपण सरकार तयार करुया.

शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?
शिंदेचे आमदार भाजपात घेण्यात अर्थ काय? फडणवीस नेमकं काय म्हणाले?.
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन
तुकाराम मुंढे समर्थकांकडून भाजपच्या कृष्णा खोपडे यांना थेट धमकीचा फोन.
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'
'अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या अंजली दमानिया कोण?'.
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव...
आदित्य ठाकरे स्पष्टच म्हणाले, विरोधी पक्षनेत्यासाठी माझं नाव....
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'
'22 आमदारांपैकी एक जण व्हॉईसकॅप्टन म्हणवतात, त्यांचे काय उद्योगधंदे..'.
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'
'लंडनच्या इंडिया हाऊसमध्ये वंदे मातरमचा आवाज घुमला अन् ब्रिटिशांना...'.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.