AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Delhi Farmers Tractor Rally: शरद पवारांची टीका झोंबली; प्रवीण दरेकर म्हणतात…

शेतकरी आंदोलनावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. (bjp leader Pravin Darekar clarification on his statement)

Delhi Farmers Tractor Rally: शरद पवारांची टीका झोंबली; प्रवीण दरेकर म्हणतात...
प्रवीण दरेकर
| Updated on: Jan 26, 2021 | 8:20 PM
Share

मुंबई: शेतकरी आंदोलनावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेली टीका दरकेर यांना चांगलीच झोंबली आहे. एखादी वस्तुस्थिती मांडली आणि ती जर कुणाला आवडत नसेल तर वस्तुस्थिती मांडणं गुन्हा आहे काय? असा सवाल करतानाच विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अनेक मोठे नेते होते, याचे मलाही भान आहे. मी कुणाच्याही सांगण्यावरून मत मांडलं नव्हतं, असा खुलासा प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (bjp leader Pravin Darekar clarification on his statement)

प्रवीण दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवारांच्या टीकेवर उत्तर दिलं. मी निराधारा काहीच बोलत नाही. पुराव्यावरून ते विधान केलं होतं. कुणाच्या सांगण्यावरून मी बोललो नाही. विधानपरिषदेवर अनेक वरिष्ठ नेते गेलेले आहेत. ही सर्व मोठी मंडळी होती. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे, याचं मला भान आहे. त्यामुळेच मी कधीही निराधार आणि बिनबुडाचे आरोप करत नाही, असं दरेकर म्हणाले.

शाहीनबागमध्ये फिरणारे शेतकरी मोर्चात

मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी मी आझाद मैदानात गेलो होतो. त्यावेळी आझाद मैदानात शेतकरी आंदोलक येत होते. एका मुस्लिम महिलेच्या हातात मला फ्लेक्स दिसला. त्यात शेतकरी असल्याचं लिहिलं होतं. त्यामुळे मी त्या भगिनीला भेटलो. तुम्ही मोर्चासाठी कुठून आलात म्हणून मी त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी भेंडीबाजारातून आल्याचं सांगितलं. त्यामुळेच मी भेंडीबाजारात कुठून आले शेतकरी असं म्हटलं. मी केवळ वस्तुस्थिती मांडली. वस्तुस्थिती मांडली असेल आणि कुणाला ती आवडत नसेल तर वस्तुस्थिती मांडणं दोष आहे का? असा सवाल त्यांनी केला. शाहीन बागमध्ये जे लोक फिरत होते. त्यांना मी आझाद मैदानात फिरताना पाहिले होते. मोर्चाच्या आजूबाजूलाच हे लोक फिरत होते. आंदोलनात कुणीही घुसत असेल आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक असेल तर ती बाब लक्षात आणून दिली तर विरोधी पक्षनेत्याचं काय चुकलं? असा सवालही त्यांनी केला. (bjp leader Pravin Darekar clarification on his statement)

शेतकरी आंदोलनामागे देश विघातक शक्ती

दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी करूच शकत नाही. शेतकरी असं आंदोलन पेटवूच शकत नाहीत. लोकांच्या पोटाची भूक भगावणारा शेतकरी आंदोलन पेटवण्याची भाषा करूच शकत नाही. आंदोलन पेटवूच शकत नाही. काही देशविघातक शक्ती या आंदोलनामागच्या बोलवित्या धनी आहेत, असा दावाही त्यांनी केला.

काय म्हणाले होते पवार?

आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होते. (bjp leader Pravin Darekar clarification on his statement)

संबंधित बातम्या:

शेतकऱ्यांविषयी ‘तो’ प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रवीण दरेकरांना शरद पवारांचा सणसणीत टोला, म्हणाले…

आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका; त्यांची संपत्ती जप्त करा: कंगना रनौत

भेंडी बाजारात कुठून आले शेतकरी?, आंदोलनात लोकं घुसवली; प्रवीण दरेकरांची टीका

गुप्तचर यंत्रणेने माहिती देऊनही गृहखात्याने दखल घेतली नाही; शरद पवारांचा अमित शाहांवर निशाणा

(bjp leader Pravin Darekar clarification on his statement)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.