मुंबईच्या निकालावर नितेश राणेंची शब्दांविना प्रतिक्रिया, यापेक्षा वाईट काही असू शकत नाही
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ९९ जागांसह मुसंडी मारली असून नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर 'पेंग्विन' म्हणत बोचरी टीका केली आहे. पाहा सविस्तर निकाल आणि राजकीय प्रतिक्रिया.

राज्यातील २९ महापालिका निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. महाराष्ट्रात साधारण २६ महापालिकेत भाजप महायुतीने विजयी मुसंडी मारली आहे. त्यातच सर्वांचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. यात भाजपने ९९ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून झेप घेतली आहे. या विजयानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणूक पार पडली होती. या रणसंग्रामात कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर ११४ या बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचता आलेले नाही. मात्र, भाजपने मुसंडी मारत मुंबईत नंबर १ चा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. मुंबई महापालिकेतील निकालाचे कल स्पष्ट होताच भाजप आमदार नितेश राणे यांनी सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी ट्वीटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
Municipal Election 2026
Mumbai Municipal Election Results 2026 : देवेंद्र फडणवीस यांचा थेट अमित साटम यांना फोन...
Pune Nagarsevak Election Results 2026 : तानाजी सावंत यांना धक्का, थेट मुलाचाच...
Mumbai Election Result 2026 : मतमोजणीला 5 तास, मुंबईत आतापर्यंत कोण-कोण जिंकले त्या उमेदवारांची यादी
Mumbai Ward 202, 203 Election Result 2026 : वार्ड क्रमांक 202, 203 चा निकाल काय?
Pune Election Result : पुण्यातील बहुचर्चेीत असलेल्या प्रभाग क्रमांक 9 ची मत मोजणी थोड्यावेळात होणार सुरु
Pune Election Result 2026 : रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी आघाडीवर की पिछाडीवर ?
या पोस्टमध्ये नितेश राणे जोरजोरात हसताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ २२ सेकंदाचा आहे. या व्हिडीओद्वारे त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना डिवचले आहे. तसेच त्यांना खोचक टोला लगावला आहे. उद्धवजी आणि पेंग्विन ला… जय श्री राम!, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. एकीकडे मुंबईतील सत्तेच्या चाव्या कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र नितेश राणे यांच्या या प्रतिक्रियेने राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. ठाकरे गटाला ६३ जागांवर समाधान मानावे लागले आहे.
उद्धवजी आणि पेंग्विन ला
जय श्री राम 🚩🚩 pic.twitter.com/HCz2aSp43y
— Nitesh Rane (@NiteshNRane) January 16, 2026
मुंबई पालिकेत कोणाचे वर्चस्व?
| पक्ष | विजयी जागा |
| भारतीय जनता पक्ष (BJP) | ९९ |
| शिवसेना (ठाकरे गट) | ६३ |
| शिवसेना (शिंदे गट) | ३१ |
| काँग्रेस | १४ |
| मनसे (राज ठाकरे) | ०९ |
| इतर / अपक्ष | ०९ |
| राष्ट्रवादी काँग्रेस | ०२ |
नितेश राणेंची प्रतिक्रिया
नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खोचक टोला लगावला आहे. आदित्य ठाकरे आणि इतर सर्वांना जय श्री राम. आज जो भगवा झंझावात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्व महापालिकेत आमचा महापौर बसण्याची पूर्ण तयारी झाली आहे. सर्व महापालिकेच्या मतदार बंधू भगिनींचे आभार मानेन. यामुळे महाराष्ट्राकडे देशाकडे निश्चितपणे वाकड्या नजरेने बघणाऱ्या हे जे जिहादी या सर्वांना एक कडक संदेश मिळताना दिसत आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले ना, तसं त्यांनी संध्याकाळी इस्लामाबादची फ्लाईट आहे. त्याच्यात बसायचं आणि पाकिस्तान जायचं, तिकडे अल्लाहू अकबर म्हणत राहायचं, असे नितेश राणे म्हणाले.
